Monday 15 February 2016

#JNU चा अन्वयअर्थ

दहा-बारा वर्षा खालील दोन चित्रपटांची आठवण मला २०१६ च्या सुरवातीच्या पहिल्या दोन महिन्यात झाली, कारण होते राष्ट्रीय पातळीवरील काही घटनानमुळे आणि पुन्हा एकदा विद्यार्थी, विद्यापीठ व युवक राजकारणा याची उजळणी करायला लागलो. अनुक्रमे २००४ आणि २००६ मध्ये दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते एक म्हणजे “युवा” व दुसरा म्हणजे “रंग दे बसंती”. दोन्ही चित्रपट विद्यार्थी, विद्यापीठ व युवकांचे राजकारणावर आधारित होते. दोन्ही चित्रपट वैचारिक दृष्टा अत्यंत खंबीर व स्पष्ट होते व त्यामुळेच मनाला जास्त भावले. हिंदी चित्रपटात  म्हटल्यावर असणारा सगळा मसाला या चित्रपटात होता, पण मनाला भावणारा होत युवकावर आधारित कथानक होते. खरे तर मला “रंग दे बसंती” खूप आवडला, कारण त्यात असलेल्या प्रतीकात्मक क्रांतिकारकामुळे या चित्रपटाने भारतीय युवकांची मने जिंकली. मी हे मान्य करेल की हिंसा कुठल्याही गोष्टीचे फक्त उत्तर नसते आसू शकत नाही व क्रियेला प्रतिक्रिया म्हणून हिंसा मान्य करता येणार नाही. पण हिंसा ही या चित्रपटात व्यवस्था परिवर्तनाचा मार्ग दाखवला आहे.  पण त्याहून हि दुसरा मला जास्त पटला तो म्हणजे “युवा”, या चित्रपटातून दिग्दर्शकाने योग्यपणे त्या दशकातील युवकांचे मार्गदर्शन केले आसे मला वाटते, कारण ज्या पद्धतीने ते चार युवक व्यवस्था बदलण्यासाठी व्यवस्थेत राहून काम करतात व त्यासाठी लढतात हे दिसते. खरे पाहता व्यवस्थेत राहूनच व्यवस्था बदलली जाऊ शकते या मताचा मी असल्यामुळे मला त्या चार युवकांन बद्दल आदर आहे.
हे खरे की २०१४ च्या निवडणुकी नंतर देशात निश्चितच आशादायी वातावरण निर्माण झाले आहे, व भारतीय युवकांची विचारधारा ही बदलली आहे. जागतिक पातळीवर भारताची ताकद म्हणून भारतीय युवक पुढे आला आहे. आज ह्या ताकदीचा उपयोग भारताच्या आणि भारतीयांच्या प्रगतीसाठी व विकासासाठी व्हायला हवा, हि युवा शक्ती राष्ट्र निर्माणच्या कार्यात खर्ची पडायला हवी. आज जग आपल्याकडे(भारतीय युवकांकडे) आशेने बघत आहे.   
मात्र देशा लोकशाही मार्गाने संक्रमण करत असताना भारतीय युवक सुद्ध या संक्रमनाचे भाग होत आहे, व त्यामुळे आशा घटना जन्म घेत आहेत. हे निश्चितचा चांगले आहे की भारतीय युवकांना राजकारणातील व लोकशाहीतील स्वतःचे महत्व समजले आहे मात्र राष्ट्र विघटीत करणाऱ्या शक्ती याचा गैरफायदा घेताना दिसत आहेत. ज्या प्रमाणे आता #JNU सह सर्व घटनातील साम्य एकच आहे, “#भारतीय_युवक”, भारतीय युवक शक्तीला विभाजित करून भारताचे विभाजन करायचे नवे मनसुभे यातून दिसून येतात. भारतीय युवकांच्या मनात विषमतेचे, भेद-भेदाचे विष काही शक्ती पेरत आहेत. ज्या पद्धतीने #JNU मधील घटने मध्ये देशविद्रोहाचे मूळ दिसत आसले तरी “#भारतीय_युवक या विघातक वृत्तीला थारा देणार नाही व भारताची एकता व अखंडता राखण्यासाठी सदैव उभा राहील. या देश विरोधी वृत्तीचा “#भारतीय_युवक” सदैव विरोध करेल आस मला ठाम विश्वास आहे. भारतीय युवक व्यवस्थेत राहून व्यवस्था परिवर्तनावर विश्वास ठेवतो. भारतीय युवकांचा भारतीय संविधानावर पूर्ण विश्वास आहे व त्याचे पालन करण्यास तो कटिबद्ध आहे.


वंदेमातरम्                                              विराज