Monday, 4 December 2017

अध्यक्ष आणि मी...!!!

‌अध्यक्ष कोणी असावे हे ठरवण्याचा अधिकार ज्या-त्या गटाचा असतो, मी अध्यक्ष कधीच होणार नाही म्हणून मी त्या गटात नाही पण जो अध्यक्ष होणार आहे "तो" त्या गटात जन्मतःच आहे. मग कोणी तरी म्हणेल "मग त्या गटात जन्म घेणाऱ्या प्रत्येकाला अध्यक्ष होता येत का???" मी म्हणेन "नाही" फक्त "तो" आहे म्हणुन त्याला होता येत, बाकी कोणीही नाही. याला घराणेशाही म्हणत नाहीत, घराणेशाही इतर गटात असू शकते किंवा आहे, या गटात फक्त लोकशाही आहे व "तो" सुद्धा लोकशाही मार्गाने अध्यक्ष होणार आहे. इतर कोणी प्रयत्न केला नाही आणि कोणाला प्रयत्नही करू दिला नाही. "तो" त्याची क्षमता काय आणि अकलन काय किंवा उपलब्धी काय हे विचारण्याचे धाडस त्या गटात कोणालाही नाही व कोणी करतही नाही, कारण त्या त्यांच्या करीत गौंण बाबी आहेत. अध्यक्ष होण्यकरिताची पात्रता त्याने जन्मतःच आत्मसात केली आहे आणि जीवनात काही गोष्टी आत्मसात कराव्या लागतात हे त्याला माहीतच नव्हते. कदाचित त्या गोष्टी त्याच्यावर थोपल्या गेल्या असतील. थोपल्यावरून आठवले हे थोपलेले अध्यक्ष पद नाही, सर्वानुमते मिळवलेले अध्यक्ष पद आहे.
‌मी एकदा प्रयत्न केला होता अध्यक्ष होण्याचं, कॉलनी तील गणपती मंडळाचा पण फिक्सिग का-काय ते मला जमले नाही आणि जुन्या अध्यक्षाणेच नवीन अध्यक्षांची व्यवस्था ३०वर्षा पूर्वीच करून ठेवली होती. मात्र तो बेमालून पणे अध्यक्ष होत आहे. या निवडी मध्ये "लोकशाही निवडणूक मार्ग" हा फार गंमतीशीर शब्द आहे. मला याचा काहीतरी वेगळाच अर्थ माहित होता, लोकशाही निवडणूक म्हणजे कमीत कमी दोन उमेदवार मधून बहुमताने निवडून येणे, मात्र "तो" एकटाच उमेदवार असून सुद्धा बहुमताने निवडून आला.

‌काहीही म्हणा लोकशाहीचा पाय त्याच गटाने रचला....


‌(टीप सद्य परिस्थितीचा आणि लेखाचा काहीही साधर्म्य नाही आणि असल्याचं निवळ योगा-योग समजावा)

वंदेमातरम्                                                     विराज