नवीन वर्षाच्या तिसऱ्या
दिवशी म्हणजे ३ जानेवारीला माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप चा
दौरा केला त्याचे काही फोटो समाज माध्यमातून आणि इतर माध्यमातून प्रसारित झाले आणि
अनेकांच्या बुडाला आग लागली. अनेकांना या दौऱ्याचा प्रचंड त्रास झाला. अनेकांना
लक्षद्वीप हा भारताचा भाग आहे तेच या दौऱ्यामुळे पहिल्यांदा कळले. अनेकांना
लक्षद्वीप भारताच्या नेमके कोणत्या किनाऱ्यावर आहे हेच माहित नव्हते, म्हणजे अरबी समुद्रात आहे
कि बंगालच्या उपसागरात येथून सुरवात. तर या लक्षद्विप ची गोष्ट मोठी रंजक आहे.
मागील वर्षी मालदीव मध्ये
सार्वत्रिक निवडणूक झाली,
त्या निवडणुकीत मोहम्मद
मुइझ्झू हे निवडून आले त्यांनी इब्राहिम मोहम्मद सोलीही यांचा पराभव केला. मालदीव
च्या अर्थ व्यवस्थेवरती चीनच्या कर्जाचा भार आहे व मोहम्मद मुइझ्झू हे तसे चीन
समर्थक उमेदवार सध्या अध्यक्ष झाले आहेत. त्यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये सत्तेवर
येताच भारताला सदिच्छा भेट दिली. मात्र त्यांच्या भारत विरोधी कारवाया सुरूच आहेत.
त्यांच्या या भारत विरोधी कारवायांना चीन चे पाठबळ आहे असा आरोप केला जातो. त्या दृष्टिकोनातून
सुद्धा मा पंतप्रधानाच्या लक्षद्वीप भेटी कडे पाहिले जात आहे. मालदीव ला चीन आर्मी
बेस बनवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे अरब समुद्रात चीनचे नाविक दल कार्यरत होऊ
शकेल. व ते भारताच्या दृष्टीने धोकादायक आहे.
दुसरे म्हणजे पर्यटन, समुद्र किनारा लाभलेल्या सर्व देशांची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून असते. श्रीलंका किंवा मालदीव यांच्या अर्थ व्यवस्थेत पर्यटनाचा मोठा हातभार आहे. या दोन्ही देशांच्या शेजारी भारता सारखा खंडप्राय देश आहे. भारत जगातील प्रभावशाली अर्थव्यवस्था बनत आहेत. अशावेळी भारतातून मोठ्या प्रमाणावरती पर्यटक या
देशांना भेट देत असतात आणि त्या देशांच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावत असतात. पंतप्रधानाच्या लक्षद्वीप भेटी मुळे आणि तेथील समुद्र किनाऱ्या वरील व निसर्गाच्या फोटो मुळे अनेक भारतीय येणाऱ्या काळात मालदीव ला भेट देणार होते त्यांचे लक्ष लक्षद्वीप कडे वळले आहे. आर्थिक दृष्ट्या सुद्धा लक्षद्वीप भेट भारतीयांना परवडणारी आहे. त्यामुळेच आज मालदीव चे मंत्री झाहिद रमीझ यांनी पंतप्रधानाच्या लक्षद्वीप भेटीवर टीका केली आणि "भारत पैसे कमावण्यासाठी श्रीलंका आणि इतर लहान देशांच्या अर्थव्यवस्थेची नक्कल करत आहे." असे म्हटले त्यामुळे त्यांना मालदीव सरकारने निलंबित केले आहे पण पंतप्रधानाच्या भेटीचा योग्य तो संदेश मालदीव सरकारला मिळाला आहे असे म्हणावे लागले.
तूर्त एवढेच
धन्यवाद
विराज वि देवडीकर