निवडणूक आल्या की अयाराम-गयाराम ची वर्दळ चालू होते, या पक्षातील दादा, भैया, ताई, अक्का त्या पक्षात जातात त्या पक्षातले यात येतात. निवडणुकीच्या राजकारणात ते सर्व मान्यच असते. जे वर्षानु वर्षाचे निष्ठावंत असतात ते एका रात्रीत निष्ठा बदलतात, 'जे तुमचे झाले नाहीत ते आमचे कसे होणार' हे सगळेच मान्य करतात. लोकशाही मध्ये मतांचा गणित जमवणे जरुरीचे असते, सर्वाधिक मत मिळवणारा उमेदवार अर्थातच निवडून येतो विजयी ठरतो, म्हणजे electoral merits,निवडून येण्याची क्षमता हा एकमेव महत्वाचा निकष असतो,
ते बघूनच सर्व पक्ष, विचारधारा उमेदवार निवडत असतात. विचारधारेशी निष्ठा बाळगणारा व्यक्ती निवडून च येऊ शकतो असे नाही, पण आपली राजकीय विचारधारा वाढवायची असेल तर नक्कीच संख्याबळ लागते. त्यामुळे या अयाराम-गयाराम च निवडणुकी च्या काळात फावत. सभागृहात(लोकसभा, विधानसभा) अशीच रचना असते, काही जण उजव्या बाजूस(Right) बसतात तर काही डाव्या(Left) आणि काही मध्यभागी(Center). हे जसे बसण्याच्या जागांचे नावे आहेत तसेच विचरधारांचे सुद्धा. यातील कुठल्याही जागेवर का असेना पण पहिल्या दोन-तीन row सोडल्या तर बाकी मागे सगळी संख्येची भरती असते ज्यांची फक्त सत्ते शी निष्ठा असते. यशस्वी धोरणे राबवायची असल्यास संख्या लागते. सत्ता कोणाचीही असो अयाराम-गयाराम कायम सभागृहात असतात.
लोकशाही :)
लोकशाही :)