Thursday, 4 April 2019

नोटा" (None of the above)


नमस्कार, "लोकतंत्र का त्योहार" या नवा खाली भारतीय निवडणूक आयोग awareness campaign करत आहे, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आणि मतदानाचे महत्व लोकांना समजावे यासाठी प्रयत्न करत आहे. अनेक समाज सेवी संस्था, प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि स्वयंसेवक यांच्या माध्यमातून सुद्धा मतदाना साठी प्रवृत्त करण्याचे काम चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजचा विषय आपल्या समोर मांडत आहे.                         "नोटा" (None of the above) हे बटन मा. सर्वोच्च् न्यायाल्याच्या निर्देशाने सप्टेंबर २०१३ ला स्वीकारण्यात आले सार्वत्रिक निवडणूक २०१४ ला याचा वापर . % म्हणजे साधारणतः ६०,००,००० लोकांनी केला. या नंतर झालेल्या सर्व निवडणुकीत "नोटा" अंतर्भूत होते त्याचा वापर वाढत गेलेला दिसत आहे. नोटा करिताचे एक विशिष्ट बोध चिन्ह १८ सप्टेंबर २०१५ ला देण्यात आले त्याचा वापर वोटिंग मशीन वर करण्यात येतो. हे झाली नोटा बद्दलची सामान्य माहिती.
काही सांख्यकी पुढील प्रमाणे
1.       गुजरात  २०१७ निवडणूक नोटा ११८ मतदारसंघात तृतीय स्थान भाजप आणि काँग्रेस नंतर.
2.       कर्नाटक २०१८ नोटाचे मत राष्ट्रीय पक्ष CPI M आणि बसपा पेक्षा जास्त होते.      
3.       मध्यप्रदेश २०१८ भाजप काँग्रेस मधील विजयी उमेदवाराचे अंतर .% होते तर नोटाला मिळालेल्या मतांची टक्के वारी .% होती.
4.       केरळ २०१५ पासून पंचायत निवडणुकीत सुद्धा नोटा चा वापर सुरु झाला.

आजच्या तारखेला तरी नोटा ला संविधानिक आधार असला तरी त्याचा उपयोग निवडणूक प्रक्रियेवर होताना दिसत नाही. नोटा द्वारे आलेली मते कोणत्याही उमेदवारांचे मतातुन वजा करता येत नाहीत किंवा कोणत्याही उमेदवाराच्या मतात जोडता येत नाहीत, त्यामुळे नोटा चा सांख्यकी शास्त्रा शिवाय इतर कुठेही उपयोग होताना दिसत नाही. मुळात आपल्याला संविधानाने आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार दिला आहे त्याला “People Representative act 1951” म्हटले जाते त्यानुसार आपण आपला योग्य प्रतिनिधी उपलब्ध उमेदवारा मधून निवडणे अपेक्षित आहे. मात्र नोटाच्या स्वीकारा नंतर असे दिसते की नोटाचा वापर करणे म्हणजे निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण कारण्यासाखे आहे. यामुळे समाजात एक असा उदासीन वर्ग निर्माण होत आहे जो लोकशाही शासन व्यवस्थेला धोका असेल. नोटा चा वापर केल्यामुळे चुकीचा उमेदवार निवडून येण्याकरीता मदत होताना दिसते. एखाद्या व्यक्तीने मतदान करणे नोटाचा वापर करणे एक सारखेच झाले आहे. नोटा च्या मतांचा कोठोही उपयोग होताना दिसत नाही.  नोटा ला सर्वाधिक मत मिळून सुद्धा द्वितीय क्रमांकाच्या उमेदवारास विजयी ठरवले जाते, त्यामुळे जनसामन्यात नोटा बद्दल चे मत काहीसे असे होताना दिसत आहे,
Ø  waste of vote
Ø  merely cosmetic
Ø  a symbolic instrument to express resentment
Ø  a mere decoration
राज्यव्यवस्थेत बद्दल लोकशाही मार्गानेच होणे संविधान कर्त्याना अपेक्षित होता आणि तेच सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे. आपण येणाऱ्या निवडणुकीत उपलब्ध असलेल्या पर्यायानं पैकी एक निवडणे गरजेचे आहे, त्यालाच पूर्ण मतदान म्हणता येऊ शकते.

धन्यवाद


लोकशाही :)