Sunday 13 March 2022

काश्मीर फाइल्स

 

कोणत्याही नाण्याला दोन बाजू असतात, एक बाजू प्रकाशात असतांना दुसरी बाजू अंधारात असते, पण काश्मीर पंडितां वरील अन्याया बाबत मात्र कायम एकच बाजू उद्दिष्टपूर्वक आपल्या समोर ठेवलेली होती. काश्मीर फाईल्स आपल्या समोर ती अप्रकाशी बाजू आणतो. ज्यांनी विवेक अग्निहोत्री यांचा या पूर्वीचा ताशकंद फाइल्स पहिला असेल त्यानं एकूण या चित्रपटाची रचना आणि मांडणी लक्षत येईल. ९० च्या दशकात काश्मिरी पंडितांना (काश्मिरी हिंदूंना) अंगावरील  कपड्यानिशी काश्मीर खोऱ्यातून हाकलून देण्यात आले व एकूणच काश्मीर खोरे भारताचा अविभाज्य भाग कसा नाही हे दाखवण्याचा प्रयत्न सुरु झाला.



जानेवारी १९९० च्या त्या दोन दिवसात "इस्लाम स्विकारा, कश्मीर सोडा अथवा मरा" असा फतवा खोऱ्यातील जम्मू कश्मीर लिबरेशन फ्रेंट ने दिला आणि काफिर अर्थात काश्मिरी हिंदूंचे हत्याकांड सुरु झाले. काश्मीर खोऱ्यातील हिंदूंची राहती घरे, दुकाने, वस्त्या, शेती, उद्योग-व्यवसाय यांना आग लावण्यात आली. हिंदू स्त्रिया वरती अत्याचार करण्यात आले. हे होत असताना व्यवस्था (सरकार) षंढ बनून बसले होती. १९-२० जानेवारी १९९० या दोन दिवसात काश्मीर खोऱ्यातील असंख्य हिंदूंचा संहार करण्यात आला. पण परंपरागत माध्यमांनी आणि प्रस्थपित राज्य व्यवस्थेने हा सर्व संहार उर्वरित भारतीय समाजा पासून लपवून ठेवला. काश्मीर खोऱ्यातून हिंदूंचे अस्तित्व पुसण्याचा व तो सरकारी व्यवस्थेतून दाबून टाकण्याचा प्रयत्न मागील ३२ वर्ष चालू होता, मात्र काश्मीर फाईल्सच्या रूपाने पुन्हा एकदा तो रक्तरंजित इतिहास भारतीय सर्वसामान्याच्या  समोर आला आहे. फुटीरतावादी (वामपंथीय) विचारवंतांच्या इकॉसिस्टम ने काश्मीर व काश्मिरी हिंदू कशा प्रकारे अखंड भारताचा भाग नव्हते याच्या सुरस कहाण्या तर तयार केल्याचं पण या दोन दिवसातील हत्याकांडला स्वातंत्र्य युद्धाचे व क्रांतीचे नाव दिले. हा चित्रपट पाहताना हे जाणवून जात की "फ्री काश्मीर", "आझादी" या प्रकारच्या घोषणा देणारे फुटीरतावादी जाणीव पूर्वक काश्मीर खोऱ्यात अशांतता कायम स्वरूपी राहावी या करिता प्रयत्न करताना दिसतात. कथा-कथित पुरोगामी माध्यमांचा अशांत काश्मीर खोरे निर्माण करण्यामध्ये महत्वाची भूमिका या चित्रपटातून समोर येते. हा चित्रपट १९९०नंतर जन्माला आलेल्या सर्व प्रकारच्या माध्यमां च्या भूमिके विषयी बोलताना दिसतो. एकूणच प्रिंट व त्यानंतर इलेक्ट्रॉनिक व समाज माध्यमातून काश्मीर मध्ये निर्माण करण्यात येणारे अशांतेचे वातावरण व त्या द्वारे काश्मिरी युवकांची माथे भडकवण्याचे काम फुटीरतावादी करत असतात असे हा चित्रपटात सांगतो. भारतीय सैन्याचे खच्चीकरण करणारी शासन व्यवस्था व त्यांना मदत करणारे लुटीयन मीडिया यांनी कश्मिरी हिंदूंच्या हत्याकांडला आणि विस्थापनाला उर्वरित जगा पासून दडपून ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावली हे चित्रपट बघताना जाणवते. या काळातील कश्मिरी हिंदू वर होणारे अत्याचार पडद्यावर पाहताना अंगाचा थरकाप उडतो व तळपायाची आग मस्तका जाते.

या चित्रपटात वास्तवाचं दर्शन दिसत, काश्मिरी हिंदू हे काश्मिरी संस्कृतीचे व भाषेचा भाग होते तरी सुद्धा त्यांचावरती अन्याय झाला, त्यानां काश्मीर मधून विस्थापित व्हावे लागले हे सत्य हा चित्रपट अधिरेखीत करतो.
विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाची मांडणी अगदी उत्तम केली आहे. एखादी घटना, त्याचे स्वरूप, त्या घटनेचे काश्मिरी समाजावर होणारे परिणाम, शासन व्यवस्थेचे त्या घटनेचे आकलन याची संदर्भ सहित मांडणी या चित्रपटात केली आहे. या जोडीला योग्य प्रकारे निवडलेले कलाकार व त्यांची भूमिका खूप प्रभाव टाकून जाते. मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, चिन्मय मांडलेकर आणि मृन्मय जोशी यांनी त्यांच्या भूमिका जिवंत केल्या आहेत. चित्रपटातील भाषेची मांडणी ही काल सांगत आहे व त्याद्वारे सुद्धा खूप प्रभाव निर्माण केला आहे. एकूणच हा चित्रपट वास्तवाचे दर्शन करणार आहे त्यामुळे जरूर पहावा. पण त्यापेक्षा सुद्धा काश्मिरी हिंदू वर झालेल्या अन्यायाच्या वास्तवा करिता पहावा. 

धन्यवाद

 

विराज व देवडीकर