पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धा मागील काही करणा पैकी एक महत्वाचे कारण
होते ते म्हणजे, औद्योगिक क्रांती. १९१४ ते १९१८ या काळात पहिले महायुद्ध झाले. या
पूर्वीचा काळ हा औद्योगिक क्रांतीचा होता व त्याची सुरवात इंग्लंड मध्ये झाली व
पूर्ण युरोपात पसरली, व हाच काळ होता ज्यावेळी युरोपात सर्वात जास्त प्रमाणात औद्योगिक
उत्पादन निघत होते व या उत्पादनाला बाजार पेठेची कमतरता होती ती शोधताना पहिल्या
महायुद्धाची ठिणगी पडली. तसेच काहीसे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी झाले, आर्थिक
महामंदीतून बाहेर पडलेल्या जगाला व नवीन आर्थिक सत्ता म्हणून उदयास येत असलेली अमेरिका
कारणीभूत होती असे जाणवते. अमेरिकेत उत्पादीत व प्रक्रिया केलेली उत्पादने यामुळे
नवीन बाजार पेठेचा शोध जरुरी झाला व त्यावरील हक्कापायी जग युद्धात लोटले गेले.
मुळात आपल्याला हे लक्षात घ्यायला हवे की युद्धाची प्रमुख करणे काय
असू शकतात, भारताच्या किंवा कोणत्याही देशाच्या भूमीवर हक्क सांगण्यामागे चीनचा
फायदा काय आहे, आणि हे ही तेवढेच खरे आहे की चीन हे विस्तारवादी राष्ट्र आहे व भूभाग
(जमीन) बळकावणे हे मध्ययुगीन कालखंडात किंवा त्यापूर्वी साम्राज्य विस्ताराचे स्वरूप
होते पण कुठल्याही देशाचा फक्त भूभाग (जमीन) बळकावणे हे आजच्या जगाचे विस्ताराचे
स्वरूप नाही. आता “बाजारपेठ” काबीज करणे हे विस्तारवादी धोरण आहे, जगातील उत्पादक
देश आज नवीन नवीन बाजारपेठा हुडकत आहेत व त्यावर कब्जा करत आहेत. भारत किंवा एकूणच
दक्षिण आशिया जगातील एक मोठी व महत्वपूर्ण बाजारपेठ होत आहे व ही बाजारपेठ काबीज
करण्यासाठी जगातील आर्थिक महासत्ता धडपडताना दिसत आहेत. जर आपण या आर्थिक महासत्तांचा
आभ्यास केला तर दिसून येईल.
अ) युरोपियन महासंघ:- औद्योगिक क्रांतीची सुरवात ज्या प्रदेशात झाली
असा हा युरोप खंड आज प्रचंड आर्थिक समस्यांनी ग्रासला आहे. ब्रिग्झीट मुळे महासंघ
कोसळला आहे. सामाजिक, राजकीय समस्या आणि दहशतवाद बेरोजगारी यामुळे खचला आहे. दर
दिवशी युरोपातील कुठल्या न कुठल्या देशात दहशतवादी हल्ला होत आहेत. त्यामुळे तेथे
व्यापार करणे कठीण झाले आहे. त्याच बरोबर मोठ्या उद्योगांनी पर्यायी व्यवस्था
हुडकायला सुरवात केली आहे.
आ)
अमेरिका:- अमेरिकेत सध्या लहरी महमंदाचे शासन आहे. स्थिर
सरकार असले तरी टँम्पच्या लहरी वागणुकीमुळे प्रशासन हैराण आणि जनता बेहाल झाली
आहे. युरोप प्रमाणेच दहशतवाद अमेरिकेत शिरला आहे. टँम्प यांच्या अध्यक्षीय
निवडणूकीच्या माध्यमातून रशियाने अमेरीकेवाराती खूप मोठी चढाओढ केली आहे. उद्या
रशिया व पुतीन यांच्या तालावर अमेरिका आणि टँम्प नाचले तर नवल वाटायला नको.
इ)
चीन:- चीन आज स्थिर आणि विकसित देश बनत आहे. चीनला
आर्थिक महासत्ता बनायचे आहे व जगावर राज्य करायचे आहे. स्वतःला साम्यवादी
विचारांचा म्हणवणारा चीन खरे तर भांडवलशाही वृत्तीचा झाला आहे. जगाची शांतता नष्ट
करण्याचे समर्थ चीन मध्ये येत आहे. चीन सध्या त्या देशांचे प्रतिनिधीत्व करत आहे
जे मूलतत्त्ववादी आणि जहालमतवादी आहेत व युद्धखोर आहेत, पाकिस्तान, नॉर्थ कोरिया,
इस्लामिक दहशतवाद इत्यादी. खरेतर चीनला जग युद्धाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवायचे
आहे.
पण या मार्गातील महत्त्वपूर्ण अडचण भारत आहे. चीन हे जाणतो भारत
जगातील सर्वात मोठी बाजारपेठ झाला आहे व एक विकसित राष्ट्र आहे. चीनी उत्पादनांना
भारताच्या बाजारपेठेत खूप मागणी आहे. पण मागील तीन वर्षात भारतात झालेला सत्ताबदल,
एक राष्ट्रवादी विचारांचे आणि पूर्ण बहुमतातले सरकार आज भारतात आहे. दुसरे म्हणजे
दिल्लीची बदललेली परराष्ट्र नीती, आक्रमक परराष्ट्र नीती आणि त्यामुळे जागतिक
स्थानावर भारताचे व पंतप्रधान मोदीचे वाढलेले महत्व त्यामुळे चीन अस्वस्थ आहे. “मेक
इन इंडीया” सारखा प्रकल्प उद्या चीनच्या जीवावर उठू शकतो. जर चीनला आर्थिक
महासत्ता म्हणून जगात मिरवायचे असेल तर भारतीय बाजारपेठ काबीज करणे व भारतीय उत्पादने
भारतीय व इतर बाजारपेठेतून नष्ट करणे हे चीनी पंडितसमोरील आव्हान आहे. म्हणून
कदाचितच मागील काही दिवसा पासूनच्या घडामोडी घडत असतील....
Well said sir...
ReplyDelete