Tuesday 6 September 2016

राजकीय-सामाजिक पडघम mid 2016

मागील काही दिवसा पासून राजकीय व सामाजीक घटनांचा आढावा घेतल्यास आपल्याला लक्षात येईल की जस-जसे उत्तर प्रदेशातील निवडणूक जवळ येत आहे तस-तसे महाराष्टातील व देशातील राजकीय वातवरण आणखीनच ढवळून निघत आहे. तस वरकरणी बघायला गेल तर महारष्ट्र व उत्तर प्रदेशाच्या निवडणूकीचा फारसा काही संबंध नाही व उत्तर प्रदेश कोणाकडे जरी गेला तरी महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा परीणाम होणार नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. पुढच्या वर्षी म्हणजे २०१७ ला उत्तर प्रदेशाची निवडणूक आहे, त्याच बरोबर महाराष्ट्रात मुंबई सह काही महानगरपालिकाच्या निवडणुका आहेत व या वर्षाच्या शेवटी नगरपालिकंच्या निवडणुका आहेत. अजून एक व अत्यंत महत्वाचे म्हणजे २०१६ नोव्हेंबर ला मोदी सरकारला अडीच वर्ष पूर्ण होईल तर २०१७ मार्च-एप्रिल मध्ये फडणवीस सरकार अर्धा कार्यकाळ पूर्ण करेल. मागील काही महिन्यातील राजकीय घटनांच्या मांडणी खालील प्रमाणे दिसते,

१)      देशात जाती-जातीतील सलोखा बिघडवणे :-
आज देशात त्या-त्या राज्यात बहुसंख्य असणाऱ्या समाजातील (जातीतील) वातावरण बिघडवणे व एकूणच देशाची व राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम दिसून येते. जसे की हरियाना-जाट, गुजरात-पटेल, महाराष्ट्र-मराठा, बिहार उत्तर प्रदेश-यादव. यातून मताचे ध्रुवीकरनकरणे व येणाऱ्या निवडणुकीत प्रादेशिक पक्षांना त्याचा फायदा होताना दिसेल.
२)      प्रादेशिक पक्षांचे महा-गटबंधन :-
बिहार निवडणुकीच्या धर्तीवर, प्रादेशिक अस्मिता घेऊन जन्माला आलेल्या या प्रादेशिक पक्षाचे राजकारण एका प्रदेशां पुरते मर्यादित असले तरी शत्रूचा-शत्रू मित्र या नियमाने या महा-गटबंधनची मांडणी होताना दिसत आहे. राष्ट्रीय पक्षांना रोखण्यासाठी एकत्र येऊन प्रादेशिक पक्षांचे महा-गटबंधन २०१९ च्या निवडणुकीची तयारी होताना दिसत आहे. या महा-गटबंधन ला कॉंग्रेसचा छुपा पाठिंबा आसू शकतो.  
३)      उत्तर प्रदेशाच्या निवडणुका :-
येणाऱ्या वर्षात उत्तर प्रदेशात विधान सभेच्या निवडणुका आहे व उत्तर प्रदेशातील निवडणुकीवर २०१९ ची निवडणूक अवलंबून आहे, आसे जाणकारांना वाटते. उत्तर प्रदेश ज्याच्या हातात त्याला दिल्ली जिंकणे सोपे जाते. २०१४ निवडणुकीत उत्तर प्रदेशातील ८० जागांपैकी ७१ जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या होत्या. हि भा.ज.प. ची दौड रोखण्यासाठी व प्रादेशिक पक्ष सत्तेत राहण्यासाठी या प्रकारच्या राजकीय मांडणी होताना दिसत आहे.
४)      मुंबई महानगर पालिका व इतर स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका:-
येणाऱ्या वर्षात मुंबई महानगर पालिका व इतर स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका महाराष्ट्रात होत आहेत आणि फडणवीस सरकारची कसोटी या निवडणुकीत लागणार आहे. मुंबई महानगर पालिकेत पुन्हा सेना-भाजपा युती झाली नाही तर हे सरकार पाडले जाऊ शकते व त्यानंतर येणाऱ्या मध्यावधी निवडणुकीकरताची मोर्चा बांधणी यातून दिसून येते.

एकूण काय? तर सरकार प्रती अविश्वासाचे वातावरण निर्माण करणे हे एकाच उद्धिष्ट या राजकारणा मागे दिसून येते.


वंदेमातरम्                                                   विराज