Friday 14 August 2020

अखंड भारत संकल्प दिन

 आज १४ ऑगस्ट, अखंड भारताचे दोन तुकडे होऊन आज ७३ वर्ष झाली. फाळणीच्या दुःखद आणि भयावह आठवणी अजून सुद्धा ताज्या आणि ठसठसत्या आहेत. भारताची दुर्दैवी फाळणी धर्माच्या आधारावर झाली होती हे आपल्याला लक्षत घ्यायला हवे. सांस्कृतिक दृष्ट्या अफगाणिस्थान पासून ब्रम्हदेशा पर्यंत एकत्र असलेला भूभाग हजारो वर्षाच्या अनेक आक्रमणात टाकलेला होता तो १३ ऑगस्ट १९४७ पर्यंत मात्र १४ ऑगस्ट १९४७ रात्री भारताच्या सांस्कृतिक एकतेवर घाव घालत देशाचे दोन तुकडे झाले. सप्तसिंधु नद्यांच्या खोऱ्यात विकसित झालेली सनातन भारतीय संस्कृतीत आज त्याच सप्तसिंधूंची कमतरता आहे, उणीव आहे. हा आताचा राजकीय इतिहास आहे, आता त्यात कोणी बदल करू शकत नाही. पण अशी धर्मावर आधारित फाळणी रोखता आली असती का? हा प्रश्न नक्कीच आपल्या सर्वांच्या मनात येत असतो.

मुस्लिम लीक असेल किंवा महंमद आली जिना असतील त्यांच्या कडून स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी होणे अपेक्षितच होते व ती त्यांची राजकीय व धार्मिक गरज होती, या विषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या "पाकिस्तान अर्थात भारताची फाळणी" या पुस्तकात सविस्तर प्रकरण लिहले आहे. मुघलांच्या पडावा नंतर ब्रिटिश राजवटी मुळे सर्वात जास्त नुकसान इस्लामिक राजवटीचे झाले, ब्रिटिशांनी भारत काबीज केल्या पासून प्रशासनात, कायद्यात बदल केला त्यामुळे मुसलमानांची अधोगती सुरु झाली. ब्रिटिशांनी मुस्लिम फौजदारी कायद्यात बदल केला व नवे कायदे लागू केले, मॅकेलो लागू केला. मुस्लिम नागरी कायद्याचे क्षेत्र (म्हणजे शरियत) कमी केले. १८३७ पासून न्यायालये प्रशासनातील फारशी भाषेचा वापर कमी करून इंग्रजी भाषेचा वापर वाढवला. ६०० वर्ष मुस्लिम भारताचे व पर्यायांने हिंदूंचे राज्यकर्ते होते, ब्रिटिशांच्या आगमन नंतर मुसलमानांना हिंदूंच्या पातळीवर आण्यात आले. (पानं क्र. ३६,३७) ब्रिटिश राजवटी मुळे भारतातील इस्लामिक राजवट संपुष्टता तर आलीच पण त्यामुळे भारत काफिरांचा देश/भूमी बनला, दारुल-हरब असलेला भारत पुन्हा एकदा दारुल-इस्लाम बनवणे ही धार्मिक गरज त्यावेळेसच्या पाकिस्तानच्या निर्मात्यांची होती हे नक्की आहे. अखंड भारताच्या फाळणीस महत्वाचे कारण हे एक आहे. याचाच एक प्रयत्न म्हणून आलेली "१९४६ ची त्रिमंत्री योजना" (1946 Cabinet Mission to India), ही योजना मुस्लिम लीक ने स्वीकारली होती. त्या योजनेतून भारताच्या सत्तेचे त्रि-केंद्रीकरण त्यांना मान्य होते. मात्र काँग्रेस व इतर भारतीय नेत्यांनी हि योजना फेटाळली व त्याचा विरोध म्हणून १६ ऑगस्ट १९४६ रोजी महंमद आली जिना ने "डायरेक्ट ऍक्टिव कॉल" दिला व त्यानंतर उसळलेल्या दंगलीत बंगाल प्रांत (कोलकाता) येथे ४००० (सरकारी आकडा) लोकांचे हत्याकांड झाले. (याची लिंक खाली दिली आहे) यातून भारताचे विभाजन करून किंवा अखंड भारतावरती पुन्हा एकदा मुस्लिम शासन आणणे हे एकमेव उद्दिष्ट आपल्याला दिसते.  

अखंड भारताचे तुकडे झाल्यानंतर हातात आलेला भारत एक संघ ठेवणे हे सुद्धा खूप कठीण कार्य होते, फाळणी मुळे झालेली लोकसंख्येची आदला बदल व त्यामुळे उसळलेल्या दंगली भारताच्या वेदनेत भर घालत होत्या, सामूहिक हत्याकांड आणि बलात्कारा मुळे भारतीय समाजातील समतोल ढासळत होता, ब्रिटिशांनी देश सोडते वेळी ५६५ princely states म्हणजे संस्थानिक होते व भारतात सामील होण्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार ब्रिटिशांनी या संस्थानिकांना दिला होता, छोटया मोठ्या प्रत्येक संस्थानिकांची वेगवेगळ्या अटी/मागणी भारतात सामील होण्याकरिता ठेवलेल्या होत्या, सरदार वल्लभ भाई पटेलांच्या मुसद्देगिरी आणि कुशल नेतृत्वा मुळे या तील बहुसंख्य संस्थानिक भारतात सामील झाले, गृह खाते व अंतर्गत सुरक्षेची जवाबदारी त्यांच्यावर होती, त्यांच्या खंबीर नेतृत्वा मुळे अनेक संस्थानिक भारतात सामील झाले. जम्मू-काश्मीर, जुनागड आणि हैद्राबाद या तीन संस्थानिकांनी सुरवातीस भारतात सामील होण्यास विरोध दर्शवला या पैकी जम्मू-काश्मीर मध्ये हिंदू राजे व मुस्लिम प्रजा होती तर जुनागड व हैद्राबाद मध्ये मुस्लिम राजे व हिंदू प्रजा होती.  योग्य वेळी व योग्य पध्द्तीने या तीन संस्थानिकांना सामील करून घेतले नसते तर कदाचित भारताच्या वेगवेगळ्या भागात दहशद माजवण्यासाठी भारता विरुद्ध छुपे युद्ध (proxy war) लढण्यासाठी पाकिस्थानला या प्रदेशांचा वापर करून घेता आला आसता. कारण हे तिन्ही प्रदेश पाकिस्थानात सामील व्हावेत किंवा स्वतंत्र राहावेत असा प्रयत्न पाकिस्तान त्यावेळी करत होता. भारताची फाळणी करताना भविष्यात कशा प्रकारे भारताचे अजून तुकडे पडू शकतील याचा विचार नक्कीच त्यावेळेसच्या पाकिस्तानच्या निर्मात्यांनी केला होता असे म्हणावे लागेल. आज पाकिस्तान भारताचे अजून विभाजन करू शकेल अशा तोडीचे राष्ट्र राहिलेले नाही. पण येणाऱ्या काळातील धोका ओळखून चीन च्या आक्रमक पावलांचा रोख आपल्याला घ्यायला हवा, भारताचे शेजारी नेपाळ, पाकिस्तना, श्रीलंका या तिन्ही देशाची राजवट चीनच्या इशाऱ्यावर चालत आहे हे आपल्याला लक्षत घ्यायला हवे. त्यामुळेच नेपाळ आपल्या राजकीय नकाशात भारताची भूमी दाखवतो तर पाकिस्तात जुनागड सहित जम्मू काश्मीरच्या नवीन राजकीय नकाशा मांडतो. हे पुन्हा एकदा अधोरेखित होते की भारताच्या अखंडतेला धक्का पोहंचवण्याचे काम हे राष्ट्र करत आहेत. आक्सई चीन किंवा तिबेट चा भाग आपण "गवताचे साधे पाते उगवत नाही" म्हणून सोडून दिला, तोच ओसाड खनिज द्रव्याने संपन्न भाग आपण चीनच्या घशात घातला, पूर्व-उत्तर राज्यांच्या बाबतीत सुद्धा असेच ढसाळ धोरण आपले आता पर्यंत होते, अरुणाचल प्रदेशा वरती चीन ने हक्क सोडलेला नाही. बांगलादेश आणि ब्रम्हदेश या भागातून शरणार्थी या भागात घुसताच आहेत. तामिळनाडूत तामिळ राष्ट्रवाद व पंजाब मधील खलिस्तान याच्या झळा आपण सोसल्या आहेत. 

असंख्य प्रयत्न भारताला तोडण्याचे मागच्या हजारो वर्षात झाले व होत आहेत. हा देश म्हणजे फक्त भौगोलिक प्रदेश नाही, तो एक जिवंत राष्ट्रपुरुष आहे. ज्याच्या नसा-नसात वाहणाऱ्या असंख्य नद्या आणि त्या नद्यांच्या खोऱ्यात विकसित झालेली हिंदू संस्कृती या राष्ट्रपुरुषाला अमर करत आहे. अटल जींच्या कविते प्रमाणे

यह चन्दन की भूमि है, अभिनन्दन की भूमि है,

यह तर्पण की भूमि है, यह अर्पण की भूमि है।"

अखंड भारत संकल्प हमारा, अखंड हिंदुस्थान साध्य हमारा

धन्यवाद

विराज देवडीकर

(viraj.devdikar@gmail.com)

Imp Links

1)      https://en.wikipedia.org/wiki/Direct_Action_Day

2)      "पाकिस्तान अर्थात भारताची फाळणी" by  Dr. B R Ambedkar