Friday 8 September 2017

९/११ नंतरची अमेरिका

९/११ नंतर जगाला असे वाटले होते की अमेरिका संपली, अमेरिकेची आर्थिक व लष्करी ताकत एका हल्ल्यात संपून गेलेली असेल असे जगाला वाटले होते. एवढा मोठा हल्ला ज्या देशावर झाला तो देश आता काही उभे राहू शकणार नाही. बेचिराक होईल संपून जाईल असा एक समाज जगात झाला होता, कदाचित हा पहिलाच अमेरिकेच्या भूमीवरचा हल्ला होता, पहिले महायुद्ध(European Civil War), दुसरे महायुद्ध किंवा  शीत युद्धात सुद्धा कधी  अमेरिकेवर किंवा प्रत्यक्ष अमेरिकेच्या भूमी वर हल्ला झाला नव्हता, अमेरिकेचे नागरिकच  कधी कुठल्याही हल्ल्यात मृत्युमुखी पडले नव्हते. तस पाहायला गेले तर हा पहिला आणि आता पर्यंतचा शेवटचा हल्ला म्हणता येईल.
जगाच्या इतिहासात ९/११ हल्ल्याला फार महत्वचा टप्पा  आहे, कारण जी अमेरिका या हल्ल्या नंतर मोडकळीस येईल असे वाटत होते, ती फिनिक्स पक्षा प्रमाणे राखेतून उभी राहिली. त्यानंतर आता १७ वर्ष झाली, तीन राजवटी बदलल्या (बुश, ओबामा, ट्रम्प ) तरी अमेरिकेचे जागतिक राजकारणातील महत्व कमी झालेले नाही. या हल्ल्यानंतर अमेरिकेने दुसऱ्या आखाती युद्धाची तयारी केली, आणि मग सुरुवातीला अफ़गाणिस्तान हल्ला असेल. तालिबानीचा शोध असेल किंवा त्याचा मोरक्या ओसामा बिन लादेनचा खात्मा करणे असेल, इराणचा सद्दाम हुसेनची राजवट उलथवणे असेल, इराकचा रासायनिक अस्त्राचा शोध असेल अमेरिका युद्धच करत होती. ९/११ च्या हल्ल्याचा बदल म्हणून अमेरिकेने पाकिस्तानातील एब्बोट्टाबाद शहरात असलेल्या ओसामाला त्याच्याच घरात घुसून मारले.
हे सर्व होत असताना अमेरिका जागतिक राजकारणात बलशाली होत गेली, पण अर्थव्यवस्थेत मागे पडत गेली. अमेरिकेची अर्थव्यवस्था या काळात खूप धडपडताना दिसत होती. सब प्राईम क्रयसेस मुळे अमेरिकेतील गुंतवणूक कमी होत होती. दुसऱ्या आखाती युद्धामुळे  अमेरिकेचे कंबरडे मोडले होते, मागील १५ वर्षा पासून अमेरिकेचे सैन्य अफ़गाणिस्तान व मध्य आशियात अडकून पडले आहे. व याचा खूप मोठा भार  अमेरिकेच्या अर्थ व्यवस्थेवर पडत आहे, त्यामुळे व क्रियशक्तीच्या कमतरते मुळे अमेरिकेतील तरुण बेरोजगार व्हायला लागला. H1 व्हिजामुळे  अमेरिकेत नोकरी-धंद्या करिता येणाऱ्यांची संख्या वाढायला लागली व त्यांनी आपेक्षे प्रमाणे मूळ अमेरिकन युवकाचे Job ओरबाडायला सुरवात केली त्यामुळे बेकार झालेला अमेरिकेचा युवक दारू व नशेच्या नादी  लागला कॉनडा  आणि मॅक्सीकोच्या मार्गे अमेरिकेत ड्रग्सचा व्यापार वाढला.
बुश व नंतर ओबामा यांच्या काळात यात फार काही फरक पडला असे दिसत नाही, नंतर आलेल्या ट्रम्प ची विचारसरणी व राजकारण वेगळ्याच विचाराने जात आहे. आज अमेरिका दिवसं-दिवस आत्मकेंद्रित होत आहे कदाचित त्यामुळेच "अमेरिका फर्स्ट" किंवा "मेड इन अमेरिका" या घोषणा ट्रम्प च्या निवडणुकीचा भाग झालेल्या असतील असे वाटते. जागतिक राजकारणात आज अमेरिकेची पकड ठीक-ठाक आसली तरी येणाऱ्या काळात ती तशीच राहील याची शाशवती नाही. चीनचा  होत असेलेला जागतिक महासत्ता म्हणून उदय व समाजवादी (ज्याला लाल) दहशदवाद, उत्तर कोरियाच्या रूपाने येऊ घातला आहे या अमेरिका व जागतिक राजकारणातील खूप मोठी  समस्या बनत आहे. ९/११ नंतर जन्माला आलेल्या युवकाला इस्लामिक दहशतवाद आणि येणारा लाल दहशतवादाशी लढत जगावे लागेल
धन्यवाद

वंदे मातरम                                                                                             विराज