Wednesday 3 April 2013

महाराष्ट्रातील IPL सामन्याचा विरोध चुकीचा आहे.......

मला खरच वाटत कि महाराष्ट्रातील IPL सामन्याचा विरोध चुकीचा आहे. IPL हि एक खरच चांगली व नव युवकांना प्रोत्साहन देणारी कल्पना आहे. क्रिकेट मधील नवीत तरुणांना प्रोत्साहन मिळने गरजेचे आहे आणि IPL हे काम चांगल्या प्रकारे करत आहेत. BCCI ने हि एक उत्तम योजना नव युवकांना प्रोत्साहन देण्याची आखली आहे व मी त्याचे स्वागतच करतो. मला अभिमान आहे कि महाराष्ट्रात आज IPL सामने खेळवले जात आहेत. IPL मुळे महाराष्ट्रातील स्थानीक युवकाला क्रिकेट खेळण्यासाठी नवी संधी मिळत आहे, व नव युवक त्यात भाग घेत आहेत. IPL सामन्याच्या वेळेस नव युवक रात्रीचा दिवस करून त्याकरता कष्ट घेत आहेत. निश्चितच त्याच्या कष्टाला योग्य फळ मिळतील. IPL सामन्यामुळे महाराष्ट्राचा आथिंक विकास होईल, नवीन उद्योग येतील, नवीन धंदे वाढतील, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. महाराष्ट्रतील मध्यमवगीर्य उच्च मध्यमवगीर्य होतील. महाराष्ट्राची प्रगती होईल विकास होईल. सर्वत्रा सुकाळ येईल.
मग एका IPL सामन्यामुळे सुख, समृद्धी, विकास, प्रगती, येणार असेल तर त्या IPL सामन्याना विरोध का????? काय वाईट आहे त्यात???? उगा एक चार-पाच जिल्यात पाउस कमी पडला म्हणून काय झाला, उग शे-पाचशे तालुक्यात पिण्यासाठी पाणी नाही म्हणून काय झाला, उग हजार-बाराशे गावांना टॅकरणे पाणी पुरवावे लागते म्हणून काय झाले, उग हजारो एकर शेती पाण्यावाचून जळाली म्हणून काय झाला, पिण्याच्या पाण्यासाठी पायी वणवण फिरावे लागते म्हणून काय झाले, हजारो जनावराचा अन्न पाण्यावाचून जीव गेला म्हणून काय झाला. IPL सामन्याचा विरोध चुकीचा आहे. महाराष्ट्राची प्रगती IPL सामन्यामुळे होते. मराठवाड्यातल्या सात जिल्यामुळे नाही.
मी माझा या लेखाच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो कि IPL सामन्याला कितीही विरोध झाला तरी सामने महाराष्ट्रातच भरवावेत, सामन्याकरता कितीही पाणी लागले तरी द्यावे कारण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. सामने भारावल्यास महाराष्ट्राची भरभरठ होणार आहे. IPL सामन्याना विरोध करणारे हे महाराष्ट्राचे विरोधाक आहेत त्यामुळे त्याचा विचार सरकारने करू नये.
त्यामुळे हे सर्वजन चुकीचे वागत आहेत जे IPL सामन्याचा विरोध करत आहे. मी प्रगतीशील आणि पुरोगमी महाराष्ट्राचा नव युवक आहे.    
(टीप:- लेख रोधात्मक व उपरोधात्मक घ्यावा)
वन्दे मातरम्

No comments:

Post a Comment