Saturday 11 September 2021

#वर्षांचा_दिवस_२५४वा ९/११ आणि तालिबान

 आज /११, दहशतवाद असा काही शब्द नसतो आणि दहशतवादी नसतात असे म्हणणाऱ्या अमेरिकेच्या कानाखाली वाजवत अमेरिकेच्याच भूमीवर येऊन हल्ला केला. अमेरिकेचे आर्थिक केंद्र असलेल्या न्यूयॉर्क शहरातील ट्वीन टॉवर वर प्रत्येक्ष विमान घुसवून त्या दोन्ही इमारती पडल्या. १५०० पेक्षा जास्त निरपराध अमेरिकी नगरिकांचा बळी या हल्ल्यात गेला. त्यासोबतच याच वेळी याच दिवशी वेगवेगळ्या पाच ठिकाणी हल्ला झाला, अमेरिकेचे सैन्य मुख्यालय असलेल्या पेंटागॉन वर सुद्धा नागरी विमान पाडण्यात आले. हे सर्व हल्ले नागरी विमानाचे अपहरण करून करण्यात आले. अनेक निरपराध अमेरिकी नागरिकांचा यांत अंत झालं. हा हल्ला इतका मोठा होता कि अमेरिका मुळा पासून हादरली आणि एक विशिष्ठ समाजाचे धर्माच्या नावावर चालणारे हत्याकांड दहशतवाद असतो आणि ते करणे दहशदवादी असतात हे अमेरिकेला मान्य करावे लागले.



भारतासारखे राष्ट्राला त्या अगोदरच्या दशकभरात या सारख्या असंख्य हल्ल्याना सामोरे जावे लागले होते. पाकिस्तान पुरस्कृत दहशदवाद भारतात १९८९ नंतर सुरु झाला तो पूर्ण भारत भर पसरला. या हल्ल्यात अनेक निष्पाप भारतीयांना प्राण गमवावे लागले आहेत अनेक विस्थापित झाले, अनेकांना घरेदारे सोडून जावे लागले. भारत या दहशतवादी कृत्याचा पहिला बळी ठरला होता. रशियाचे १९८९ ला विभाजन होणे, त्यामुळे अफगाणिस्तानातून रशियाने वापस जाणे आणि पाकिस्तानी ISI च्या मदतीने तालिबान अफगाणिस्तानच्या सत्ता केंद्रात येणे. या सर्वा मध्ये अमेरिका ही महासत्ता कायम दिसली /११ नंतर मात्र याच तालिबान ने अमेरिकेवर हल्ला केला त्या हल्ल्याचे कारण देत अमेरिकेने पहिल्यांदा इराण नंतर अफगाणिस्तान बेचिराख केले. अफगाणिस्तानातील तालिबान ला संपवण्यासाठी मागील २० वर्ष अफगाणिस्तानात अमेरिकेच्या फौजा होत्या, तालिबान तर संपला नाहीच पण अमेरिकेने अफगाणिस्तान सोडायच्या आत पुन्हा एकदा तालिबान ने अफगाणिस्तानचा ताबा मिळवला, मागील महिन्यात अमेरिकेने अफगाणिस्तान सोडले आणि ते देश पुन्हा एकदा तालिबानी राजवटी खाली गेला.



याच तालिबान ने शीत युद्धात रशियाचे हस्तक म्हणून काम केले, नंतर ते पाकिस्तान च्या मदतीने अमेरिकेचे पाळीव झाले आणि आता कदाचित त्यांचा वापर पुन्हा एकदा पाकिस्तानच्या (ISI) मदतीने चीन करू पाहत आहे. दक्षिण मध्य आशियातील अस्थिरता चीन ची गरज आहे. अमेरिकेचे अफगानिस्थान मधून जाणे चीन च्या उपयोगी पडणार आहे. आता सध्या निर्माण झालेल्या तालिबान सरकार मध्ये (त्याला सरकार म्हणणे हा विनोद) अनेक मंत्री हे कुख्यात दहशतवादी तर आहेतच त्यांच्यावर संयुक्त राष्ट्राने पकडून देणाऱ्यास (जिवंत/मृत) कोट्यवधींचे इनाम ठेवले आहे. असे सर्व या सरकार मधील मंत्री पाकिस्तानच्या ISI च्या मार्गदर्शना खाली काम करत आहेत चीन या सर्वा साठी पाहिजे ती मदत करत आहे. अमेरिकेने अफगाणिस्तान मध्ये सोडून दिलेली युद्ध सामग्री आणि ISI ची मदत याचा वापर करून पुन्हा एकदा तालिबान भारता साठी डोके दुखी ठरणार आहे. मागील काही वर्षा पासून आर्थिक अडचणीत सापडलेला पाकिस्तानला सुद्धा या मुळे जागतिक पातळीवर महत्व निर्माण हेणार आहे पाकिस्थान त्याचा वापर भारत विरोधी करणार हे निश्चित आहे.

/११ च्या २१ व्या स्मृतिदिनी तालिबान पुन्हा एकदा सक्षम स्थितीत जाऊन बसला आहे. त्याचा मालक बदलला असला तरी ते पाकिस्तान ISI च्या नेतृत्वात काम करणार हे निश्चित....

 

 

विराज वि देवडीकर