Sunday 20 October 2019

विधान सभा २०१९ चा Google Trends


आज महाराष्ट्राच्या विधान सभा निवडणुकी करिता मतदान झाले आहे, येत्या २४ तारखेला मतमोजणी होईल व नक्की कोणाच्या बाजूने महाराष्ट्रातील जनतेने मतदान केले आहे ते कळेल. महाराष्ट्रातील जनतेने कोणाला स्वीकारले आणि कोणाला नाकारले हे २४ ला स्पष्ट होईल.  कोणत्या उमेदवार जिंकला कोणता पराभूत झाला, कोणत्या पक्षाचे किती संख्याबळ असेल, नवीन विधान सभा पूर्ण बहुमतातली असेल की त्रिशंकू असेल, कोणाच्या पाठिंब्या वरती नवीन सरकार निर्माण होईल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पुढील एक दोन आठवड्यात आपल्याला मिळून जातील. दिवाळी नंतर स्थापन निर्मितीच्या हालचाली सुरु होतील, आणि कदाचित १ नोव्हेबर पर्यंत महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्र्यांचा शपत विधी झाला असेल.
मार्केट रिसर्च आणि psephology या विषयांचा अभ्यास करताना मागील काही महिन्यात पासून या विधान सभा २०१९ च्या निवडणुकीचा आणि मतदारांच्या कलांचा (trends) चा अभ्यास करायचा ठरवले आणि त्याकरिता माध्यम निवडले "Google". साधारणपणे दोन तीन महिन्याखाली लोकसत्ता या नियतकालिकात एका आर्टिकल वाचण्यात आले. लोकसभा २०१९ च्या मतदारांच्या ट्रेंड्स चा अभ्यास केलेला लेख आला होता, त्या लेखा मुळे google trends या टूल विषयी माहिती कळली, विधानसभा २०१९ चा अभ्यास करताना Google Trends चा वापर करायचे ठरवले. Google Trends हे google नी मोफत उपलब्ध करून दिलेले टूल आहे त्याच्या वापर करून आपण ठराविक काळातील व ठराविक भौगोलिक परिसरातील लोकांच्या आवडी निवडी जाणून घेऊ शकतोत. अर्थात हे फक्त search engine वर केलेला search आहे, व त्या द्वारे आपल्याला हे जाणून घेता येते की ठराविक काळात व ठराविक भौगोलिक परिसरातील लोकांनी कोणत्या शब्दा चा Google वर सर्वात जास्त वेळा वापर केला किंवा त्याचा शोध घेतला. या टूल चा वापर करून महाराष्ट्रातल्या विधान सभा निवडणुकीचा चेहरा निर्माण करण्याचा मी प्रयत्न केला आहे. तो आज आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. या आभ्यासासाठीच्या नोंदी २०/१०/२०१९ ला १६.०० ते १८.०० या वेळेत घेतल्या आहेत, तर या अभ्यासाचा कालावधी मागील ३० दिवसांचा आहे. याकरिता महाराष्ट्र हा भौगोलिक परिसराची निवड केली आहे. 


प्रश्न १:- मागील ३० दिवसात सर्वात जास्त google वर शोध (Search) झालेले पक्ष (यात १०० हे फक्त एकक असून ते कोणत्याही प्रकारे मोजमापाचे प्रमाण नाही)
भारतीय जनता पक्ष या शब्दाचा शोध मागील ३० दिवसात महाराष्ट्रातील जनतेने google घेतला आहे, असे दिसते. 
प्रश्न :- मागील ३० दिवसात महाराष्ट्रातील जनतेने सर्वात जास्त google वर शोध (Search) केलेले राष्ट्रीय नेतृत्व (यात १०० हे फक्त एकक असून ते कोणत्याही प्रकारे मोजमापाचे प्रमाण नाही)
या प्रश्नात अर्थात नरेंद्र मोदी यांच्या नावाने सर्वात जास्त वेळा search झालेले आपल्याला दिसेल, अमेरिकेचा दौरा व तेथील माननीय पंतप्रधानांचे भाषण याच काळातले, त्यामुळे त्याचा या search वर परिणाम नक्की झाला आहे. त्या नंतर शरद पवार यांचे नाव आहे, कारण ते महाराष्ट्रातील एक महत्वपूर्ण नेते आहेत व एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. पण या काळात राहुल गांधी यांच्या नावाचा शोध महाराष्ट्राच्या जनतेने खूप कमी केलेला दिसत आहे. 

प्रश्न ३ :- मागील ३० दिवसात महाराष्ट्रातील जनतेने सर्वात जास्त google वर शोध (Search) केलेले राज्य पातळीवरील नेतृत्व (यात १०० हे फक्त एकक असून ते कोणत्याही प्रकारे मोजमापाचे प्रमाण नाही)

या मध्ये प्रमुख राजकीय पक्षातील मुख्यमंत्री पदाचे उमेदवार यांची नावे घेतली आहेत. राज्यस्थरावरील नेतृत्व थोड्याफार फरकाने एकमेकांना समांतर आहे, भारतीय जनता पक्षातून देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी पक्षातून अजित पवार यांच्या नावाचा search गूगल वर जास्त झालेला दिसतो. २८ सप्टेंबरला अजित पवारांनी दिलेला  विधानसभेचा राजीनामा यामुळे त्यांचे नाव त्यादिवशी सर्वात जास्त वेळा शोधले गेले होते.


प्रश्न :-  मागील ३० दिवसात महाराष्ट्रातील जनतेने सर्वात जास्त google वर शोध (Search) केलेले निवडणुकीतील मुद्दे (यात १०० हे फक्त एकक असून ते कोणत्याही प्रकारे मोजमापाचे प्रमाण नाही)

महाराष्ट्रातील जनतेने जम्मू आणि काश्मीर या शब्दाचा शोध सर्वात जास्त वेळा घेतलेला दिसत आहे. त्यानंतर आर्टिकल ३७० आणि वीर सावरकर या शब्दांचा शोध गूगल वर घेतलेला दिसत आहे. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्या या शब्दांचा शोध या काळात महाराष्ट्रातील जनतेने कमी घेतलेला दिसत आहे.




प्रश्न ५ :-मागील ७ दिवसात महाराष्ट्रातील जनतेने भारतरत्न आणि वीर सावरकर या शब्दांचा घेतलेला शोध  (यात १०० हे फक्त एकक असून ते कोणत्याही प्रकारे मोजमापाचे प्रमाण नाही)

महाराष्ट्रातील जनतेने मागील ७ दिवसात या शब्दांचा शोध घेतला आहे त्यात १५ ऑक्टोबर नंतर या शब्दांच्या शोधाचे प्रमाण जास्त दिसत आहे. कारण याच दिवशी भाजपा च्या जाहीरनाम्यात वीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली.







प्रश्न ६ :- ED प्रकरणा पूर्वी व नंतर शरद पवार या शब्दाचा शोध मोठ्या प्रमानावर झालेला आहे. तसेच  साताऱ्यातील १८ ऑक्टोबर च्या सभेनंतर शरद पवार यांच्या नावाचा शोध वाढलेला आहे, संध्याकाळी २०.०० नंतर या शब्दाचा शोध खूप वाढलेला दिसत आहे. या निवडणुकीत शरद पवार हे खूप परिणाम कारक व्यक्तिमत्व आहेत, पण त्याचे मतात रूपांतर कसे  झाले २४ तारखे नंतरच कळेल. (यात १०० हे फक्त एकक असून ते कोणत्याही प्रकारे मोजमापाचे प्रमाण नाही)


यामधून कोणताही निष्कर्ष किंवा अनुमान सांगणे हे योग्य होणार नाही पण या माध्यमातून आपल्याला काही गोष्टी स्पष्ट होतात, ज्याद्वारे महाराष्ट्रातील जनतेचा कौल आपल्या समजायला मदत होईल. Google Trends या टूल च्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेचा कौल भारतीय जनता  पार्टी आणि महायुतीच्या बाजूने दिसत आहे. येणाऱ्या २४ तारखेला निवडणुकीच्या निकालात हे स्पष्ट होईल Google Trends ने दिलेला कौल किती प्रमाणात योग्य होता.

धन्यवाद

वंदे मातरम                                                                                                  विराज

Tuesday 15 October 2019

निवडणूक प्रचार


२००४ च्या निवडणुका प्रत्यक्ष अनुभवायची संधी मला मिळाली, बीडला ऍग्रीकल्चर ला फर्स्ट इयर ला असताना निवडणुकीचा प्रचार प्रत्यक्ष पाहता आला. सोशल मीडिया त्यावेळी नव्हता त्यामुळे निवडणूक प्रचार ऑन फील्ड जास्त असायचा. अशा प्रचाराची एक वेगळीच मज्जा आणि वातावरण निर्मिती असायची, चहा पेक्षा किटली गरम तसे नेत्या पेक्षा कार्यकर्तेच अतिउत्साही असायचे. डिजिटल मीडिया, इव्हेंट मॅनॅजमेण्ट, PR agent, मीडिया प्लांनिंग या सारख्या प्रपोगंडा टेकनॉलॉजि वापर नसलेली निवडणूक २००४ ची असेल. तस नाही म्हणायला भाजपाने त्यावेळी ऑर्कुट च्या वापर निवडणुकीच्या प्रचारा करिता सुरु केला होता, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया हे दोनच प्रभावी माध्यमे त्यावेळी जनसंपर्कां साठी होती आणि सर्व पक्ष व उमेदवार त्याचा वापर प्रभावी पणे करत होती. त्यापेक्षही महत्वाचे ठरत होते ते म्हणजे "मॅन टू मॅन कॉन्टॅक्ट" वैयक्तिक गाठी भेटी फार महत्वच्या ठरत होत्या, प्रचार सभा आणि वैयक्तिक गाठी भेटी यामुळेच मोठया प्रमाणावर वातावरण निर्मिती होत होती, यात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नवीन प्रकारे प्रचार करण्यास सुरवात केली, "रोड शो" हा खूप प्रभावी प्रचार प्रकार ठरला आणि त्यामुळे मोठया प्रमाणावर जनसंपर्क होऊ लागलं. रामजन्मभूमी च्या विषयावरून काढलेली लाला कृष्ण अडवाणी यांची रथ यात्रा आणि सोनिया गांधी यांनी काढलेला रोड शो प्रभावी जनसंपर्क प्रकार त्यावेळी होते. रथ यात्रा प्रकार लाला कृष्ण अडवाणी/भाजपा ने  १९८९ पासून च्या सर्व पुढच्या निवडणुकीत या तंत्राचा वापर केला. रोड शो आणि रथ यात्रा हे तंत्र आजच्या निवडणुकीत सुद्धा प्रभावी माध्यम ठरत आहे. सर्वच पक्ष या दोन्ही तंत्राचा वापर करताना आपण पाहत आहोत. या दोन्ही तंत्रा मुळे प्रचंड वातावरण निर्मिती आणि प्रत्यक्ष जनसंपर्क साधता येतो. राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वाला प्रत्यक्ष पाहण्याची आणि भेटण्याची संधी सर्वसामान्य जनतेला या माध्यमातून मिळते, सोबत इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया असल्यावर अजून प्रभाव वाढतो.


तस पाहता निवडणुकीचा प्रचार म्हणजे ग्रामीण भागात एक उत्सवच असतो. लग्ना कार्यात ज्याप्रमाणे लगबग असते त्या प्रमाणे निवडणुकीच्या प्रचार असतो. निवडणुका जाहिर होण्याच्या दोन ते तीन महिने आधी पासून ते मतदानाच्या दिवशी पर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचणे त्यांना आपल्या उमेदवार बद्दल माहिती देणे आणि आपल्याच उमेदवाराला मतदान करण्यास प्रवृत्त करणे हे काम कार्यकर्ते करता असतात. वेगवेगळ्या माध्यमातून पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना सर्वसामान्य जनते पर्यंत पोहचवत असतो, ग्रामीण भागात प्रचार सभा असल्यास, सभेच्या ठिकाणी येणाऱ्या गाड्या मध्ये "हलगी"(डफली) वाजवली जाते, सभेच्या गावात भोंगे फिरवले जातात, भिंती रंगवणे, प्रत्रक (लीफलेट/पॅम्प्लेट) वाटणे या मुळे सभेची वातावरण निर्मिती होते. "हेलिकॅप्टर" हे सुद्धा प्रभावी प्रचाराचे माध्यम ग्रामीण भागात आहे,  दोन -तीन वेळेस सभेच्या गावात उमेदवाराचे हेलिकॅप्टर फिरवले की चांगली वातावरण निर्मिती होते. लोक सभेच्या ठिकाणी गर्दी करतात. राजकारणाच्या चर्चा आणि निर्णय प्रक्रियेचे (डिसिजन प्रोसेस) ठिकाण म्हणजे गावाची चावडी, मारुती मंदिर किंवा चहाची टपरी असायची. त्यामुळे उमेदवाराची चावडी मीटिंग वर भर असायचा. स्थानिक वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या यांचा वापर उमेदवार मोठ्या खुबीने करून घेत असे. स्थानिक वृत्तपत्रात आपल्या बद्दल चांगलं कसं लिहून येईल यावर उमेदवाराचा भर असे.  ग्रामीण भागात कोणत्याही दिवशी सभेचे आयोजन केले जाते तर शहरी भागात शनिवार-रविवार हे प्रचाराचे दिवस होते, दिवसा ग्रामीण भागातील सभा आणि संध्याकाळी शहरी भागात सभा आयोजन होत असे. सभेचे रूपांतर इव्हेंट मध्ये करण्याचे श्रेय राज ठाकरे ना जाते, larger than life image या इव्हेंट मधून केला जायचा, बाळा साहेबांच्या सभेचे व्यवस्थापन याच प्रकारचे होते. वक्तृत्व त्यावेळी आणि आज सुद्धा प्रभावी प्रचाराचे माध्यम आहे. एखादा खंबीर वक्ता एका सभेतून निवडणुकीचा निकाल बदलू शकतो. तासानं तास श्रोत्यांना खेळवून ठेवणारे वक्ते महाराष्ट्राच्या राजकारणाचे वैशिष्ट्य आहे.


गर्दीतला प्रचार सध्या हरवलेला आहे, २०१४ आणि २०१९ ची निवडणूक ही पूर्णपणे सोशल मीडिया वर आधारलेली होती. बदलत्या काळा प्रमाणे निवडणूक प्रचाराचे प्रकार आणि साहित्य सुद्धा बदलले. २०१९ च्या निवडणुकीत डिजिटल प्रचारा वरती खूप भर आहे, व्हॉटऍप, फेसबुक, ट्विटर या माध्यमांच्या द्वारे प्रचंड जनसंपर्क करता येतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ऑडियन्स रिच या तिन्ही माध्यमातून मोजता येतो. या तिन्ही माध्यमात अनेक प्रकारे उमेदवार टार्गेट ऑडीयन्स ला प्रभावित करू शकतो. सध्या या माध्यमाद्वारे टार्गेट ऑडीयन्स ची डिसिजन मेकिंग होत आहे. ही माध्यमे खूप मोठ्या प्रमाणावर टार्गेट ऑडीयन्स प्रभावित करत आहेत, या माध्यमात येणाऱ्या कॉन्टेन्ट ची सत्यता न पडताळता ऑडीयन्स त्यावर अंध विश्वास ठेवत आहेत. सोशल मीडिया तुन फालतू चर्चा आणि अतिरेकी विचार पुढे येत आहेत. माहितीची प्रचंड प्रमाणात देवाण घेवाण होत आहे व त्याचा लाभ घेऊन काही कंपन्या मतदारांना प्रभावित करत आहेत आणि हे सर्व राजकीय पक्षांच्या फायद्या साठी होत आहे. याचा नक्कीच फायदा उमेदवार आणि राजकीय पक्षाना होणार, मतदारांची दिशाभूल करून सत्तेचा सोपान चढणे त्यांना सोपे झाले आहे.

वंदे मातरम                                                                                                                  विराज