Sunday, 10 January 2016

मराठी साहित्य संमेलन आणि वादतच का???

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मागील काही वर्षा पासून संवादा पेक्षा वादानेच जास्त गाजत आहे. आर्थत हि काही पहिली वेळ नाही, या आधीही साहित्य संमेलनात वाद होतेच. मुळात मराठी साहित्य परिषद व साहित्य मंडळे हीच वादाची सुरवात आहे.अध्यक्षाची निवड व निवडणूक हे सुद्धा वादाचे विषय, संमेलनाचा खर्च, राजकारणी व उद्योगपतीची साहित्य संमेलनात रेलचेल, संमेलन ठिकाण, साहित्यिकांच्या पंच-तारांकित सवयी सर्वकाही वादातच आहे.

खरे म्हणजे साहित्य संमेलने सारस्वताचा मेळावा, तेथे विचाराचे, संस्कृतीचे, ज्ञानाचे, मराठी भाषेचे आदान प्रदान हावे, मात्र हे सर्व संपत चाललेले दिसत आहे या साहित्य संमेलनातून. मराठी भाषेच्या महान कवी-लेखकाने भूषवलेले हे पद, आज असंख्य कालंकाणी बरबटलेले दिसत आहे. ज्या पद्धतीने मागील काही वर्षात  साहित्य संमेलनाची वाटचाल होत आहे ते पाहता हे संमेलन साहित्याचे कमी पण राजकारणाचा आखाडा जास्त वाटत आहे. संमेलन अध्यक्ष निवडीतील राजकारणातर सोडाच पण त्यानंतर सुध्या सवंग प्रसिद्धीसाठी अत्यंत खालच्या दर्जा पर्यंत जाण्याची तयारी साहित्यीकात दिसते. आपले साहित्य व आपण कसे श्रेष्ट आहोत हे दाखवण्याची धडपड जास्त दिसत आहे, आणि त्याकरता राजकारण्याचा केलेला वापर सुध्या वाढला आहे. अर्थात यात राजकारण्याची काही चूक नाही, कारण सर्वसामान्य जनता ज्याठिकाणी तेथे राजकारणी त्याच कामाच आहे ते, मात्र साहित्यिकाचे काय? त्यांना या गोष्टीची भुरळ का???
मराठी साहित्याची परंपरा सांगताना आम्ही संत परंपरे पासून महान साहित्यिकांची नावा घेतो, व त्या परंपरेचा बाजारच या साहित्य मंडळाने आणि साहित्य संमेलनाने मांडला आहे. मला वाटते हे साहित्यातील प्रदूषण आहे. यामुळे मराठी साहित्य कमकुवत होत आहे व त्याची मराठी जन-सामन्याची नाळ तुटत आहे.साहित्य संमेलन अध्यक्षावर होणारे आरोप- प्रत्यारोप वेगळेच, त्यामुळे ते पद दुषित होत आहे.
मराठी साहित्य संमेलन सर्वव्यापी व्हावे, सर्व मराठी जन-संमेलीत व्हावी व मराठी भाषा आणि संस्कृतीचा प्रसार व प्रचार व्हावा हे जास्त महत्वाचे. मात्र हे सोडून मराठी भाषेचे नुकसान या साहित्य संमेलनातून होत आहे. मराठी साहित्याची परंपरा आणि मराठी भाषा, संस्कृती साठी हि साहित्य संमेलनाची वाटचाल योग्य नाही. माझासारख्या मराठी माणसाची मन यामुळे शरमेनी खाली होत आहे.

वंदे मातरम्                                                   विराज    

No comments:

Post a Comment