Tuesday, 28 May 2019

वीर सावरकर...


आज वीर सावरकरांची जयंती, मुदाम "वीर" शब्द वापरला. मागील महिन्यात राजस्थान मधील काँग्रेस सरकारने शालेय इतिहासाच्या पुस्तकात बदल करून स्वा. सावरकरांच्या नावा समोरील "वीर" पदवी कडून त्यांना गांधी हत्येच्या काटातील प्रमुख सूत्रधार म्हणून उल्लेख केला, या करिताच्या मुहूर्तही सार्वत्रिक निवडणुकीचा साधला व त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र जनतेने त्यांना त्याची जागा २३ मे ला दाखवूनच दिली. पण स्वा. सावरकर हे सॉफ्ट टार्गेट आहेत व त्यांचा वापरकरून मतदारांची दिशाभूल करता येते व मत मागता येतेय हे काँग्रेस चे जुने सूत्र पुन्हा सिद्ध झाले. स्वा सावरकरांवर चिखल फेक करणे काही लोकांना खूप सोपे वाटते, कारण स्वा. सावरकरांची बाजू मांडणारे, त्याच्या करीत लढणारे  त्यांचे असे कोणतेच संघटन किंवा एकत्रीकारण आज अस्तित्वात नाही. संघ परिवार व भाजपा जरी त्यांच्या करिता लढत असले तरी स्वतः सावरकर कधीही संघ स्वयंसेवक नव्हते किंवा संघाच्या निर्मितीत सावरकरांचे काही योगदान नव्हते. स्वा. सावरकरांनी त्यांच्या हयातीतच त्यांनी निर्माण केलेल्या संघटनेचे विसर्जन केले, "अभिनव भारत" या संघटनेचे विसर्जन सावरकरांनी १०-१२ मे १९५२ रोजी पुणे येथे केले, अभिनव भारत संघटनेचे ध्येय व उद्दिष्ट राष्ट्रास स्वतंत्र मिळवून देणे हे होते व राष्ट्र स्वतंत्र झाल्यावर त्याचे कार्य सिद्ध झाले म्हणून त्याचे विसर्जन स्वा. सावरकरांनी स्वहस्ते केले. राजकीय अभिलाषा न ठेवता ५० वर्षा पेक्षा जास्त काळ अस्तित्वात असलेल्या संघटनेचे त्यांनी विसर्जन केले.

स्वा. सावरकरां वर टीका करणारे हे सहज विसरून जातात की, कसलीही अभिलाषा न धरता राष्ट्र साठी सर्वस्व अर्पण करणे कठीण असते. जे टीका करतात ते सोईस्कर विसरून जातात की अंदमान च्या तुरुंगात त्यांनी किंवा त्याच्या पूर्वजांनी कोलू चालवलेला नसतो किंवा हातवर वळून काथ्या तयार केलेला नसतो. घरातील सगळे करते पुरुष एकाच वेळी अंदमानात काळ्या पाण्याच्या शिक्षेवर असतात आणि घरात फक्त लहान मुले आणि स्त्रिया. ज्या माय भूमीच्या स्वातंत्र्या साठी आजन्म यातना सहन केल्या त्याच माय भूमीच्या स्वातंत्र्या नंतर हाती फक्त उपेक्षा आणि हेटाळणी आली, आणि ती मृत्यू नंतर सुद्धा आज तागायत चालू आहे. सावरकरांच्या नावा समोरील पदव्या काढून किंवा खोट्या आरोपात त्यांना गोवल्याने त्यांचे इतिहासातील महत्व कमी होईल असे काही अज्ञानी लोकांना आणि संघटनांना वाटत असते, पण तो त्यांचा भ्रम आहे. आत्मबल या त्यांच्या कवितेतच स्वतःचे अमरत्व त्यांनी सांगितले आहे,
"अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला,
मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला",
याच कवितेत ते पुढे म्हणतात
"अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो,
भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो"
हा विश्वास स्वा. सावरकरांना त्याच्या कार्या बद्दल होता. एखाद्या सन्मानाने ज्या प्रमाणे स्वा. सावरकरणाचे महानत्व सिद्ध होत नाही त्याच प्रमांणे काही तुच्छ लोकांनी टीका केल्याने त्यांचे स्वतंत्र लढ्यातील योगदान कमी होत नाही.  "तुज सकल चराचर शरण" स्वा. सावरकरांनी या काव्य पंक्ती प्रमाणेच स्वतःचे आयुष्य मातृ भूमीच्या पुण्य भूमीच्या पायी वाहील होत, मी सर्वस्वाने तुला शरण आलो आहे असे मातृ भूमी वरील प्रेम स्वा. सावरकरांना अमर करत आहे. आज त्यांच्या १३६ व्या जयंती निमित्याने विनम्र अभिवादन.


धर्मसुधारणा वादी, विज्ञानवादी, जात्युच्छेदक, राष्ट्रभक्त, क्रांतिकारी, भाषासुधारक, कवी, लेखक, नाट्यकार, अमोघ वक्ता, मृत्युंजय "वीर" विनायक दामोदर सावरकर यांना विनम्र अभिवादन #IAmSavarkar

वंदे मातरम























Saturday, 11 May 2019

येडशी औरंगाबाद महामार्ग

दर दिवस नवीन काहीतरी अनुभवायचे म्हणून जन्मत असतो, आणि आपण त्यातून शिकत असतो. असाच काहीसा आजचा अनुभव, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ येडशी ते औरंगाबाद प्रवासा दरम्यान आला. भौगोलीक दृष्ट्या हा महामार्ग सुरु होतो सोलापूर येथून तर संपतो धुळे येथे, पण सर्वात जास्त अंतर हा महामार्ग मराठवाड्यातून जातो तुळजापूर ते औरंगाबाद असा, साधारण पणे ३०० ते ३२५ किमी चे अंतर हे मराठवाड्यातील आहे, हा महामार्ग मराठवाड्याचे दक्षिण टोक ते उत्तर टोक जोडण्याचा प्रयत्न करतो.
तसा हा महामार्ग जुना महत्वाचा व्यापारी मार्ग आहे कारण सोलापूर वरून हैद्राबाद पर्यंत याच मार्गे जात येते तर धुळे येथुन राष्ट्रीय महामार्ग ला सुद्धा लागत येते. त्यामुळे हा महामार्ग हैद्राबाद ते आग्रा पुढे दिल्ली पर्यंत जोडणारा व्यापारी महामार्ग आहे असे म्हणता येईल.
या महामार्गावर मी काही आज पहिल्यांदा जात नाही, आजन्म प्रवास या महामार्गा वरून झाला आहे पण या महामार्गची काही वर्ष पूर्वीची स्थिती (२०१४ पूर्वी) आताच्या स्थितीत खूप बदल झाला आहे. पोटातले पाणी ही हलता प्रवास करणे म्हणजे काय याचा अनुभव आज मी घेतला, महामार्गाचे झालेले चौपदरीकारण, महामार्गाला लागून असलेले सेवा रस्ते, ओव्हर ब्रिज, शहर गावा बाहेरून काढलेले रस्ते, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी केलेली कामे, योग्य पथ दर्शक या मुळे प्रवास सोपा होत जातो आणि हलका सुद्धा, एकेकाळी याच महामार्गा वरून उस्मानाबाद ते औरंगाबाद प्रवासास ते १० तास लागायचे तो प्रवास आता निम्म्या वेळेत म्हणजे ४तासात पूर्ण होत आहे. जुन्या मांजरसुबा घाटाची धोकादायक वळणे आता उरली नाही आणि कुंथलगिरी धार्मिक व्यापारी महत्व लक्षात घेऊन नवीन महामार्गाची निर्मिती झाली आहे. शहागड येथील गोदावरी नदीवरचा पूल किंवा चित्ते पिंपळगाव MIDC करीता रस्त्याची व्यवस्था योग्य पद्धतीने आपल्याला लावलेली दिसून येते. 
या महामार्गाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तुळजापूर-उस्मानाबाद मार्गा वर उभ्या असलेल्या WindMills पवनचक्या, महामार्गाच्या सुशोभी करणार भर टाकतात. सिमन्स कंपनी भारत सरकारच्या एकत्रित प्रकल्पात ३५ WindMills या मार्गावर उभ्या आहेत. ऊर्जा निर्मिती महामार्ग सुशोभीकरण या एक वेगळा अनुभव या बदललेल्या महामार्गावरून जाताना आपल्याला घेता येईल.

धन्यवाद                                                                                                            ©विराज