मला माहित नाही मी कधी क्रिकेट खेळायला शिकलो,
किंवा मला कधी क्रिकेट कळायाला लागल. मात्र ते जेव्हा कळायाला लागल ते एका
नावामुळे आणि ते म्हणजे “सचिन तेंडुलकर”. माझा सारख्या असंख्य सामान्य क्रिकेट
चाहत्याकरता तो क्रिकेटचा देव बनला आहे. तो खरच क्रिकेटचा स्वामी आहे. त्याची
प्रत्येक गोष्ट ही फक्त आणि फक्त क्रिकेट साठीच बनली आहे असे वाटते. त्याची
बॅटवरची पकड, त्याचा तो square cut, त्याचा straight drive, त्याचा pull, त्याचा hook इ, जणू काही फक्त
त्याचासाठीच बनला आहे असे वाटते. तो ज्या पद्धतीने हे सर्व shot खेळतो ते पाहणे हे एक
स्वगीय सुख आहे. त्याने सर्वात जास्त रन केल्या, शतक केली, तो शतकातील सर्वोत्तम
खेळाडू बनला. याहून अजून मोठे काय असणार. त्याची कुठलीही खेळी घेतली तरी एकाच
गोष्ट दिसते ती म्हणजे तो फक्त खेळतो, “फक्त खेळतो”.
मी जेव्हा जेव्हा त्याचा खेळ पाहतो किंवा त्याला
पाहतो तेव्हा मला त्याची सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे, त्याचा चेहरया वरचा निरागस
भाव, मग तो शतक केल्यावरच असो किंवा शून्यावर बाद झाल्यावरचा असो. मला वाटत की हा
निरागस भाव त्याच्या फक्त क्रिकेट वरील प्रेमा मुळे असेल, आणि हे त्याचे क्रिकेट
वरील प्रेमच त्याला शतकातील सर्वोत्तम खेळाडू बनवतो. सचिनबदल मला आदर वाटतो कारण
की इतका मोठा होऊन सुध्या त्याच्या वागण्यात कुटलाही अहंकार नाही किंवा गर्व नाही.
व हे शक्या आहे त्याच्या सध्या व सरळ स्वभावामुळे आणि क्रिकेट वरील असीम प्रेमामुळे.
एक सध्या मध्यमवर्गीय कुटुंबातून एका स्वप्नाच्या जोरावर मोठा झालेला हा सामान्य
माणुसच. सचिनकडे पाहिल्यावर हे जाणवते कि सामान्य माणसाच्या स्वप्नात किती शक्ती
असते. व मला सचिनची आवडणारी गोष्ट म्हणजे, तो स्वःच्या स्वप्नाकरता खेळतो आणि ते
स्वप्न राष्ट्रास अर्पण करतो. व त्याच मुळे कदाचीत तो क्रिकेटचा स्वामी बनला असेल.
माझ्या सारख्या सामान्य मराठी माणसा करता ही
गोष्ट खूप मोठी आहे कि सचिन, लतादीदी, सुनील गावस्कर, नाना पाटेकर, आशाताई,
पु. ल. ही सर्व मंडळी मराठी असून त्यांनी स्वःच्या स्वप्नाकारता जगताना त्याचे सर्व
सामान्य मराठीपण सोडले नाही आणि म्हणूच ते आमच्यातले वाटतात.
आशा या आमचा सचिन आज चाळीशीचा झाला, त्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या. त्याने असेच क्रिकेट खेळत राहावे आणि आम्ही ते
असेच पहावे हेच ईश्वर चरणी मागणे.
वंदे मातरम् विराज
No comments:
Post a Comment