Wednesday 8 November 2017

हो मी नोटबंदीचे (निश्चलनीकारणाचे) समर्थन करतो...

हो मी नोटबंदीचे (निश्चलनीकारणाचे) समर्थन करतो, मी या देशाचा एक सामान्य नागरिक आहे, माझा मी निवडून दिलेल्या सरकार वर पूर्ण विश्वास आहे आणि संविधानाचा मी आदर करतो. हो मला बदलाची ही अपेक्षा आहे व त्या बदला करिता कष्ट घेण्याची तयारी आहे. 
नोटबंदी ही भ्रष्टाचार निर्मूलना करिताचा एक मार्ग आहे, वर्षानुवर्षे अस्तित्वात असलेला व खोलवर गेलेला भ्रष्टाचार एकाच प्रयत्नंत संपणार नाही असे अनेक व वेगवेळ्या प्रयत्नातून नाहीसा होईल. ज्या देशात भ्रष्टाचाराबद्दल बोलले जात नव्हते, तो संपवण्याकरिता कासलाही प्रयत्न केला जात नव्हता, भ्रष्टाचारामूळे अर्थव्यवस्था पोखरली जात होती, समाजातील सामान्य घटक मग तो कामगार वर्ग असेल, शेतकरी असेल ते त्रस्त झाले होते. अशावेळी नोटबंदी च्या निर्णया मूळे भ्रष्टाचाराला अंकुश लागला आहे असे मला वाटते. रोखीचे व्यवहार कमी होऊन बँकेद्वारे व्यवहार वाढले आहेत. बँकिंग व्यवस्थेला केंद्रीभूत करण्याचा हा एक प्रयत्न आहे. चेक, NEFT, नेट बँकिंग चा वापर मोठ्याप्रमाणावर वाढला आहे. व्यापार करण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे, व्यापारीवर्गाची मानसिकता बदली आहे. व्यापार जास्तीत जास्त पारदर्शक होताना दिसत आहे. करदात्यांची संख्या वाढली आहे व त्याचा सकारात्मक परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. विकासाचे किती तरी प्रकल्प सुरू झाले आहेत. 

१) मागच्या वर्ष भरात दगड फेकीच्या घटना ७५% कमी झाल्याच्या दिसून आले आहे. विशेष करून जम्मू आणि काशमीर राज्यात.
२)मागील वर्षात ७.६२ लाख खोट्या नोटा (Counterfeit currency) सापडली.
३) दहशतवादी व नक्षलवादी हल्ल्यात निर्णयाकरीत्या कमी झालेले दिसत आहेत.
४) संशयास्पद १७.६२ लाख केसेस असे सापडलेत ज्यात ठेवलेली रक्कम आणि टॅक्सचा भरणा मिळता जुळता नाही. 
५) तसेच ३.६८ लाख करोड रुपये आणि २३.२२लाख बँक खाते तपासणी चालू आहे
६) निश्चलीकारणा नंतर १६,००० करोड रु बँकेत आलेले नाहीत.
७)  २९,२१३ कोटी चे अज्ञात उत्त्पन्न सापडले आहे.
८) १६२६ कोटींची बेनामी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
९) EPFO आणि ESIC मध्ये अनुक्रमे १.०१ करोड आणि  १.३ करोड कामगार व कर्मचारी वर्गाची नोंदणी मागील वर्षभरात झाली आहे. 
१०) टॅक्सभोक्त ची संख्या ८४.२१ लाखा वर पोहचली यात २६.६% वाढ मागच्या वर्षभरात दिसली आहे. तर IT Returns भरणाऱ्यांच्या संख्येत २७.९५% (३.०१करोड) वाढ झाली आहे.
११) उच्च चलनी नोटांची संख्या १७ लाख करोड वरून १२ लाख करोड वर आली आहे यात ६ लाख करोड नी घट झाली आहे. 
 व्यवस्था बदल होताना त्याच्या झळया सर्वानाच बसणार आहेत त्यामुळे या काळात जे सर्व सामान्य लोकांना त्रास झाला किंवा रांगेत उभे राहिल्यामुळे ज्यांचे मृत्यू झाले त्याच्या बद्दल मला सहानभूती आहेच, कारण मी सुद्धा या व्यवस्थेचा भाग आहे आणि त्या रांगेत मी सुद्धा  उभा होतो. 
देश बदलत आहे आणि मी या बदला करीत तयार आहे. 

वंदे मातरम                                                                                                         विराज