Monday, 4 December 2017

अध्यक्ष आणि मी...!!!

‌अध्यक्ष कोणी असावे हे ठरवण्याचा अधिकार ज्या-त्या गटाचा असतो, मी अध्यक्ष कधीच होणार नाही म्हणून मी त्या गटात नाही पण जो अध्यक्ष होणार आहे "तो" त्या गटात जन्मतःच आहे. मग कोणी तरी म्हणेल "मग त्या गटात जन्म घेणाऱ्या प्रत्येकाला अध्यक्ष होता येत का???" मी म्हणेन "नाही" फक्त "तो" आहे म्हणुन त्याला होता येत, बाकी कोणीही नाही. याला घराणेशाही म्हणत नाहीत, घराणेशाही इतर गटात असू शकते किंवा आहे, या गटात फक्त लोकशाही आहे व "तो" सुद्धा लोकशाही मार्गाने अध्यक्ष होणार आहे. इतर कोणी प्रयत्न केला नाही आणि कोणाला प्रयत्नही करू दिला नाही. "तो" त्याची क्षमता काय आणि अकलन काय किंवा उपलब्धी काय हे विचारण्याचे धाडस त्या गटात कोणालाही नाही व कोणी करतही नाही, कारण त्या त्यांच्या करीत गौंण बाबी आहेत. अध्यक्ष होण्यकरिताची पात्रता त्याने जन्मतःच आत्मसात केली आहे आणि जीवनात काही गोष्टी आत्मसात कराव्या लागतात हे त्याला माहीतच नव्हते. कदाचित त्या गोष्टी त्याच्यावर थोपल्या गेल्या असतील. थोपल्यावरून आठवले हे थोपलेले अध्यक्ष पद नाही, सर्वानुमते मिळवलेले अध्यक्ष पद आहे.
‌मी एकदा प्रयत्न केला होता अध्यक्ष होण्याचं, कॉलनी तील गणपती मंडळाचा पण फिक्सिग का-काय ते मला जमले नाही आणि जुन्या अध्यक्षाणेच नवीन अध्यक्षांची व्यवस्था ३०वर्षा पूर्वीच करून ठेवली होती. मात्र तो बेमालून पणे अध्यक्ष होत आहे. या निवडी मध्ये "लोकशाही निवडणूक मार्ग" हा फार गंमतीशीर शब्द आहे. मला याचा काहीतरी वेगळाच अर्थ माहित होता, लोकशाही निवडणूक म्हणजे कमीत कमी दोन उमेदवार मधून बहुमताने निवडून येणे, मात्र "तो" एकटाच उमेदवार असून सुद्धा बहुमताने निवडून आला.

‌काहीही म्हणा लोकशाहीचा पाय त्याच गटाने रचला....


‌(टीप सद्य परिस्थितीचा आणि लेखाचा काहीही साधर्म्य नाही आणि असल्याचं निवळ योगा-योग समजावा)

वंदेमातरम्                                                     विराज 

Wednesday, 8 November 2017

हो मी नोटबंदीचे (निश्चलनीकारणाचे) समर्थन करतो...

हो मी नोटबंदीचे (निश्चलनीकारणाचे) समर्थन करतो, मी या देशाचा एक सामान्य नागरिक आहे, माझा मी निवडून दिलेल्या सरकार वर पूर्ण विश्वास आहे आणि संविधानाचा मी आदर करतो. हो मला बदलाची ही अपेक्षा आहे व त्या बदला करिता कष्ट घेण्याची तयारी आहे. 
नोटबंदी ही भ्रष्टाचार निर्मूलना करिताचा एक मार्ग आहे, वर्षानुवर्षे अस्तित्वात असलेला व खोलवर गेलेला भ्रष्टाचार एकाच प्रयत्नंत संपणार नाही असे अनेक व वेगवेळ्या प्रयत्नातून नाहीसा होईल. ज्या देशात भ्रष्टाचाराबद्दल बोलले जात नव्हते, तो संपवण्याकरिता कासलाही प्रयत्न केला जात नव्हता, भ्रष्टाचारामूळे अर्थव्यवस्था पोखरली जात होती, समाजातील सामान्य घटक मग तो कामगार वर्ग असेल, शेतकरी असेल ते त्रस्त झाले होते. अशावेळी नोटबंदी च्या निर्णया मूळे भ्रष्टाचाराला अंकुश लागला आहे असे मला वाटते. रोखीचे व्यवहार कमी होऊन बँकेद्वारे व्यवहार वाढले आहेत. बँकिंग व्यवस्थेला केंद्रीभूत करण्याचा हा एक प्रयत्न आहे. चेक, NEFT, नेट बँकिंग चा वापर मोठ्याप्रमाणावर वाढला आहे. व्यापार करण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे, व्यापारीवर्गाची मानसिकता बदली आहे. व्यापार जास्तीत जास्त पारदर्शक होताना दिसत आहे. करदात्यांची संख्या वाढली आहे व त्याचा सकारात्मक परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. विकासाचे किती तरी प्रकल्प सुरू झाले आहेत. 

१) मागच्या वर्ष भरात दगड फेकीच्या घटना ७५% कमी झाल्याच्या दिसून आले आहे. विशेष करून जम्मू आणि काशमीर राज्यात.
२)मागील वर्षात ७.६२ लाख खोट्या नोटा (Counterfeit currency) सापडली.
३) दहशतवादी व नक्षलवादी हल्ल्यात निर्णयाकरीत्या कमी झालेले दिसत आहेत.
४) संशयास्पद १७.६२ लाख केसेस असे सापडलेत ज्यात ठेवलेली रक्कम आणि टॅक्सचा भरणा मिळता जुळता नाही. 
५) तसेच ३.६८ लाख करोड रुपये आणि २३.२२लाख बँक खाते तपासणी चालू आहे
६) निश्चलीकारणा नंतर १६,००० करोड रु बँकेत आलेले नाहीत.
७)  २९,२१३ कोटी चे अज्ञात उत्त्पन्न सापडले आहे.
८) १६२६ कोटींची बेनामी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
९) EPFO आणि ESIC मध्ये अनुक्रमे १.०१ करोड आणि  १.३ करोड कामगार व कर्मचारी वर्गाची नोंदणी मागील वर्षभरात झाली आहे. 
१०) टॅक्सभोक्त ची संख्या ८४.२१ लाखा वर पोहचली यात २६.६% वाढ मागच्या वर्षभरात दिसली आहे. तर IT Returns भरणाऱ्यांच्या संख्येत २७.९५% (३.०१करोड) वाढ झाली आहे.
११) उच्च चलनी नोटांची संख्या १७ लाख करोड वरून १२ लाख करोड वर आली आहे यात ६ लाख करोड नी घट झाली आहे. 
 व्यवस्था बदल होताना त्याच्या झळया सर्वानाच बसणार आहेत त्यामुळे या काळात जे सर्व सामान्य लोकांना त्रास झाला किंवा रांगेत उभे राहिल्यामुळे ज्यांचे मृत्यू झाले त्याच्या बद्दल मला सहानभूती आहेच, कारण मी सुद्धा या व्यवस्थेचा भाग आहे आणि त्या रांगेत मी सुद्धा  उभा होतो. 
देश बदलत आहे आणि मी या बदला करीत तयार आहे. 

वंदे मातरम                                                                                                         विराज 

Friday, 8 September 2017

९/११ नंतरची अमेरिका

९/११ नंतर जगाला असे वाटले होते की अमेरिका संपली, अमेरिकेची आर्थिक व लष्करी ताकत एका हल्ल्यात संपून गेलेली असेल असे जगाला वाटले होते. एवढा मोठा हल्ला ज्या देशावर झाला तो देश आता काही उभे राहू शकणार नाही. बेचिराक होईल संपून जाईल असा एक समाज जगात झाला होता, कदाचित हा पहिलाच अमेरिकेच्या भूमीवरचा हल्ला होता, पहिले महायुद्ध(European Civil War), दुसरे महायुद्ध किंवा  शीत युद्धात सुद्धा कधी  अमेरिकेवर किंवा प्रत्यक्ष अमेरिकेच्या भूमी वर हल्ला झाला नव्हता, अमेरिकेचे नागरिकच  कधी कुठल्याही हल्ल्यात मृत्युमुखी पडले नव्हते. तस पाहायला गेले तर हा पहिला आणि आता पर्यंतचा शेवटचा हल्ला म्हणता येईल.
जगाच्या इतिहासात ९/११ हल्ल्याला फार महत्वचा टप्पा  आहे, कारण जी अमेरिका या हल्ल्या नंतर मोडकळीस येईल असे वाटत होते, ती फिनिक्स पक्षा प्रमाणे राखेतून उभी राहिली. त्यानंतर आता १७ वर्ष झाली, तीन राजवटी बदलल्या (बुश, ओबामा, ट्रम्प ) तरी अमेरिकेचे जागतिक राजकारणातील महत्व कमी झालेले नाही. या हल्ल्यानंतर अमेरिकेने दुसऱ्या आखाती युद्धाची तयारी केली, आणि मग सुरुवातीला अफ़गाणिस्तान हल्ला असेल. तालिबानीचा शोध असेल किंवा त्याचा मोरक्या ओसामा बिन लादेनचा खात्मा करणे असेल, इराणचा सद्दाम हुसेनची राजवट उलथवणे असेल, इराकचा रासायनिक अस्त्राचा शोध असेल अमेरिका युद्धच करत होती. ९/११ च्या हल्ल्याचा बदल म्हणून अमेरिकेने पाकिस्तानातील एब्बोट्टाबाद शहरात असलेल्या ओसामाला त्याच्याच घरात घुसून मारले.
हे सर्व होत असताना अमेरिका जागतिक राजकारणात बलशाली होत गेली, पण अर्थव्यवस्थेत मागे पडत गेली. अमेरिकेची अर्थव्यवस्था या काळात खूप धडपडताना दिसत होती. सब प्राईम क्रयसेस मुळे अमेरिकेतील गुंतवणूक कमी होत होती. दुसऱ्या आखाती युद्धामुळे  अमेरिकेचे कंबरडे मोडले होते, मागील १५ वर्षा पासून अमेरिकेचे सैन्य अफ़गाणिस्तान व मध्य आशियात अडकून पडले आहे. व याचा खूप मोठा भार  अमेरिकेच्या अर्थ व्यवस्थेवर पडत आहे, त्यामुळे व क्रियशक्तीच्या कमतरते मुळे अमेरिकेतील तरुण बेरोजगार व्हायला लागला. H1 व्हिजामुळे  अमेरिकेत नोकरी-धंद्या करिता येणाऱ्यांची संख्या वाढायला लागली व त्यांनी आपेक्षे प्रमाणे मूळ अमेरिकन युवकाचे Job ओरबाडायला सुरवात केली त्यामुळे बेकार झालेला अमेरिकेचा युवक दारू व नशेच्या नादी  लागला कॉनडा  आणि मॅक्सीकोच्या मार्गे अमेरिकेत ड्रग्सचा व्यापार वाढला.
बुश व नंतर ओबामा यांच्या काळात यात फार काही फरक पडला असे दिसत नाही, नंतर आलेल्या ट्रम्प ची विचारसरणी व राजकारण वेगळ्याच विचाराने जात आहे. आज अमेरिका दिवसं-दिवस आत्मकेंद्रित होत आहे कदाचित त्यामुळेच "अमेरिका फर्स्ट" किंवा "मेड इन अमेरिका" या घोषणा ट्रम्प च्या निवडणुकीचा भाग झालेल्या असतील असे वाटते. जागतिक राजकारणात आज अमेरिकेची पकड ठीक-ठाक आसली तरी येणाऱ्या काळात ती तशीच राहील याची शाशवती नाही. चीनचा  होत असेलेला जागतिक महासत्ता म्हणून उदय व समाजवादी (ज्याला लाल) दहशदवाद, उत्तर कोरियाच्या रूपाने येऊ घातला आहे या अमेरिका व जागतिक राजकारणातील खूप मोठी  समस्या बनत आहे. ९/११ नंतर जन्माला आलेल्या युवकाला इस्लामिक दहशतवाद आणि येणारा लाल दहशतवादाशी लढत जगावे लागेल
धन्यवाद

वंदे मातरम                                                                                             विराज 

Tuesday, 15 August 2017

७१ व्या स्वतंत्र दिनी...!!!


स्वतंत्र भारताच्या ७१ व्या स्वतंत्र उत्सव साजरा करताना मना पासून कही विचार समोर येतात, १९४७ साली राजकीय स्वतंत्र हा कदाचीत एकच अर्थ होता व त्या करिता वर्षनुवर्ष गुलामगिरीत आसलेल्या समाजाला एकत्र करून लढा उभारला… २०१७ येताना तो बदलताना दिसत आहे. स्वतंत्र्याचा अर्थ स्वैराचार आणि आत्मकेंद्रित होताना दिसत आहे. संविधानाने दिलेले राजकीय स्वतंत्र आहेच व ते या देशात जन्मनार्या सर्वांचा अधिकारच आहे. पन बदलांची अपेक्षा आसनारे तारुण्य त्याकरता झटताना दिसत नाही. छोट्या छोट्या घटना/गोष्टी ज्या सर्वसामान्य नागरीकांच्या जीवनाशी संबंधीत आहे त्या सुध्दा निभावताना आपण दिसत नाहीत. रस्त्यावरुन जाताना मार्गदर्शक (Indicaters) पालन करायचे असते हे सुध्दा विसरून गेलो आहेत आम्ही, मग कचऱ्याचा विषय असेल किंवा मतदानाचा विषय असेल नाहीत Income tax चा त्याचे पालन न करणे हे आमचे स्वतंत्र आहे असे वाटते. संविधानातील मूलभूत अधिकारावर बोलनारे खुप जन भेटतील पन मुलभूत कर्तव्याचे पालन करताना फार कोणी दिसत नाही. राष्ट्रकडून अपेक्षा असनारे खूप लोक आहेत पन त्याच राष्ट्राला देण्याची वेळ आल्यावर पाठ फिरवनारे सुध्दा खुप आहेत. आता तर काही विचारसरणी हा देश कसा विखुरलेला आहे हे दाखवन्यात व्यस्त आहेत. हा देश कधीच इतिहासात एक न्हवता आणि असनार नाही याची मांडणी करण्यात ते त्यांची बुध्दी खर्ची घालत आहेत. प्रत्येक वेळी देशातील भाषा, वर्ण आणि राज्य या नावा खाली अस्मिता जागृत करून देशाच्या विभाजनाचे प्रयत्न करत आहेत. संस्कृती हा कोणत्याही राष्ट्रचा पाया असतो हे त्यांना मान्यच नाही आणि संस्कृतीक मांडणीवरील संविधान सुध्दा नाकारायला ते कमी करनार नाहीत असे वाटते. राजकीय दृष्ट्या आपण स्वतंत्र झाले आसलो तरी मानसिक गुलामगिरीत आहोत का याचा विचार करावा लागेल असे वाटते.

Onedayमातरम् का वंदे मातरम् असावे हे ठरवावे लाग.... नाहीत फक्त DP बदलनारा व Selfie असलेला स्वातंत्र्यदिन आपल्या नशीबात असेल…
नव निर्मितीचा ध्यास असलेले, बदलांची कास धरनारे, झगडनारे तारुण्य असावे, स्वतंत्र जगनारे तारुण्य हवे

वंदे मातरम्….

Wednesday, 19 July 2017

चीनची जळजळ......

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धा मागील काही करणा पैकी एक महत्वाचे कारण होते ते म्हणजे, औद्योगिक क्रांती. १९१४ ते १९१८ या काळात पहिले महायुद्ध झाले. या पूर्वीचा काळ हा औद्योगिक क्रांतीचा होता व त्याची सुरवात इंग्लंड मध्ये झाली व पूर्ण युरोपात पसरली, व हाच काळ होता ज्यावेळी युरोपात सर्वात जास्त प्रमाणात औद्योगिक उत्पादन निघत होते व या उत्पादनाला बाजार पेठेची कमतरता होती ती शोधताना पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडली. तसेच काहीसे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी झाले, आर्थिक महामंदीतून बाहेर पडलेल्या जगाला व नवीन आर्थिक सत्ता म्हणून उदयास येत असलेली अमेरिका कारणीभूत होती असे जाणवते. अमेरिकेत उत्पादीत व प्रक्रिया केलेली उत्पादने यामुळे नवीन बाजार पेठेचा शोध जरुरी झाला व त्यावरील हक्कापायी जग युद्धात लोटले गेले.
मुळात आपल्याला हे लक्षात घ्यायला हवे की युद्धाची प्रमुख करणे काय असू शकतात, भारताच्या किंवा कोणत्याही देशाच्या भूमीवर हक्क सांगण्यामागे चीनचा फायदा काय आहे, आणि हे ही तेवढेच खरे आहे की चीन हे विस्तारवादी राष्ट्र आहे व भूभाग (जमीन) बळकावणे हे मध्ययुगीन कालखंडात किंवा त्यापूर्वी साम्राज्य विस्ताराचे स्वरूप होते पण कुठल्याही देशाचा फक्त भूभाग (जमीन) बळकावणे हे आजच्या जगाचे विस्ताराचे स्वरूप नाही. आता “बाजारपेठ” काबीज करणे हे विस्तारवादी धोरण आहे, जगातील उत्पादक देश आज नवीन नवीन बाजारपेठा हुडकत आहेत व त्यावर कब्जा करत आहेत. भारत किंवा एकूणच दक्षिण आशिया जगातील एक मोठी व महत्वपूर्ण बाजारपेठ होत आहे व ही बाजारपेठ काबीज करण्यासाठी जगातील आर्थिक महासत्ता धडपडताना दिसत आहेत. जर आपण या आर्थिक महासत्तांचा आभ्यास केला तर दिसून येईल.

अ)  युरोपियन महासंघ:- औद्योगिक क्रांतीची सुरवात ज्या प्रदेशात झाली असा हा युरोप खंड आज प्रचंड आर्थिक समस्यांनी ग्रासला आहे. ब्रिग्झीट मुळे महासंघ कोसळला आहे. सामाजिक, राजकीय समस्या आणि दहशतवाद बेरोजगारी यामुळे खचला आहे. दर दिवशी युरोपातील कुठल्या न कुठल्या देशात दहशतवादी हल्ला होत आहेत. त्यामुळे तेथे व्यापार करणे कठीण झाले आहे. त्याच बरोबर मोठ्या उद्योगांनी पर्यायी व्यवस्था हुडकायला सुरवात केली आहे.
आ)                       अमेरिका:- अमेरिकेत सध्या लहरी महमंदाचे शासन आहे. स्थिर सरकार असले तरी टँम्पच्या लहरी वागणुकीमुळे प्रशासन हैराण आणि जनता बेहाल झाली आहे. युरोप प्रमाणेच दहशतवाद अमेरिकेत शिरला आहे. टँम्प यांच्या अध्यक्षीय निवडणूकीच्या माध्यमातून रशियाने अमेरीकेवाराती खूप मोठी चढाओढ केली आहे. उद्या रशिया व पुतीन यांच्या तालावर अमेरिका आणि टँम्प नाचले तर नवल वाटायला नको.
इ)    चीन:- चीन आज स्थिर आणि विकसित देश बनत आहे. चीनला आर्थिक महासत्ता बनायचे आहे व जगावर राज्य करायचे आहे. स्वतःला साम्यवादी विचारांचा म्हणवणारा चीन खरे तर भांडवलशाही वृत्तीचा झाला आहे. जगाची शांतता नष्ट करण्याचे समर्थ चीन मध्ये येत आहे. चीन सध्या त्या देशांचे प्रतिनिधीत्व करत आहे जे मूलतत्त्ववादी आणि जहालमतवादी आहेत व युद्धखोर आहेत, पाकिस्तान, नॉर्थ कोरिया, इस्लामिक दहशतवाद इत्यादी. खरेतर चीनला जग युद्धाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवायचे आहे.
पण या मार्गातील महत्त्वपूर्ण अडचण भारत आहे. चीन हे जाणतो भारत जगातील सर्वात मोठी बाजारपेठ झाला आहे व एक विकसित राष्ट्र आहे. चीनी उत्पादनांना भारताच्या बाजारपेठेत खूप मागणी आहे. पण मागील तीन वर्षात भारतात झालेला सत्ताबदल, एक राष्ट्रवादी विचारांचे आणि पूर्ण बहुमतातले सरकार आज भारतात आहे. दुसरे म्हणजे दिल्लीची बदललेली परराष्ट्र नीती, आक्रमक परराष्ट्र नीती आणि त्यामुळे जागतिक स्थानावर भारताचे व पंतप्रधान मोदीचे वाढलेले महत्व त्यामुळे चीन अस्वस्थ आहे. “मेक इन इंडीया” सारखा प्रकल्प उद्या चीनच्या जीवावर उठू शकतो. जर चीनला आर्थिक महासत्ता म्हणून जगात मिरवायचे असेल तर भारतीय बाजारपेठ काबीज करणे व भारतीय उत्पादने भारतीय व इतर बाजारपेठेतून नष्ट करणे हे चीनी पंडितसमोरील आव्हान आहे. म्हणून कदाचितच मागील काही दिवसा पासूनच्या घडामोडी घडत असतील....

वंदेमातरम्                                    विराज         

Thursday, 30 March 2017

चिरंतर कर्जमुक्ती हवी...!!!


एखाद्या उत्पादनाचा नफा ठरवताना त्या उत्पादनाचे उत्पादन मुल्य म्हणजेच Production cost (Including all taxies), उत्पादन आणि बाजार भाव ते तीन मुख्य घटक असतात व याचे सूत्र कमी उत्पादन मुल्य, स्थिर बाजार भाव व योग्य उत्पादन असल्यास उत्पादकास (Producer) नफा होतो हे सध्या स्वरूपातील अर्थशास्त्र आहे. आज ज्यावेळी शेतकरी आत्महत्या होत आहेत तेव्हा या सूत्राचा विचार आपण नव्या पद्धतीने कसा करू शकतो हे पहावयास हवे...
अल्प उत्पादन मूल्य (Low Production Cost):- एखाद्या पिकास येणारा लागत खर्च कसा कमी करता येईल हे पाहणे गरजेचे आहे.
१)      व्यवस्थापनातील त्रुटी:- बियाणे खाते निवडीतील असतील किवां मृदा परीक्षण असेल, पारंपारिक पद्धतीने केलेली शेतीचे व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, स्थानिक हवामान प्रमाणे पिकाचे नियोजन या सर्व गोष्टीचा विचार होतो. शेतकर्याने आज नवीन व सकारात्मक पद्धतीचा अवलंब करायला हवा. शेतकर्याने आज शेतीचा व्यावसायिक दृष्टी कोनातून विचार करावा.
२)      मुलभूत सोई सुविधाची कमतरता(besic infrastructure):- यात पाणी, वीज, रस्ते, वाहतुकीची व्यवस्था आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोठार (warehouse) निर्मिती करणे जरुरीचे आहे. त्यामुळे शेती मधील उत्पादनाचे Shelf Life वाढेल व उत्पादन जास्त दिवस बाजारात राहू शकेल. या व्यवस्था शासन निर्मित असायला हव्या आणि त्याचा उपयोग सामान्य शेतकर्यास कमीत कमी खर्चात करतायायला हवा आहे.
३)      मुलभूत संशोधन आणि व्यावसायिक संशोधन (Basic & Commercial Research):-  कृषी संशोधन केंद्र, विद्यालय, महाविद्यालय आणि विद्यापीठ यांनी प्रामाणिकपणे कृषी संसोधनाकाडे लक्ष देणे गरजेचे आहे. कृषी संशोधन कशाप्रकारे शेतकऱ्याच्या उपयोगात येऊ शकेल हे पाहणे गरजेचे आहे. त्याच बरोबर नवीन संशोधन लवकरात लवकर शेतकऱ्यापर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. ते संशोधन व्यावसायिक व स्पर्धात्मक पातळीवर टिकणारे हवे. नवीन संशोधन शेतकर्यांना हाताळता यावे याकरिता जास्तीत जास्त प्रशिक्षण केंद्र उभारावीत. त्याच बरोबर कृषी शिक्षण घेणाऱ्या युवकास कमीत कमी एक वर्ष internship ची सक्ती करावी.

स्थिर बाजारभाव:-
१)      कृषी विपणन संशोधन (Agriculture Market Research) आणि  Market Intelligence या शास्त्राचा अभ्यास व्हावा. Branding, Packing, Marketing या तिन्ही विषयाचे ज्ञान शेतकर्यांनी आत्मसात करावे लागणार आहे. आपले शेती उत्पादन जास्त-जास्त लोकान पर्यंत कसे पोहचू शकेल हे सुध्या पाहणे गरजेचे आहे.
२)      शेती उत्पादने प्रक्रिया उद्येग निर्मिती :- पश्चिम महाराष्ट्रतील सहकाराच्या तत्वा प्रमाणे इतर भागात ही कृषी उत्पादनावर प्रक्रिया उद्योग होणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे नगदी पिके म्हणून ऊस व कापूस आहे त्याच प्रमाणे इतर नगदी पिके निर्माण केली पाहिजेत, जसे की
§  Tomato – Ketchup & Fruit Juice Industry
§  Potato – Wafers Indusrty
§  Wheat – Atta & Wine Industry
§  Bajara/Jawar – Wine Industry
§  Vegetables – Ready to eat Industry      
Community Corporate Project उस्मानाबाद जिल्यात राबवला जात आहे व त्याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना होत आहे.  
योग्य व गुणवत्तापूर्ण उत्पादन:-
कृषी विद्यापीठे या करिता महत्वाची भूमिका करू शकतात, योग्य मार्गाने होणारे व व्यावसायिक संशोधन करणे गरजेचे आहे. Minimum In-Put for Maximum Profit हे सूत्र असायला हवे. शेतकऱ्यांनी ही सकारात्मक विचार करून जास्तीत जास्त पणे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. आज जग खूप जवळ-जवळ येत आहे, भारतातील शेतकऱ्यासमोर फक्त भारत ही बाजार पेठ न राहता जागतिक बाजार पेठ हा नवा पर्याय निर्माण झाला आहे. जगाचे अन्नधान्य कोठार म्हणून भारताकडे जग बघत आहे व हे आव्हान स्वीकारण्याची भारतीय शेतकऱ्यात क्षमता तर आहे पण गरज आहे ती शेती आणि शेतकर्याची मानसिकता बदलण्याची, मागील काही वर्षापासून होत असलेल्या आत्महत्या सत्रा मुळे शेतकरी खचला आहे त्याला आधार द्यायची गरज आहे, ही समस्या सामाजिक आहे राजकीय नाही. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन ही समस्या सोडवणे गरजेच आहे आणि हा सुद्धा एक प्रयत्न आहे समस्या सोडवण्याचा...
वंदेमातरम्
धन्यवाद                                                           विराज