Saturday, 11 May 2019

येडशी औरंगाबाद महामार्ग

दर दिवस नवीन काहीतरी अनुभवायचे म्हणून जन्मत असतो, आणि आपण त्यातून शिकत असतो. असाच काहीसा आजचा अनुभव, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ येडशी ते औरंगाबाद प्रवासा दरम्यान आला. भौगोलीक दृष्ट्या हा महामार्ग सुरु होतो सोलापूर येथून तर संपतो धुळे येथे, पण सर्वात जास्त अंतर हा महामार्ग मराठवाड्यातून जातो तुळजापूर ते औरंगाबाद असा, साधारण पणे ३०० ते ३२५ किमी चे अंतर हे मराठवाड्यातील आहे, हा महामार्ग मराठवाड्याचे दक्षिण टोक ते उत्तर टोक जोडण्याचा प्रयत्न करतो.
तसा हा महामार्ग जुना महत्वाचा व्यापारी मार्ग आहे कारण सोलापूर वरून हैद्राबाद पर्यंत याच मार्गे जात येते तर धुळे येथुन राष्ट्रीय महामार्ग ला सुद्धा लागत येते. त्यामुळे हा महामार्ग हैद्राबाद ते आग्रा पुढे दिल्ली पर्यंत जोडणारा व्यापारी महामार्ग आहे असे म्हणता येईल.
या महामार्गावर मी काही आज पहिल्यांदा जात नाही, आजन्म प्रवास या महामार्गा वरून झाला आहे पण या महामार्गची काही वर्ष पूर्वीची स्थिती (२०१४ पूर्वी) आताच्या स्थितीत खूप बदल झाला आहे. पोटातले पाणी ही हलता प्रवास करणे म्हणजे काय याचा अनुभव आज मी घेतला, महामार्गाचे झालेले चौपदरीकारण, महामार्गाला लागून असलेले सेवा रस्ते, ओव्हर ब्रिज, शहर गावा बाहेरून काढलेले रस्ते, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी केलेली कामे, योग्य पथ दर्शक या मुळे प्रवास सोपा होत जातो आणि हलका सुद्धा, एकेकाळी याच महामार्गा वरून उस्मानाबाद ते औरंगाबाद प्रवासास ते १० तास लागायचे तो प्रवास आता निम्म्या वेळेत म्हणजे ४तासात पूर्ण होत आहे. जुन्या मांजरसुबा घाटाची धोकादायक वळणे आता उरली नाही आणि कुंथलगिरी धार्मिक व्यापारी महत्व लक्षात घेऊन नवीन महामार्गाची निर्मिती झाली आहे. शहागड येथील गोदावरी नदीवरचा पूल किंवा चित्ते पिंपळगाव MIDC करीता रस्त्याची व्यवस्था योग्य पद्धतीने आपल्याला लावलेली दिसून येते. 
या महामार्गाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तुळजापूर-उस्मानाबाद मार्गा वर उभ्या असलेल्या WindMills पवनचक्या, महामार्गाच्या सुशोभी करणार भर टाकतात. सिमन्स कंपनी भारत सरकारच्या एकत्रित प्रकल्पात ३५ WindMills या मार्गावर उभ्या आहेत. ऊर्जा निर्मिती महामार्ग सुशोभीकरण या एक वेगळा अनुभव या बदललेल्या महामार्गावरून जाताना आपल्याला घेता येईल.

धन्यवाद                                                                                                            ©विराज


No comments:

Post a Comment