Sunday 8 November 2020

अमेरिकेचे बाबा बिडेन

 

तात्याचं अध्यक्ष पद जाणार आणि बिडेन बाबा अमेरिकेचे नवीन अध्यक्ष होणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. हे लिहीत असताना The Washington Post या अमेरिकेतील नियतकालिकाच्या वेबसाईट वर बाबांना २७९ तर तात्यांना २१४ electoral college होते आणि आता पर्यंत च्या मतांची टक्केवारी ५०.०५% व ४७.०७% अनुक्रमे आहे. भारताचेच नाही तर सर्व जगाचे लक्ष या निकाला कडे लागले आहे पण भारतात साम्यवादी आणि पुरोगामी लोकांना या निकालाचा विशेष आनंद होत आहे. Donald Trump यांच्या जागी आता Joe Biden बसणार याचा आनंद डाव्या विचारसरणीच्या लोकांना जास्त झालेला आहे असे दिसते. Joe Biden यांची निवड म्हणजे अमेरिकेत डाव्या विचार सरणीची लाट असा काहीसा समाज या लोकांचा झालेला दिसतो.


"Joe Biden यांचा मोदी सरकारला धक्का, मोदी सरकारच्या अमुक एक कराराला स्थगिती" अशा मथळ्याच्या बातम्या द्यायला आणि त्या समाज माध्यमा वरती फिरवायला काही डावे मंडळी उत्सुकत आहेत. असाच आनंद काही वर्षा खाली Angela Merkel आणि Emmanuel Macron यांच्या निवडीच्या वेळी झाला होता, पण नुकताच फ्रांस आणि ऑस्ट्रिया ला झालेल्या दहशदवादी हल्ल्या नंतर त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला. वरील दोन्ही नेत्यांनी या दहशदवादी हल्ल्याला "islamic terrorism" असा शब्द प्रयोग केला. त्यामुळे या नेत्यांवरती भारतातील डावी मंडळी/ पुरोगामी नाराज आहेत. यात Trump यांच्या वेड्या वाकड्या विधानांनी भर घातली.

या निकाल कडे बघताना आपल्याला काही मुद्दे डोळसपणे बघणे गरजेचे आहे. Democratic Party ची सत्ता अमेरिकेत येणे म्हणजे अमेरिका साम्यवादी होणे असे म्हणणे चुकीचे आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था भांडवलशाही आहे, अमेरिकेची  उभारीच या विचारधारेतून झाली आहे. आज अमेरिका खूप मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. या संकटातून बाहेर पाडण्यासाठी साम्यवादी विचारधारा अमेरिकेला वाचवू शकत नाही. भांडवलशाही व्यवस्थेत महत्वाचा असलेला उत्पादक गट अमेरिकेत आहे तर त्या उत्पादनाचे उपभोग घेणारी मोठी व प्रमुख बाजार पेठ भारत आहे. त्यात चिनी उत्पादक गटांशी स्पर्धा करत अमेरिकेला भारताच्या बाजारपेठेत टिकायचे आहे. त्यामुळे भारताशी संबंध बिघडवणे Joe Biden यांची प्राथमिकता नसेल हे नक्की.

चार वर्षा खाली Joe Biden हे अमेरिकेचे उपाध्यक्ष होते Barak Obama यांच्या अध्यक्षतेत व तेव्हा सुद्धा Obama प्रशासनाने भारताशी संबंध उत्तम टिकवले होते, हे लक्षत घेण्यासारखे आहे. कोणत्याही देशाचे परराष्ट्र धोरण सरकार, पक्ष व नेता यानुसार बदलत नसते. त्यात सातत्य असणे खूप गरजेचे असते. दुसऱ्या महायुद्ध नंतर चा परराष्ट्र धोरणाचा सर्वात महत्वाचा नियम म्हणजे "नॅशन फास्ट" हाच राहिला आहे. मागच्या २० वर्षत अमेरिका भारत संबंध वाढत राहिले आहेत या करिता वाजपेयी-मनमोहनसिंह-मोदी सरकारच्या स्थिर आणि सातत्य पूर्ण प्रयत्नांचा भाग आहे. या धोरणात Joe Biden आडकाठी आणतील असे वाटत नाही.


भारत अमेरिका संबंधात अजून एक महत्वाचा धागा म्हणजे "Quad Nations", मागील महिन्यात याची बैठक जपान येथे झाली, या बैठकीत चार ही राष्ट्रांनी एकत्रित सामरिक सहकार्या वर जोर दिला. या बैठकी नंतर झालेल्या मलबार २०२० या हिंद महासागरातील सामरिक कवायतीत चीन ला वगळून भारत- ऑस्ट्रेलिया- अमेरिका यांनी भाग घेतला. हा एक महत्वाचा धोरणात्मक निर्णय होता. अगदी अमेरिकेच्या मतदानाच्या आठ दिवस आधी २७ ऑक्टोबर ला Indo-US Defense Pact झाला. त्यामुळे भारत-अमेरिका संरक्षण क्षेत्रत विशेष भागेदारी निर्माण झाली आहे. अमेरिकेला चीन विरोधात जागतिक आघाडी उभी करायची आहे  व भारत त्यातील एक महत्वाचा भागीदार आहे. चीनची मध्ययुगीन आक्रमक वृत्ती भारत अमेरिका संबंध दृढ़ करण्यास मदत करत आहे.

भारतात कितीही " बायडेन बाबा निवडून आले नाआनंद गगनात माझा मावे ना" असे गाणे म्हणत असले तरी भारताशी संबंध उत्तम राहावेत हे अमेरिके करिता आता तरी जरुरीचे आहे. येणारा काळ काही तरी वेगळे घेऊन येईल हे नक्की.

 

धन्यवाद                                                                                                विराज

 

वंदे मातरम

No comments:

Post a Comment