Saturday, 12 May 2018

मराठवाडा अभ्यास दौरा (Observation Study)


मागील पाच दिवस मी मराठवाड्यातील चार जिल्यात फिरत होतो, वैयक्तिक कामा निमित्याने जरी या चार जिल्यात मी गेलो असलो तरी पुणे सोडताना एक अभ्यास दौऱ्याची कल्पना माझ्या डोक्यात आली. मग एक उद्दिष्ट घेऊन, एका विषयाचा अभ्यास करायचा म्हणून या पाच दिवसात चार जिल्यात फिरायचे ठरवले. हे चार जिल्ये म्हणजे उस्मानाबाद, लातूर, नांदेड आणि परभणी. मुळात पूर्ण मराठवाड्यातच औरंगाबाद सोडल्यास, प्रचंड विकासाचा अनुशेष असलेला आणि मागासलेला असा आहे. त्यामुळे हे चार जिल्ये सुद्धा थोड्या फार फरकाने अविकसितच म्हणता येईल. त्यातल्या त्यात उस्मानाबाद हा जास्त अविकसित इतरांन पेक्षा.
Ø  अभ्यासाचा प्रकार (Research Methodology):- या वेळी अभ्यासाचा प्रकार "निरीक्षण केंद्रित अभ्यास (Observation Study)" असा आहे. या प्रकारच्या अभ्यासात फक्त निरीक्षण करून मत नोंदवणे असते. त्या सोबत काही मिश्र व्यक्तिमत्वाच्या मुलाखती सुद्धा घेतल्या आहेत.
Ø  अभ्यासाचा विषय :- या अभ्यास दौऱ्याचा विषय, "वीज, पाणी, रस्ता" (BSP) आहे. या तीन विकासाच्या मूलभूत गोष्टी बद्दल मी निरीक्षण पूर्वक आणि मुलाखतीतून काही मते नोंदवली आहेत.
Ø  निरीक्षणाचे नमुने(Observation Sample) :- या करीत नमुने निवडताना कटाक्षाने शहर किंवा जिल्याचे ठिकाण टाळले आहे. या वेळी निरीक्षणाचे नमुने ग्रामपंचायत तालुका स्थरातून घेतले आहेत. मुलाखती मात्र शहरी ग्रामीण दोन्ही प्रकारातील व्यक्तीच्या जे की शेतकरी, पत्रकार, शिक्षक, निवृत्त अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, व्यवसायिक यांच्या आहेत. मराठवाड्यातील आर्थिक दळण वळण याच घटकांवर अबलांबून असते. 
Ø  निरीक्षण नोंद :-
) या चार ही जिल्यात फिरताना जाणवलेला सर्वात महत्वाचा बदल म्हणजे, सर्व सामान्य नागरिक हे शासनाच्या कार्यक्रमा बदल कार्याला प्रतिसाद देताना दिसले. या मध्ये विविध पक्षाचे विविध विचारसरणीचे लोक असले तरी शासनाच्या कार्याला प्रतिसात देत होते आणि शासन सुद्धा जवाबदारीने कार्य करत आहे असे जाणवते.
) ग्रामीण भागात वीज ही खूप मोठी समस्या काही काळा पूर्वी होती, १२-१२ तास लोड शेडींग ग्रामीण भागात असायचे तर ते तास शहरी भागात होते. सर्वसामान्य माणूस यामुळे खूप त्रस्त झालेला होता. मात्र आजच्या तारखेला लोड शेडींग ही समस्या किंवा वीजची कमतरता असे काही दिसत नाही. आणि सर्व सामान्य माणूस वीज समस्ये विषयी बोलताना ही जाणवत नाही. जरी वीज गेली तरी ती काही तांत्रिक कारणामुळे जात होती त्वरित वापस ही येत होती. शासनाच्या काम मुळे असेल वीज या विषयात तरी सर्वसामान्य माणूस समाधानी दिसत होता. (या नोंदीत मी शेती करिताची वीज औद्योगिक क्षेत्राच्या वीजेची नोंद घेतली नाही)
) जलयुक्त शिवार, शिवजल क्रांती काहीही म्हणा, पण काही सामाजिक संस्था (पाणी फौंडेशन, नाम फौंडेशन), शासन, लोक सहभाग, यांच्या एकत्रित प्रयत्नातून मराठवाड्यातील दुष्काळावर मोठ्या प्रमाणावर चाप बसला असे दिसते आहे. दुष्काळ मराठवाड्यातून पूर्णपणे नष्ट झाला असे म्हणता येणार नाही पण त्याची तीव्रता नक्कीच कमी झाली आहे. पाण्याची टंचाई या चार जिल्यातील सर्वात मोठी समान समस्या होती. पिण्याच्या पाण्याची सुद्धा उपलब्धता या भागात नसायची. "महिन्यात किती दिवसाला पाणी येते?" हा दोन व्यक्तींच्या चर्चेचा मुद्दा असायचा. शेती औद्योगिक क्षेत्रा करिता सुद्धा पाणी मिळणे कठीण असायचे. पण यावेळी परिस्थिती काही वेगळी दिसत आहे. पाणी योग्य प्रमाणात उपलब्ध आहे. धरणात पाणी आहे, जल साठे भरलेले आहेत, जमिनीतील पाण्याची पातळी वाढली आहे. सर्व गावें टँकर मुक्त झाले नसतील पण टँकर वाटपाचे प्रमाण कमी झालेले दिसत आहे. एकूणच का तर जल समृद्धी कडे मराठवाडा जाताना दिसत आहे.
) रस्ते हे विकासा करिताचे राजमार्ग असतात आणि देशाच्या रक्तवाहिन्या असतात असे म्हणतात. रस्त्यांचा प्रत्यक्ष अनुभव मला या चार जिल्यात फिरताना घेता आला. येथील रस्त्यांचे चित्र खूप बदलेले दिसते, काही वर्षा पूर्वी जेव्हा मी या भागात जात असे त्यावेळी रस्ते खूप दुरावस्थेत असायचे त्यामुळे वाहतुकी करिता खूप वेळ लागायचा आणि मर्यादा ही यायच्या, आता ही परिस्थिती बदली आहे. मोठया प्रमाणावर रस्त्यांची कामे झाली आहेत. त्यामुळे आता वाहतूक खूप सुलभ झाली आहे. रस्ते सुधारण्याचे प्रमाण खूप वेगाने होत आहे. सर्वच रस्ते सुधारले असे म्हणता येणार नाही पण ग्राम/गाव पातळीवरील रस्त्यात सुधारणा होताना दिसत आहे.
) या चार ही जिल्यात अजून एक महत्वाची गोष्ट मी अनुभवली या जिल्यातील सर्व सामान्य माणूस विकास बदलांची अपेक्षा करत आहे. येथील अर्थव्यवस्थेला चालना मिळताना दिसत आहे. ती सावकाश असेल पण गतिशील होताना दिसत आहे.

हा पूर्ण अभ्यास निरीक्षणा वर अवलंबून आहे

धन्यवाद


वंदे मातरम                                                                                                                                        विराज