Saturday 30 January 2021

गांधी हत्या आणि सावरकरांची बदनामी

 ३० जानेवारी १९४८ रोजी संध्याकाळी दिल्ली येथील बिर्लाभवन मध्ये प्रार्थनेच्या अगोदर एका माथेफिरू तरुणाने महात्मा गांधी यांची गोळी झाडून हत्या केली, नथुराम गोडसे असे त्या माथेफिरू तरुणाचे नाव, त्याच्या सोबत नारायण आपटे आणि उर्वरित पाच जणांना या हत्येच्या कटात शिक्षा झाली. मात्र महात्मा गांधी यांच्या हत्येत सहभाग असल्याच्या आरोपाखाली विनायक दामोदर सावरकर अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी मागील अनेक दशकांपासून सुरु आहे. या हत्येचा अभियोग दिल्ली येथील लाल किल्ल्यात स्थापन झालेल्या विशेष न्यायालयात चालला, न्यायालयाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना निर्दोष ठरवून मुक्त केले होते,  त्या (स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या) निर्णया विरोधात पंजाब उच्च न्यायालयात अपील सुद्धा शासना तर्फे करण्यात आलेले नाही. तरीही मागील अनेक वर्षा पासून स्वा. सावरकरांना या हत्येत गोवण्याचा व बदनाम करण्याचा प्रयत्न काही घटकां तर्फे करण्यात येत आहे. "गांधी हत्या आणि सावरकरांची बदनामी" या प्रा. शेषराव मोरे यांच्या पुस्तकात या पूर्ण खटलया विषयी आणि स्वा. सावरकर यांच्या बदनामी विषयी विस्तृत माहिती दिली आहे. महत्वाचे म्हणजे सबळ पुरावे व योग्य संदर्भ या पुस्तकात दिले आहेत.


न्यायपत्रात स्वा. सावरकरांच्या विषयीचा निकाल पुढील प्रमाणे आहे, " त्यांच्यावर (वि. दा. सावरकर) आरोपपत्रात ज्या आरोपांचा उल्लेख करण्यात आला आहे, त्या संबंधात ते दोषी आढळले नाहीत ( He is found 'not guilty') आणि त्यांना त्यातून निर्दोष ठरविण्यात येत आहे (acquitted thereunder). २०४ पृष्ठाच्या  निकालाच्या टंकलिखितात पृ. १७७ वर न्यायालय लिहिते, " वर सांगितल्याप्रमाणे विनायक दा. सावरकरां विरुद्ध फिर्यादी पक्षाची बाजू केवळ माफीचा साक्षीदार व  केवळ त्याच्या साक्षीवर आधारलेली आहे. वर हेही सांगितले आहे की, केवळ माफीदाराच्या साक्षीवर आधारून विनायक दा सावरकरां विरुद्ध काही निष्कर्ष काढणे धोकादायक ठरेल." याच टंकलिखितात न्यायालय २०/०१/१९४८ च्या बॉम्ब स्फोटात व ३०/०१/१९४८ च्या प्रत्यक्ष हत्येत स्वा. सावरकरांचा हात होता असे गृहीत धरण्याचे कोणतेही कारण नाही. तेव्हा न्यायालयाने स्वा. सावरकरांना निर्दोष ठरवताना 'पुरावा नसणे' ही जी मूलभूत कसोटी लागते, त्या आधारे निर्दोष ठरविले होते, संशयाचा फायदा घेऊन मुक्त केले नव्हते.

विरोधक ज्या कपूर आयोगाचा स्वा. सावरकर यांच्या बदनामी करिता विशेष उल्लेख करतात त्याविषयी थोडे, या आयोगाची नियुक्ती करण्यामागचे करणं म्हणजे, १९६४ रोजी या हत्येतील सहभागी व ज्यांनी जन्मठेपेची शिक्षा झाली होती असे गोपाळ गोडसे, विष्णू करकरे आणि मदनलाल पाहवा त्यांची शिक्षा भोगून सुटका झाल्यावर दि १२ नोव्हेंबर १९६४ रोजी पुणे येथे त्यांच्या चाहत्यांनी सत्कारासाठी सार्वजनिक पूजेचे आयोजन केले होते. या सत्कार व पूजेस केसरीचे माजी संपादक व तरुण भारत चे तेव्हाचे संपादक गजानन विश्वास केतकर अध्यक्ष होते त्यांनी आपल्या भाषणांत सांगितले की, गांधीजंच्या हत्येचा विचार चालू असल्याची पूर्वकल्पना त्यांना होती. त्याकरिता ते नथुराम गोडसे यांच्या शिवाजी मंदिर पुणे येथील जुलै १९४७ च्या सभेची आठवण करून देतात, त्यात " गांधीजी म्हणतात की, मी १२५ वर्ष जगणार आहे, होय पण त्यांना कोणी जगू दिले तर ना!" या वाक्याची आठवण करून देतात. या सभेस काँग्रेस चे कार्यकर्ते बाळू काका कानिटकर उपस्थित होते व यांच्या मार्फत त्यावेळेच्या मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब गंगाधर खेर यांना पत्रा द्वारे कळवली होती. या वक्तव्य नंतर विधानसभेत व लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला व या प्रकरणाची अधिक चौकशी मागणी करण्यात आली, या कारण्यासाठी २२ मार्च १९६५ रोजी कपूर आयोगाची नेमणूक झाली. द कमिशन्स ऑफ इन्क्वायरी ऍक्ट १९५२ नुसार कामकाज करणे अपेक्षित होते, न की स्वा. सावरकरांच्या निर्दोषत्वा वर टिपण्णी करणे. कोणत्याही आयोगाची निर्मिती एखाद्या विशिष्ट् प्रकरणाची चौकशी साठी नेमला जातो, त्याला उच्चस्थरीय चौकशी करण्याचे अधिकार आहेत पण न्यायालय देतात तसे  देण्याचा अधिकार कोणत्याही आयोगाला नसतो. या आयोगाने सावरकरांना गांधी हत्येसाठी दोषी ठरवले, जे कि या आयोगाच्या कार्यक्षेत्रात नव्हते. आयोगाने स्वा. सावरकरांवर दोष ठेवला, या खटल्यातील एकमेव माफीचा साक्षीदार असलेल्या दिगंबर बडगे यांची चौकशी या आयोगाने केली नाही, आयोगाच्या कार्यकाळात दिगंबर बडगे ह्यात होते व ते मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसरातील पोलीस चाळीत राहायला होते. अशा महत्वाच्या व्यक्तीची चौकशी आयोगाने केली नाही.

गांधी हत्या व कोणतीही हिंसा याचे समर्थन मला करायचे नाही, पण स्वा. सावरकरांना या हत्येमध्ये गोवण्याचा खूप मोठा प्रयत्न झाला होता असे नक्की जाणवते.

 

धन्यवाद                                                                              विराज वि देवडीकर

 

 

(या लेख करिता चे संदर्भ "गांधी हत्या आणि सावरकरांची बदनामी" या पुस्तकातील आहेत)

Sunday 24 January 2021

राष्ट्र मंदिरातील श्रीराम ....

 जय श्रीराम

 

मागील १०-१२ दिवसा पासून वेगळाच दिनक्रम चालू आहे, संध्याकाळ झाली की सहा-साडे सहा पर्यंत ऑफिस चे काम संपवायचे आणि घर गाठायचे, अर्धा तासाची विश्रांती आणि पुन्हा सात वाजता अभियानाची सुरवात, हो श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निधी संकलन अभियानात या काळात काम करण्याचे सौभाग्य मिळाले, दिलेल्या वस्ती मध्ये, नागरी सोसायट्यां मध्ये, कधी बाजारात तर कधी सेवा वस्त्यांमध्ये जाऊन निधी संकलन तर करायचेच पण त्यापेक्षा सुद्धा महत्वाचे म्हणजे सर्वसामान्यांना राम मंदिरा बद्दल माहिती करून द्यायची अशी जवाबदारी घेतली आणि कामाला १५ तारखे पासून सुरु झाले. त्यात प्रत्यक्ष लोकं मध्ये जाऊन काम करण्याची संधी/ निधी संकलनाची संधी मिळत आहे. घरोघरी जाऊन, प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधून राम मंदिरा विषयी चर्चा करायची संधी मिळत आहे, त्यांचा मनातील राम जाणून घेण्याची संधी मिळत आहे. 

भारताच्या आणि भारतीयांच्या मनामनात राम आहे, अखंड भारतवर्षाचा आपण अभ्यास केला तर आपल्याला जाणवून जाते राम भारताच्या संस्कृती व समाज जीवनाचा भाग बनून गेला आहे, रामगड, रामनगर, रामवाडी, रामटेकडी, श्रीरामपूर असे गावाच्या नावावरून रामाशी नातं सांगणारे अनेक जण आहेत तसेच राम, श्रीराम, राम्म्या,सीताराम, रघुनाथ, राघव असे स्वतःच्या नावाने नाते सांगणारे अनेक जण या भारत भूमीत आपल्याला भेटीला, पण त्याहून ही महत्वाचे म्हणजे राम नाम अनेकांच्या मना मनाला साधणारा सेतू आहे असे आपल्याला जाणवते. या अभियाना निमित्याने काम करताना असे अनेक राम मला भेटायला लागले, प्रत्यक्ष स्वरूपात मूर्त रूपात दिसले. लहान बालकांचा राम वेगळा बाळ गोपाळांत खेळणारा राम भेटला जो वडीलधाऱ्यांचा मान राखतो, त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानतो, सत्याचे पालन करितो, ज्ञान साधना आणि विज्ञान यावर विश्वास ठेवतो असा बाल राम भेटला. कोदंडधारी राम तरुणांचा राम भेटला ज्याची समाजाप्रती काहीतरी करण्याची भावना आहे, ज्याला आपल्या क्षेत्रांत कार्य करताना राष्ट्र व धर्म सेवा करायची आहे असा तरुण राम भेटला वृद्धांचा पूर्ण पुरषोत्तम राम भेटला, माता भगिनींचा रक्षण करिता राघव भेटला, असे अनेक राम अनेक रूपात भेटले.



प्रत्येकाच्या मनातील राम वेगळं आणि त्याची रामा वरील प्रीती वेगळी, या अभियानात अनेक अनुभव येत आहेत, राम या नावा वरील भक्तीचा प्रत्येय या काळात घेत आहे, निधी संकलना बरोबर लोकांच्या राम भक्तीचे सुद्धा संकलन या वेळी होत आहे असे वाटते, काही ठिकाणी बाल गोपाळांनी आपला खाऊचा वाट मंदिर निर्माणा साठी या अभियानाला देत आहेत तर कुठे वृद्ध माता-पित्यानी आपल्या निवृत्त संचयातील वाट या अभियानास देत आहेत, सेवा कार्य करणाऱ्या सेवेकार्यानी आपले योगदान देत आहेत. उद्योग-धंदे, व्यवसाय, नोकरी करणाऱ्या लोकांनी यथा शक्ती योगदान दिले, शेतकरी कष्टकऱ्यांनी आपला राम जपत खारीचा वाटा उचलला आहे. समाजातील प्रत्येक घटक कोठे न कोठे स्वतःला राम मंदिराशी जोडत आहेत राम कार्याशी नातं सांगत आहेत. अनेक हातानी अनेक मनानी हे राम मंदिर उभे राहणार आहे. निधी-रक्कम यातून मंदिराचे बांधकाम उभे राहिल, पण या असंख्य मनांच्या जोडणीतून श्रीरामाची प्रतिस्थापना होणार आहे.

राम सर्वत्र आहे, चराचरात आहे, राम सर्व मानवात आहे पण मंदिर आमच्या अस्मितेचे प्रतीक आहे, प्रेरणेचे केंद्र आहे आणि भविष्यातील पिढी साठी एकात्मतेचे शक्ती पीठ असेल.

 

धन्यवाद                                                                                         विराज देवडीकर

viraj.devdikar@gmail.com


Saturday 23 January 2021

हरिपुरा काँग्रेस १९३८,

 गुजरात मधील सुरत जिल्यातील हरिपुरा येथे काँग्रेस चे १९३८ चे अधिवेशन झाले, भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या दृष्टीने आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नेतृत्व देशव्यापी होण्यासाठी महत्वाचे ठरलेले हे अधिवेशन होते. हे अधिवेशन १९ ते २२ फेब्रुवारी १९३८ या कालावधीत घडले, हे काँग्रेस चे ५३ वे अधिवेशन होते आणि याचे अध्यक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस होते. हा काळ असा होता जेव्हा काँग्रेस मध्ये सुभाष बाबू आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे प्रसिद्धीत होते, विशेष करून सुभाष बाबू तरुणाचे आवडते व प्रिय देशव्यापी नेतृत्व बनत होते. हाच काळ होता जेव्हा गांधींची काँग्रेस पासून वेगळे होण्याचा किवां निवृत्त होण्याचं विचार करता होते व "हरिजन" उद्धाराचे कार्य करत होते. सुभाष बाबू आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मैत्री तर होतीच पण काही साम्य सुद्धा होते, दोघे ही उच्च विद्याविभूषित, तरुण, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दोघं वरती असलेला साम्यवादाचा प्रभाव यामुळे ते बरोबरीचे व तुल्यबळ काँग्रेस मधील नेतृत्व होते. तरुणांना आकर्षित करणारे वक्तृत्व सुभाष बाबुंचे होते, काँग्रेस या काळात दोन विचारधारेत विभागलेली दिसते पुराणमतवादी (conservative) आणि मूलगामी (radical) या पार्श्वभूमी वरती नेताजी सुभाषचंद्र बोस हरिपुरा काँग्रेस चे अध्यक्ष म्हणून निवडून आले.


या काँग्रेस अधिवेशनात सुभाष बाबू आणि गांधीजी यांच्यातील मतभेद स्पष्टपणे लोकांच्या समोर आहे, भारताला द्वितीय महायुद्धात ओढण्याच्या ब्रिटिश सरकारच्या धोरणाच्या विरोधात सुभाष बाबू होते, त्यानं ब्रिटिश सरकारच्या राजकीय अस्थिरतेची पूर्ण कल्पना होती व त्याचा भारतीय स्वातंत्र्य करता उपयोग कसा करता येईल याचा विचार ते करता होते. अर्थात गांधीजींचा याला विरोध होता. याच अधिवेशनात सुभाष बाबूंच्या नेतृत्वाखाली ठराव संम्मत करण्यात आला ज्यात गांधीजींच्या अहिंसा आणि सत्याग्रह या तत्वांना बगल देत, ब्रिटीश सरकारला निर्वाणीचा इशारा देत ६ महिन्यात भारत सोडण्यास सांगण्यात आले. या मुळे गांधीजी व्यथित झाले व त्यांच्यात आणि सुभाष बाबूत दारी निर्माण झाली. National Planning Committee हे सुद्धा गांधीजी आणि सुभाष बाबूंच्या वाद होण्याचे कारण होते, याच अधिवेशनात सुभाष बाबूंनी या समितीची स्थपणा केली, हि समिती औद्योगिकीकरनाच्या आधारे भारताच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्न करणार होती पण या समितीचे उद्दिष्टे गांधीजींच्या "चरखा" धोरणाशी  होते त्यामुळे सुद्धा गांधीजी सुभाष बाबूंशी नाराज होते. १९३९ च्या त्रिपुरी काँग्रेस मध्ये सुभाष बाबू स्पष्ट बहुमताने निवडून आले त्यांनी यावेळी गांधीजी समर्थक डॉ पट्टाअभी सीतारामय्या यांचा पराभव केला,  परंतु गांधीजींच्या विरोधा मुळे सुभाष बाबूंना त्रिपुरी काँग्रेस च्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. या नंतर सुभाष बाबू काँग्रेस पासून कायमचे दुरावले, त्यांनी स्वतःचा स्वतंत्र मार्ग स्विकारला भारताच्या स्वातंत्र्यासाठी.... 


 

 

 

 

https://www.gktoday.in/gk/subahsh-chandra-bose-and-congress-haripura-session-1938/



धन्यवाद
#Thread #थ्रेड #मराठी

लेखा बद्दल जरूर शेअर करावा
viraj.devdikar@gmail.com