एकाच वर्षात दोन-दोन
साहित्य संमेलनाचा घाट कशासाठी? काय निकड आहे दोन साहित्य संमेलनाची? आखिल भारतीय
व विश्व साहित्य संमेलन म्हणजे काय? या साहित्य संमेलनातून मराठी भाषेच्या
विकासासाठी व प्रचार साठी काय फायदा होणार आहे? तुम्हला वाटेल मी लेखाच्य
सुरवातीला इतके प्रश्न का विचारात आहे. पण माझ्या सामान्य मनाला सारस्वताच्या
मेळाव्य बदल पडलेले हे प्रश्न आहेत. पण मी एक गोष्टी प्रामाणिकपणे नमूद करू
इच्छितो की मला मराठी भाषेचा आदर आहे व मी मराठी भाषेचा गर्व बाळगतो, माझे शिक्षण
मराठी भाषेत झाले असून, मला मराठी साहित्यात विशेस रुची आहे.
पण हे हि तेवढेच खरे
की, मराठी साहित्य मंडळाच्या ये कारभाराची कीव येते. याच वर्षाच्या सुरुवातीस
मार्च महिन्यात घुमान (पंजाब) येथे आखिल भारतीय साहित्य संमेलन झाले, संत नामदेव
महाराजाच्य कर्मभूमीत साहित्याचा मेळावा लागला, पंजाबी सर्व सामान्य माणसाना मराठी
भाषेची व संस्कृतीची ओळख झाली, मराठी भूमी पासून हजारो मैल अंतरावर यशस्वी झाला, मराठी भाषा व मराठी
साहित्याचा प्रसार होण्याकरिता त्याचा उपयोग झाला. आशा प्रकारच्या उपक्रमाचे
स्वागतच झाले पाहिजे, भारत भूमीच्या वेगवेगळ्या प्रदेशात हे संमेलना व्हावेत व
त्याद्वारे मराठी भाषेची गोडावी सर्व श्रुत व्हावी. पण लगेचच दोन महिन्यात मला
वाचायला मिळाले ते विश्व साहित्य संमेलना बदल, मला आश्चर्यचा धक्का बसला. विश्व
साहित्य संमेलन आणि अंदमान-निकोबर बेटावर, मला हे लक्षातच येत नाही की
अंदमान-निकोबर या भारताच्या भागावर “विश्व” या नावाने साहित्य संमेलन कसे काय होऊ
शकते????? माझा प्राप्त ज्ञाना प्रमाणे ते केंद्रशासीत प्रदेश आहे, व सध्या तरी
भारताच्या नकाशावर आहे, आणि मुळातच विश्व साहित्य संमेलन कशाला हवे????
मराठी साहित्याचा
प्रचार व्हावा आणि नवीन लेखकाला प्रोत्साहन मिळावे हे जरी खरे असले तरी खरच मराठी
साहित्य संमेलनातून हा हेतू साध्य होतो का?? आणि होत असेल तर त्याचा परिणाम काय???
ओस पडणाऱ्या मराठी शाळ !!! की फक्त साहित्य संमेलने म्हणजे सरकारच्या पैसा वर
साहित्याकांची सहल ??? व ती सुद्धा वर्षातून दोनदा. आज मराठी शाळांची स्थीती काय
आहे, मराठी शाळेत जाणारे विद्याथी किती, मराठी विषय घेऊन शिकणारे किती ??? या
गोष्टीचा आभ्यास मराठी साहित्य मंडळाने केल पाहिजे. आज या साहित्य संमेलनाच्या
खर्चतून मराठी शाळांना देणगी दिल्यास मराठी शाळांची परीस्थिती सुधारू शकते.
महाराष्टातील ग्रामीण भागात आसे साहित्य संमेलन भरलयास मराठीचा प्रचार तर होईलच पण
नवीन लेखकाला ही प्रोत्साहन मिळेल. आर्थत यातून मन- सन्मान आणि प्रसिद्धी मिळणार
नाही, पण मराठी भाषे साठी काम केल्याचे समाधान मिळेल. आज महाराष्टातील ग्रामीण
भागात वाचनालय नाहीत, वचन संस्कृती नाही, ग्रामीण भागातील साहित्य संमेलनामुळे वचन
संस्कृती रुजवली जाऊ शकते, व या करिता मराठी भाषा साहित्य मंडळाचे व साहित्यिकाचे ऋणी
राहील.
स्व. विनायक दामोदर
सावरकरंच्या नावाने पोर्टब्लेरअर येथे हे विश्व साहित्य संमेलन होत आहे, त्या
शब्दप्रभू सावरकरांना आदरांजली म्हणजे, त्याचे साहित्य व त्यांनी दिलेले मराठी
शब्द रोजच्या चलनात आणणे व सामान्य मराठी वाचका पर्यंत पोहचवणे. हीच खरी आदरांजली
आसू शकते. मराठी साहित्य अमर आहे व ते चिरंतर आहे पण त्याचा खोटा देखावा नको आसे
मला वाटते. मराठी साहित्य मंडळ पुणे यांनी याचा विचार करावा.
धन्यवाद
वंदेमातरम् विराज
No comments:
Post a Comment