Saturday, 11 May 2019

येडशी औरंगाबाद महामार्ग

दर दिवस नवीन काहीतरी अनुभवायचे म्हणून जन्मत असतो, आणि आपण त्यातून शिकत असतो. असाच काहीसा आजचा अनुभव, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ येडशी ते औरंगाबाद प्रवासा दरम्यान आला. भौगोलीक दृष्ट्या हा महामार्ग सुरु होतो सोलापूर येथून तर संपतो धुळे येथे, पण सर्वात जास्त अंतर हा महामार्ग मराठवाड्यातून जातो तुळजापूर ते औरंगाबाद असा, साधारण पणे ३०० ते ३२५ किमी चे अंतर हे मराठवाड्यातील आहे, हा महामार्ग मराठवाड्याचे दक्षिण टोक ते उत्तर टोक जोडण्याचा प्रयत्न करतो.
तसा हा महामार्ग जुना व महत्वाचा व्यापारी मार्ग आहे कारण सोलापूर वरून हैद्राबाद पर्यंत याच मार्गे जात येते तर धुळे येथुन राष्ट्रीय महामार्ग ३ ला सुद्धा लागत येते. त्यामुळे हा महामार्ग हैद्राबाद ते आग्रा व पुढे दिल्ली पर्यंत जोडणारा व्यापारी महामार्ग आहे असे म्हणता येईल.
या महामार्गावर मी काही आज पहिल्यांदा जात नाही, आजन्म प्रवास या महामार्गा वरून झाला आहे पण या महामार्गची काही वर्ष पूर्वीची स्थिती (२०१४ पूर्वी) व आताच्या स्थितीत खूप बदल झाला आहे. पोटातले पाणी ही न हलता प्रवास करणे म्हणजे काय याचा अनुभव आज मी घेतला, महामार्गाचे झालेले चौपदरीकारण, महामार्गाला लागून असलेले सेवा रस्ते, ओव्हर ब्रिज, शहर व गावा बाहेरून काढलेले रस्ते, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी केलेली कामे, योग्य पथ दर्शक या मुळे प्रवास सोपा होत जातो आणि हलका सुद्धा, एकेकाळी याच महामार्गा वरून उस्मानाबाद ते औरंगाबाद प्रवासास ८ ते १० तास लागायचे तो प्रवास आता निम्म्या वेळेत म्हणजे ४तासात पूर्ण होत आहे. जुन्या मांजरसुबा घाटाची धोकादायक वळणे आता उरली नाही आणि कुंथलगिरी धार्मिक व व्यापारी महत्व लक्षात घेऊन नवीन महामार्गाची निर्मिती झाली आहे. शहागड येथील गोदावरी नदीवरचा पूल किंवा चित्ते पिंपळगाव MIDC करीता रस्त्याची व्यवस्था योग्य पद्धतीने आपल्याला लावलेली दिसून येते. 
या महामार्गाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तुळजापूर-उस्मानाबाद मार्गा वर उभ्या असलेल्या WindMills पवनचक्या, महामार्गाच्या सुशोभी करणार भर टाकतात. सिमन्स कंपनी व भारत सरकारच्या एकत्रित प्रकल्पात ३५ WindMills या मार्गावर उभ्या आहेत. ऊर्जा निर्मिती व महामार्ग सुशोभीकरण या एक वेगळा अनुभव या बदललेल्या महामार्गावरून जाताना आपल्याला घेता येईल.

धन्यवाद                                                                                                            ©विराज


Thursday, 4 April 2019

नोटा" (None of the above)


नमस्कार, "लोकतंत्र का त्योहार" या नवा खाली भारतीय निवडणूक आयोग awareness campaign करत आहे, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आणि मतदानाचे महत्व लोकांना समजावे यासाठी प्रयत्न करत आहे. अनेक समाज सेवी संस्था, प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि स्वयंसेवक यांच्या माध्यमातून सुद्धा मतदाना साठी प्रवृत्त करण्याचे काम चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजचा विषय आपल्या समोर मांडत आहे.                         "नोटा" (None of the above) हे बटन मा. सर्वोच्च् न्यायाल्याच्या निर्देशाने सप्टेंबर २०१३ ला स्वीकारण्यात आले व सार्वत्रिक निवडणूक २०१४ ला याचा वापर १. १% म्हणजे साधारणतः ६०,००,००० लोकांनी केला. या नंतर झालेल्या सर्व निवडणुकीत "नोटा" अंतर्भूत होते व त्याचा वापर वाढत गेलेला दिसत आहे. नोटा करिताचे एक विशिष्ट बोध चिन्ह १८ सप्टेंबर २०१५ ला देण्यात आले व त्याचा वापर वोटिंग मशीन वर करण्यात येतो. हे झाली नोटा बद्दलची सामान्य माहिती.
काही सांख्यकी पुढील प्रमाणे…
1.       गुजरात  २०१७ निवडणूक नोटा ११८ मतदारसंघात तृतीय स्थान भाजप आणि काँग्रेस नंतर.
2.       कर्नाटक २०१८ नोटाचे मत राष्ट्रीय पक्ष CPI M आणि बसपा पेक्षा जास्त होते.      
3.       मध्यप्रदेश २०१८ भाजप व काँग्रेस मधील विजयी उमेदवाराचे अंतर ०.१% होते तर नोटाला मिळालेल्या मतांची टक्के वारी १.४% होती.
4.       केरळ २०१५ पासून पंचायत निवडणुकीत सुद्धा नोटा चा वापर सुरु झाला.

आजच्या तारखेला तरी नोटा ला संविधानिक आधार असला तरी त्याचा उपयोग निवडणूक प्रक्रियेवर होताना दिसत नाही. नोटा द्वारे आलेली मते कोणत्याही उमेदवारांचे मतातुन वजा करता येत नाहीत किंवा कोणत्याही उमेदवाराच्या मतात जोडता येत नाहीत, त्यामुळे नोटा चा सांख्यकी शास्त्रा शिवाय इतर कुठेही उपयोग होताना दिसत नाही. मुळात आपल्याला संविधानाने आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार दिला आहे व त्याला “People Representative act 1951” म्हटले जाते त्यानुसार आपण आपला योग्य प्रतिनिधी उपलब्ध उमेदवारा मधून निवडणे अपेक्षित आहे. मात्र नोटाच्या स्वीकारा नंतर असे दिसते की नोटाचा वापर करणे म्हणजे निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण कारण्यासाखे आहे. यामुळे समाजात एक असा उदासीन वर्ग निर्माण होत आहे जो लोकशाही शासन व्यवस्थेला धोका असेल. नोटा चा वापर केल्यामुळे चुकीचा उमेदवार निवडून येण्याकरीता मदत होताना दिसते. एखाद्या व्यक्तीने मतदान न करणे व नोटाचा वापर करणे एक सारखेच झाले आहे. नोटा च्या मतांचा कोठोही उपयोग होताना दिसत नाही.  नोटा ला सर्वाधिक मत मिळून सुद्धा द्वितीय क्रमांकाच्या उमेदवारास विजयी ठरवले जाते, त्यामुळे जनसामन्यात नोटा बद्दल चे मत काहीसे असे होताना दिसत आहे,
Ø  waste of vote
Ø  merely cosmetic
Ø  a symbolic instrument to express resentment
Ø  a mere decoration
राज्यव्यवस्थेत बद्दल लोकशाही मार्गानेच होणे संविधान कर्त्याना अपेक्षित होता आणि तेच सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे. आपण येणाऱ्या निवडणुकीत उपलब्ध असलेल्या पर्यायानं पैकी एक निवडणे गरजेचे आहे, व त्यालाच पूर्ण मतदान म्हणता येऊ शकते.

धन्यवाद


लोकशाही :)