जय श्रीराम
मागील १०-१२ दिवसा पासून वेगळाच दिनक्रम चालू
आहे, संध्याकाळ झाली की सहा-साडे सहा पर्यंत
ऑफिस चे काम संपवायचे आणि घर गाठायचे, अर्धा
तासाची विश्रांती
आणि पुन्हा सात वाजता अभियानाची सुरवात, हो श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निधी संकलन
अभियानात या काळात काम करण्याचे सौभाग्य मिळाले, दिलेल्या वस्ती मध्ये, नागरी
सोसायट्यां मध्ये, कधी बाजारात तर कधी सेवा वस्त्यांमध्ये
जाऊन निधी संकलन तर करायचेच पण त्यापेक्षा सुद्धा महत्वाचे म्हणजे सर्वसामान्यांना
राम मंदिरा बद्दल माहिती करून द्यायची अशी जवाबदारी घेतली आणि कामाला १५ तारखे
पासून सुरु झाले. त्यात प्रत्यक्ष लोकं मध्ये जाऊन काम करण्याची संधी/ निधी
संकलनाची संधी मिळत आहे. घरोघरी जाऊन, प्रत्यक्ष
लोकांशी संवाद साधून राम मंदिरा विषयी
चर्चा करायची संधी मिळत आहे, त्यांचा
मनातील राम जाणून घेण्याची संधी मिळत आहे.
भारताच्या आणि भारतीयांच्या मनामनात राम आहे, अखंड भारतवर्षाचा आपण अभ्यास केला तर आपल्याला
जाणवून जाते राम भारताच्या संस्कृती व समाज जीवनाचा भाग बनून गेला आहे, रामगड, रामनगर, रामवाडी, रामटेकडी, श्रीरामपूर असे गावाच्या नावावरून रामाशी नातं
सांगणारे अनेक जण आहेत तसेच राम, श्रीराम, राम्म्या,सीताराम, रघुनाथ, राघव
असे स्वतःच्या नावाने नाते सांगणारे अनेक जण या भारत भूमीत आपल्याला भेटीला, पण त्याहून ही महत्वाचे म्हणजे ‘राम नाम’
अनेकांच्या मना मनाला साधणारा सेतू आहे असे आपल्याला जाणवते. या अभियाना
निमित्याने काम करताना असे अनेक राम मला भेटायला लागले, प्रत्यक्ष स्वरूपात मूर्त रूपात दिसले. लहान बालकांचा राम वेगळा बाळ गोपाळांत
खेळणारा राम भेटला जो वडीलधाऱ्यांचा मान राखतो, त्यांची
आज्ञा शिरसावंद्य मानतो, सत्याचे पालन करितो, ज्ञान साधना आणि विज्ञान यावर विश्वास ठेवतो
असा बाल राम भेटला. कोदंडधारी राम तरुणांचा राम भेटला ज्याची समाजाप्रती काहीतरी करण्याची भावना आहे, ज्याला आपल्या क्षेत्रांत कार्य करताना राष्ट्र
व धर्म सेवा करायची आहे असा तरुण राम भेटला वृद्धांचा पूर्ण पुरषोत्तम राम भेटला, माता
भगिनींचा रक्षण करिता राघव भेटला, असे
अनेक राम अनेक रूपात भेटले.
प्रत्येकाच्या मनातील राम वेगळं आणि त्याची
रामा वरील प्रीती वेगळी, या अभियानात अनेक अनुभव येत आहेत, राम या नावा वरील भक्तीचा प्रत्येय या काळात
घेत आहे, निधी संकलना बरोबर लोकांच्या राम
भक्तीचे सुद्धा संकलन या वेळी होत आहे असे वाटते, काही ठिकाणी बाल गोपाळांनी आपला खाऊचा वाट मंदिर निर्माणा साठी या
अभियानाला देत आहेत तर कुठे वृद्ध माता-पित्यानी आपल्या निवृत्त संचयातील वाट या
अभियानास देत आहेत, सेवा कार्य करणाऱ्या सेवेकार्यानी आपले
योगदान देत आहेत.
उद्योग-धंदे, व्यवसाय, नोकरी
करणाऱ्या लोकांनी यथा शक्ती योगदान दिले, शेतकरी
कष्टकऱ्यांनी आपला राम जपत खारीचा वाटा उचलला आहे. समाजातील प्रत्येक घटक कोठे न कोठे स्वतःला राम
मंदिराशी जोडत आहेत राम कार्याशी नातं सांगत आहेत. अनेक हातानी अनेक मनानी हे राम
मंदिर उभे राहणार आहे. निधी-रक्कम यातून मंदिराचे बांधकाम उभे राहिल, पण या असंख्य मनांच्या जोडणीतून श्रीरामाची
प्रतिस्थापना होणार आहे.
राम सर्वत्र आहे, चराचरात आहे,
राम सर्व मानवात आहे पण मंदिर आमच्या
अस्मितेचे प्रतीक आहे, प्रेरणेचे केंद्र आहे आणि भविष्यातील
पिढी साठी एकात्मतेचे शक्ती पीठ असेल.
धन्यवाद विराज देवडीकर
विराज जी जय श्रीराम !!! खुप छान लेख
ReplyDeleteमनातलं लिहिलंय
धन्यवाद...
ReplyDeleteसुंदर विचार मांडलेत सर
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Delete