Thursday, 13 May 2021

ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम यांचे नाते संबंध

 

सध्या पॅलेस्टाईन आणि इस्राईल यांच्यात युद्ध सुरु आहे, आणि दोन्ही बाजूने एकमेकांवरती बॉम्ब गोळे फेकणायचे काम चालू आहे. प्रचंड तणावाचे वातावरण या देशांच्या सीमेवर आहे. आधुनिक जगाच्या इतिहासात १९४३ पासून या वादाची सुरवात झालेली दिसते. जेव्हा दुसऱ्या महायुद्धात विस्थपित झालेल्या ज्यू समाजाला युनायटेड नेशन्स आणि ब्रिटिश राज्यकरत्यांनी पॅलीस्टाईनला विभाजित करत एक भाग ज्यू समुदायाला दिला व दुसरा भाग मुस्लिम समुदायाला दिला. इस्राईल चा जन्म आणि ब्रिटिशांची कूटनीती यामुळे या वादाला सुरवात झाली. पण वादाचा मुद्दा दोन हजार वर्षा पूर्वीचा आहे व त्या करिता या तिन्ही समुदायाचे नाते संबंध बघणे गरजेचे आहे. हे तिन्ही समुदाय एकमेकांशी जसे वर्षानुवर्षे भांडत आहेत तसेच ते एकमेकांत गुंतलेले सुद्धा आहेत. स्वतःचे वर्चस्व व मोठेपण टिकवण्यासाठी यांची चाललेली हि धडपड म्हणावी लागेल. या तिन्ही समुदायाच्या नाते संबंधाना बद्दल माहिती सर्वत्र उपलब्ध आहे, व त्याविषयी वाद असण्याचे काही कारण नाही.

हे तिन्ही समुदायांना एकत्रित पणे अब्राहमीक रिलिजन (Abrahamic religion) असे म्हणतात. ढोबळ मानाने हे तिन्ही समुदाय एकाच धार्मिक परंपरेतून निर्माण झालं आहेत, यातील ज्यू धर्माची निर्मिती इ.. पूर्व ६व्या शतकात,  ख्रिश्चन .. च्या १ ल्या शतकात तर इस्लाम ची निर्मिती इ.स. च्या ७ व्या शतकात झाली असे म्हणता येईल. या तिन्ही समुदाया सोबत " Baháʼí Faith आणि Druzism" हे सुद्धा धर्म निर्माण झालेले आपल्याला दिसतात पण या तिन्ही समुदायाच्या तुलनेत ते नवीन व लहान आहेत. ख्रिश्चन धर्माचा प्रचार रोम साम्राज्य मार्फत झाला, जेव्हा ४ थ्या शतकात रोम ने ख्रिश्चन धर्म स्वीकारला. तर इस्लाम चा प्रचार उमय्याद साम्राज्यात झाला (म्हणजे आताचे अरब देश, पूर्व आफ्रिका इत्यादी भाग). अब्राहाम यांच्या पहिल्या दोन मुलापासून ज्यू- ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्माचा उगम  झालेला दिसतो. Isaac यांच्या पासून ज्यू- ख्रिश्चन धर्माचा उगम होतो असे म्हणतात तर इस्लाम धर्माचा उगम यांचा मोठा भाऊ Ishmael (इस्माईल) यांच्या पासून झालेला दिसतो.



या पैकी इस्लाम व ज्यू धर्मीयांसाठी महत्वाचे ठिकाण म्हणजे "जेरुसलेम" हे शहर, या शहराला प्रचंड मोठा इतिहास आहे, सदारणपणे ५००० वर्षा पासून या शहराची नोंद इतिहासत सापडते. हे शहर वेगवेगळ्या धर्मसंस्थांच्या व राज्यांच्या अधिपत्याखाली राहिलेले आपल्याला दिसते, त्यात ज्यू त्यांनतर, इस्लाम, रोम (ख्रिश्चन), मध्ययुगीन इतिहासात हे शहर ऑट्टोमन साम्राज्याचा भाग होते त्यानंतर ब्रिटिश व आता इस्राईल त्यावर हक्क सांगत आहे. जुन्या जेरुसलेम मधील टेम्पल माऊंटन हे या तिन्ही धर्माचे पवित्र ठिकाण आहे. ज्यूंच्या धार्मिक मान्यते प्रमाणे याच डोंगरा वरती अब्राहाम (ज्यूंचा संस्थापक) यांना "देवाने दृष्टांत दिला व तेथे वस्ती करण्यास सांगितले" या प्रदेशाला ज्यू समाज “Land of Milk & Honey” म्हणतात. याच डोंगरावर सोलोमन राजाने देऊळ बांधले त्याला "सेनेगॉग" म्हणतात. बॅबिलिओन व रोमन राज्यकर्त्यांनी ही देवळे तोडली, उध्वस्त केली. पुढे राजा हॅडली यांने बांधलेल्या देवळाच्या पश्चिमेकडील भिंतीला वेस्टर्न वॉल किंवा वेलिंग वॉल म्हणतात व हीच वेस्टर्न वॉल ज्यू धर्मीयांसाठी अतिपवित्र ठिकाण आहे. याच डोंगरावर अल् अक्स म्हणजे अतिदूरची मशीद आहे, याच ठिकाणी  प्रेषित महंमद पैगंबर यांना अल्लाचा साक्षात्कार झाला. इस्लाम धर्माच्या मान्यतेप्रमाणे अल-हरम-अल-शरीफ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र परिसरात दगडी घुमट व अल् अक्स मशीद आहे. दगडी घुमटामध्ये पायाचा दगड आहे जिथून प्रेषित महंमद पैगंबर यांनी स्वर्गात प्रस्थान ठेवले तर ज्यू धर्मियांच्या मते दगडी घुमट हे त्यांचे पवित्र ठिकाण आहे व त्या मध्ये असलेल्या पायाच्या दगडा पासून जगाची निर्मिती झाली अशी मान्यता आहे. हेच ठिकाण यशु ख्रिस्ताशी संबंधित असल्यामुळे या शहराला ख्रिश्चन धर्मीय सुद्धा पवित्र मानतात.

आधुनिक जगाच्या इतिहासातील सर्वाधिक काळ वादग्रस्त असलेला हा प्रदेश प्राचीन कळा पासून एकमेकांमध्ये गुंतलेला होता. व त्या गुंतागुंती मधूनच वाद व हिंसाचा होत आहे.

 

 

विराज वि देवडीकर

viraj.devdikar@gmail.com

 


No comments:

Post a Comment