Tuesday 1 May 2018

बिजली



स्वदेश मधील  ती कृश आणि मागास गावातील आजीबाई मला आठवते जिच्या डोळ्यात विजेची चमक दिसत होती सुरकुतलेल्या चेहऱ्याने बोळक्या  तोंडातून शब्द फुटले होते "बिजली", अशीच काहीशी गोष्ट २८ एप्रिल २०१८ ला मणिपूर मधील लेईसंग (Leisang) गावात घडली असावी ज्यावेळी तिथे स्वातंत्र्याच्या ७१ वर्षा नंतर वीज अली. निश्चितच ही गौरवपूर्ण गोष्ट आहे त्याकरिता सरकारचे आणि ऊर्जा मंत्रालयाचे मी नक्कीच अभिनंदन करील. मा. पंत्रप्रधान यांच्या ट्विट मध्ये दिसते की कर्मचाऱ्यांना किती कष्ट पडले असावेत त्या गावात वीज पोहचवण्यासाठी. पक्ष म्हणून भाजपा ने दिलेल्या आश्वासनांची पूर्ती होत आहे हे एक चांगले लक्षण आहे.

पण व्यक्ती एक भारताचा नागरिक म्हणून या घटने कडे बघताना आपण अंतर्मुख होऊन बघायला पाहिजे. कोणी म्हणेल, हे तर सरकारचे कामच आहे या करीतच आम्ही सरकारला निवडून दिलेले आहे, हे करणे म्हणजे काय नवल आहे. त्या करीत एक गोष्ट आपल्याला लक्षत घ्यायला हवी, आणि ती म्हणजे स्वातंत्र्याच्या ७१ वर्षानी देशातील शेवटच्या गावात वीज पोहचवण्यात आपण यशस्वी झालोत. इतके वर्ष का जमले नाही, या करिता कोण जवाबदार तेथले स्थनिक प्रशासन, राज्य सरकार की केंद्र सरकार हे थोडा वेळ आपण बाजूला ठेऊ. ज्याप्रमाने अन्न, पाणी, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत त्याच प्रमाणे वीज ही सुद्धा मानवाची चौथी महत्वाची गरज बनली आहे. यांत्रिक युगात चालू झालेला विजेचा प्रवास आज तंत्रज्ञान तेथून इंटरनेट चे महाजाल आताच्या कृत्रिम बुद्धिमत्ताच्या  युगात ही वीज त्या गावात पोहचली आहे.

जगाचे अर्थकारण वीजेवर अवलंबून असताना आता पर्यन्त देशातील सर्व गावात वीज पोहचली नव्हती हे खूप कष्ट दायक होते, आपण एकीकडे जगाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न पहात आहोत त्याच वेळी देशातील सामान्य माणूस वीजे करीत धडपडताना दिसत आहे. ७१ वर्षांनी सुद्धा देशातील निवडणुकीचा महत्वाचा मुद्दे "BSP" म्हणजे "बिजली, सडक, पाणी" हेच असतात मग ती निवडणूक ग्रामपंचायत ते लोकसभा कोणतीही असो, उमेदवार दर पाच वर्षांनी हेच मुद्दे घेऊन मतं मागत असतात.

२८ एप्रिल ला जरी त्या गावात वीज पोहचली असली तरी शेवटच्या घटका पर्यन्त अजून सुद्धा वीज पोहचणे बाकी आहे. महात्मा गांधीनी म्हटले आहे त्या प्रमाणे विकासाचा फायदा जो पर्यन्त शेवटच्या घटकाला मिळत नाही तो पर्यन्त विकास अपूर्णच असतो, त्यामुळे आता वीज शेवटच्या घटका पर्यंत पोहचवणे ही जवाबदारी झाली आहे या सरकारच्या काळात कमीत कमी त्याची सुरवात तरी झाली आहे. वीजे सारख्या एखाद्या महत्वाच्या गोष्टी पासून गाव वंचित असेल तर ते विकासाच्या प्रत्येक योजने पासून दूर असते, कदाचित त्या गावातील मूलभूत समस्यां सुद्धा सोडवणूक बाकी असेल, पण उशिराने का होईना त्या सर्व गावांना न्याय मिळालं ते देशाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले

आजच्या टाइम्स च्या संपादकीयातील पहिले वाक्य "Taking electricity to every village is a milestone, but also a first step" हे आहे, देशातील हजारो लाखो कुटुंब अशी आहेत जे वीज अन्य विकास योजना पासून वंचित आहेत. त्या सर्व घटकां पर्यन्त या विकास योजना पोहचवणे त्याचा लाभ त्यांना मिळून देणे  ही  सरकारची जवाबदारी आहे. मा. मोदी जी यांच्या नेतृत्वा खालील सरकार मध्ये याची सुरवात झाली याचा मन पासून खूप खूप आनंद आहे.


                     वंदे मातरम                                                                                                             विराज

1 comment: