Thursday, 1 October 2020

बापू आणि संघ

 

गांधीवादी आणि संघ (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) यांच्या राजकीय विचारसरणीत खूप अंतर आहे. संघाचे विचार, ध्येय, धोरणे एकमेकांच्या परस्पर विरोधी व टोकाची आहेत. इतके टोकाचे मतभेद या दोन्ही विचारसणीत आहे की बापूंच्या हत्येस संघ जवाबदार आहे असे मोघम व तथ्यहीन वक्तव्य कोणताही काँग्रेसी करून जातो. त्याचे कारण राजकीय किंवा वैचारिक मतभेद असणे एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरू शकतात असा त्यांचा समाज असतो. अर्थात त्याबद्दल मी बोलणार नाही. संघ आणि बापू यांच्यात एक मात्र साम्य ते म्हणजे संघाने बापूंचा "सेवा" मार्गाचा स्वीकार आहे. गांधीजींचे ग्रामस्वराज, स्वदेशी, गो-रक्षण आणि अस्पृश्यता निर्मूलन ही तत्वे संघाने स्वीकारली व त्यावर मागील अनेक वर्ष संघ मूलभूत कार्य करत आहे. अनेक राष्ट्रीय आपत्तीच्या वेळेस संघ आणि संघ स्वयंसेवक आपले सेवा कार्य बजावत असतात. याकरिता अनेक वेगवेगळी उदाहरणे देता येतील, स्वातंत्र्यत्तर भारतात अनेक सेवा प्रकल्प संघ राबवत आहे. संघाच्या सेवा कार्याची दाखल स्वतः बापूनी घेतली होती. 


बापूंच्या संघशाखेच्या भेटीची दोन दाखले इतिहासात सापडतात. पहिला वर्धा येथे १९३४ साली संघाचे हिवाळी शिबीर सुरु होते. शिबिराच्या जवळच जमनालाल बजाज यांच्या घरी त्यावेळी बापू मुक्कामी होते. शिबीर प्रमुखांना ज्यावेळेस बापूच्या मुक्क्माची माहिती मिळाली त्यावेळी त्यांनी बापूंना भेटीची वेळ मागितली, त्याप्रमाणे भेट झाली. शिबीर प्रमुखांनी बापूंना हिवाळी शिबीर भेटीचे आमंत्रण दिले, बापूंनी ते स्वीकारले व दुसऱ्या दिवशी बापू प्रत्यक्ष शिबीर भेटीस उपस्थित राहिले. त्यावेळी शिबिरात दुपारच्या भोजनाची वेळ होती, सर्व स्वयंसेवक हरीने जेवत होते. काही स्वयंसेवक शिस्तबद्ध रीतीने जेवायला वाढत होते, काही स्वयंसेवक भोजन तयार करत होते. हे सर्व पाहून बापूंनी शिबीर प्रमुखांना प्रश्न केला, "आपल्या शिबिरात अस्पृश्य स्वयंसेवक किती आहेत व स्पृश्य वर्गाचे किती आहेत?" शिबीर प्रमुखांनी बापूंना विनम्रपणे उत्तर दिले," यातील कोण स्पृश्य-कोण अस्पृश्य आम्हला माहित नाही. अशी नोंद आम्ही ठेवत नाहीत, जेवताना सुद्धा आम्ही एकत्र बसतोत" बापूंच्या अस्पृश्यता निर्मूलनाच्या कार्यात रोटी-बेटी व्यवहार एक महत्वाचा टप्पा होता. त्यावेळी संघाचे सह भोजनाचे उपक्रम क्रांतिकारक म्हणावे लागेल. याच काळात रत्नागिरी येथे स्वा. सावरकर सह भोजन कार्यक्रमातूनच अस्पृश्यता निर्मूलन करत होते. या भेटीच्या संदर्भासाठी लिंक खाली दिली आहे.

बापूंच्या अजून एका संघ भेटीचा उल्लेख मला इथे करावासा वाटतो, १६ सप्टेंबर १९४७ रोजी नवी दिल्ली येथील भंगी वाडा (भंगी कॉलनी) येथील ५०० स्वयंसेवकांच्या शाखेला बापूंनी भेट दिली. भंगी कॉलनी तील सेवाकार्याची माहिती घेऊन बापूंनी स्वयंसेवकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वर्धा शिबिराची आठवण तर सांगितली आहेच, पण संघाचे शिस्तप्रिय आणि स्पृश्य-अस्पृश्यता विसरून एकत्रित कार्य व स्वयंसेवकांची साधी राहणी यामुळे बापू प्रचंड प्रभावित झाले होते. तसेच  संघाची सेवा वृत्ती, त्याकरीचे सर्वस्वाचे अर्पण आणि एकत्रित विकसित होण्याची भावना या संघटनेची वैशिष्ट्ये आहेत, शक्ती स्थळ आहेत असे बापूंनी म्हटले. या भेटीचा उल्लेख बापूंच्या "Collected Works of Mahatma Gandhi"3 या ग्रंथात आढळतो. या करिताची लिंक खाली दिली आहे. 


काँग्रेस जरी बापूंचा राजकीय वारसा सांगत असली तरी सेवेकार्याचा वसा नक्कीच संघाने घेतला आहे असे म्हणता येईल. वैचारिक मतभेद असू शकता पण बापूंच्या ग्राम स्वराजचा विचार असेल किंवा स्वदेशी, गो-रक्षण या सर्व विषयात संघ आणि संघ स्वयंसेवक मागील अनेक वर्षा पासून कार्य करत आहेत, भविष्यात सुद्धा करत राहतील. आज महात्मा गांधी जयंती च्या निमित्याने या दोन जगातील प्रचंड प्रभावशाली विचारधारा मधील सामान धागा या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. महात्मा गांधींच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन

 

धन्यवाद                                                                                     विराज

 

 

(लेख आवडल्यास कृपया शेअर करा/ RT करा)

 

 

)https://indianexpress.com/article/opinion/columns/mahatma-gandhi-rss-nathuram-godse-nehru-and-the-sangh-5671408/

) https://www.organiser.org/Encyc/2019/10/15/Gandhi-s-Tryst-with-RSS.html

) Collected works of Mahatma Gandhi Vol- book on the work of Mahatma Gandhi