एखाद्या उत्पादनाचा नफा ठरवताना त्या उत्पादनाचे उत्पादन मुल्य
म्हणजेच Production cost
(Including all taxies), उत्पादन आणि बाजार
भाव ते तीन मुख्य घटक असतात व याचे सूत्र कमी उत्पादन मुल्य, स्थिर बाजार भाव व योग्य
उत्पादन असल्यास उत्पादकास (Producer) नफा होतो हे सध्या
स्वरूपातील अर्थशास्त्र आहे. आज ज्यावेळी शेतकरी आत्महत्या होत आहेत तेव्हा या
सूत्राचा विचार आपण नव्या पद्धतीने कसा करू शकतो हे पहावयास हवे...
अल्प उत्पादन मूल्य (Low Production Cost):- एखाद्या पिकास येणारा लागत खर्च कसा कमी करता
येईल हे पाहणे गरजेचे आहे.
१)
व्यवस्थापनातील
त्रुटी:- बियाणे खाते निवडीतील असतील किवां मृदा परीक्षण असेल, पारंपारिक पद्धतीने
केलेली शेतीचे व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, स्थानिक हवामान प्रमाणे पिकाचे नियोजन
या सर्व गोष्टीचा विचार होतो. शेतकर्याने आज नवीन व सकारात्मक पद्धतीचा अवलंब
करायला हवा. शेतकर्याने आज शेतीचा व्यावसायिक दृष्टी कोनातून विचार करावा.
२)
मुलभूत
सोई सुविधाची कमतरता(besic
infrastructure):- यात पाणी, वीज,
रस्ते, वाहतुकीची व्यवस्था आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोठार (warehouse) निर्मिती करणे जरुरीचे आहे. त्यामुळे शेती मधील
उत्पादनाचे Shelf Life वाढेल व उत्पादन जास्त दिवस बाजारात राहू शकेल.
या व्यवस्था शासन निर्मित असायला हव्या आणि त्याचा उपयोग सामान्य शेतकर्यास कमीत
कमी खर्चात करतायायला हवा आहे.
३)
मुलभूत
संशोधन आणि व्यावसायिक संशोधन (Basic & Commercial Research):- कृषी संशोधन केंद्र,
विद्यालय, महाविद्यालय आणि विद्यापीठ यांनी प्रामाणिकपणे कृषी संसोधनाकाडे लक्ष देणे
गरजेचे आहे. कृषी संशोधन कशाप्रकारे शेतकऱ्याच्या उपयोगात येऊ शकेल हे पाहणे
गरजेचे आहे. त्याच बरोबर नवीन संशोधन लवकरात लवकर शेतकऱ्यापर्यंत पोहचवणे गरजेचे
आहे. ते संशोधन व्यावसायिक व स्पर्धात्मक पातळीवर टिकणारे हवे. नवीन संशोधन
शेतकर्यांना हाताळता यावे याकरिता जास्तीत जास्त प्रशिक्षण केंद्र उभारावीत. त्याच
बरोबर कृषी शिक्षण घेणाऱ्या युवकास कमीत कमी एक वर्ष internship ची सक्ती करावी.
स्थिर बाजारभाव:-
१)
कृषी
विपणन संशोधन (Agriculture
Market Research) आणि Market Intelligence या शास्त्राचा अभ्यास व्हावा. Branding, Packing, Marketing या तिन्ही विषयाचे ज्ञान शेतकर्यांनी आत्मसात
करावे लागणार आहे. आपले शेती उत्पादन जास्त-जास्त लोकान पर्यंत कसे पोहचू शकेल हे
सुध्या पाहणे गरजेचे आहे.
२)
शेती
उत्पादने प्रक्रिया उद्येग निर्मिती :- पश्चिम महाराष्ट्रतील सहकाराच्या तत्वा
प्रमाणे इतर भागात ही कृषी उत्पादनावर प्रक्रिया उद्योग होणे गरजेचे आहे.
ज्याप्रमाणे नगदी पिके म्हणून ऊस व कापूस आहे त्याच प्रमाणे इतर नगदी पिके निर्माण
केली पाहिजेत, जसे की
§ Tomato – Ketchup & Fruit Juice
Industry
§ Potato – Wafers Indusrty
§ Wheat – Atta & Wine Industry
§ Bajara/Jawar – Wine Industry
§ Vegetables – Ready to eat Industry
Community Corporate Project उस्मानाबाद जिल्यात राबवला जात आहे व त्याचा
फायदा अनेक शेतकऱ्यांना होत आहे.
योग्य व गुणवत्तापूर्ण उत्पादन:-
कृषी विद्यापीठे या करिता महत्वाची भूमिका करू शकतात, योग्य मार्गाने
होणारे व व्यावसायिक संशोधन करणे गरजेचे आहे. Minimum In-Put for Maximum Profit हे सूत्र असायला हवे. शेतकऱ्यांनी ही सकारात्मक
विचार करून जास्तीत जास्त पणे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. आज जग खूप जवळ-जवळ येत आहे, भारतातील शेतकऱ्यासमोर
फक्त भारत ही बाजार पेठ न राहता जागतिक बाजार पेठ हा नवा पर्याय निर्माण झाला आहे.
जगाचे अन्नधान्य कोठार म्हणून भारताकडे जग बघत आहे व हे आव्हान स्वीकारण्याची भारतीय
शेतकऱ्यात क्षमता तर आहे पण गरज आहे ती शेती आणि शेतकर्याची मानसिकता बदलण्याची,
मागील काही वर्षापासून होत असलेल्या आत्महत्या सत्रा मुळे शेतकरी खचला आहे त्याला आधार
द्यायची गरज आहे, ही समस्या सामाजिक आहे राजकीय नाही. समाजातील सर्व घटकांनी एकत्र
येऊन ही समस्या सोडवणे गरजेच आहे आणि हा सुद्धा एक प्रयत्न आहे समस्या
सोडवण्याचा...
वंदेमातरम्
धन्यवाद विराज