तीन दिवसांच्या सुट्ट्या म्हणून आता पुणे सोडत आहे, पुण्याचे हे टोक ते टोक स्वतःच्या गाडी ने जाताना काही लक्षात येत नाही पण रिक्षा किंवा बस खूप वेगळे जाणवते. मागचे दोन-अडीच तास दक्षिण पुणे ते उत्तर पुणे असा प्रवास केला. रोज च दिसणारे पुणे वेगळे भासले. स्वातंत्राचा अमृत मोहत्सव साजरा करताना पुणे तीन रंगात जणू रंगून गेले आहे. केशरी, सफेत आणी हिरवा रंगांच्या तीन पण मूलभूत रचना. या तिन्ही रंगात नवं निर्मितीची क्षमता आहे. स्वातंत्र आणी नवीन भारताचे प्रतिक हे तीन रंग आहे. यातील अशोक चक्र भारताच्या पूर्ण पणाचे चित्रानं करते. पण हे पूर्ण स्वतंत्र आहे का? स्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे. आपले सौभाग्या आपण परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या संविधानाचा स्वीकार केला आहे. संविधान आपण स्वीकारले आहे पण "खंडित भारत" आपण स्वीकारला आहे का?
" आझादी अभी अधुरी है" या अटल जीं ची कविता आहे, खरंच हे स्वतंत्र्य अजून अपूर्ण आहे, पूर्ण भारताचे स्वप्न अजून अपूर्ण आहे. अखंड भारत अजून होने बाकी आहे. हिमालया पासून हिंद सागरा पर्यंत पसरलेला भारत अजून सुद्धा अपूर्ण आहे. हो आहे की..! स्वतंत्र्याच्या पूर्व संध्येला पाकिस्तान विलग झाला, गंगेच्या आणी यमुनेच्या खोऱ्यात वाढलेली संस्कृती विभक्त झाली. रावी, झेलम, सतलाज, चिनाब, सिंधू आमच्या पासून विलग झाल्या, या स्वातंत्र्यचा आम्ही स्वीकार केला पण आमच्याच हिंदूंची आहुती देऊन. सप्त नद्या आणी तीन सागरांनी चरण स्पर्श होणारी आमची माता आज 14 ऑगस्टला व्याकुळ आहे. स्वतंत्र पाकिस्तानचे अस्तित्व हे अखंड भारता चा शेवटचा तुकडा आहे. विद्येच आद्य दैवत माता सरस्वती च ज्ञानपीठीत पाकव्याप्त काश्मीर मध्ये आहे तर आदी महादेव हिमालच्या पर्वत रंगा मध्ये स्थित आहेत. एक न अनेक संस्कृतिक आणी भावनिक खुणा पाकिस्थान मध्ये आहेत ज्यात सामान्य भारतीय गुंतला आहेत. भगवान श्रीरामाचे "लव" यांनी वसवलेले लाहोर, पेशावर आणी कराची या सर्व शहरात भारतीय संस्कृतीच्या खुणा सापडतात. भारतीय म्हणून जात, धर्म, पंथ, वंश, भाषा आणी लिंग हे मान्य होणारच नाही पण पण खंड भारत स्वीकारणे हे येणाऱ्या पिढ्यान सोबत अन्यायकारक ठरणार आहे. संस्कृती म्हणून भारत अफगाणिस्थान पासून जावा - सुमात्रा, इंडोनेशिया पर्यंत एकच आहे. महाभारतात ल्या माता गांधारी पासून ते बामिया मधील भगवान बुद्धांच्या मूर्ती पर्यंत अफगाणिस्तान भारताच्या मुख्य भुभागाशी जोडला आहे तर हिंद महासागरात श्रीलंका ते इंडोनेशिया हे आज सुद्धा भारतीय असलेल्याचे प्रमाण देत आहेत. राजकीय दृष्ट्या हे विभक्त देश आहेत पण भावनिक व संस्कृतीक दृष्ट्या "भारत" या भू भागात सुद्धा नंदात आहे. आक्रमक सीमवाद आणी सीमांचे विस्तारिकारण अनेक देशांचे मुख्य धोरण आहे. One China Policy चीन ची आक्रमकता दाखवते. आपल्या नाकरत्या नेतृत्वा मुळे तिबेट त्यांनी कधीच घेतले आहे, आता अरुणाचलं प्रदेशावर हक्क सांगत आहे, तैवान आणी दक्षिण चिन समुद्र गिळायला ते बसले आहेत. प्रशांत महासागरात जपान पर्यंत चीन चा ड्रॅगन आग ओकात आहे. मंगोलियन वंशाचे कारण देत आहेत. रशिया युक्रेन वर हक्क सांगत आहे, पुढे जाऊन सोव्हेत रशियाचे विखूरलेले तुकडे एकत्र करण्याचे स्वप्न रशिया पाहिलं. इस्लामिक देशात यापूर्वीच इस्लामच्या नावा खाली एक होण्याचा संकल्प OIC मध्ये केला आहे. युरोपा मध्ये सीमा विस्ताराचा तर इतिहासच आहे. मात्र अखंड भारत मात्र कथित बुद्धीवाद्यांना मान्य नाही. पाकिस्तानच्या स्वरूपात भारताचा शेवट चा तुकडा पडला व अखंड भारताची सुरवात सुद्धा या पासून व्हावी.
"बस इसीलिए तो कहता हूँ आज़ादी अभी अधूरी है
कैसे उल्लास मनाऊँ मैं? थोड़े दिन की मजबूरी है॥
दिन दूर नहीं खंडित भारत को पुनः अखंड बनाएँगे
गिलगित से गारो पर्वत तक आजादी पर्व मनाएँगे॥"
©विराज देवडीकर