Monday, 26 August 2013

महा अॅग्री युथ असोसीएशन (माया) या संस्थेला तृतिय वर्धपणा दिनाच्या हार्दिक शुभेच्या..



महा अॅग्री युथ असोसीएशन (माया) या संस्थेला तृतिय वर्धपणा दिनाच्य (२६/०८/२०११), माझ्या कडून सर्व पदाधिकारी व कार्येकरते यांना हार्दिक शुभेच्या. संस्थेने मागील तीन वर्षात ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील कृषी युवकांच्या मनात एक मनाचे स्थान व आत्मविश्वास भरला आहे ते पाहून मला निश्चयी आनंद होत आहे. ज्या उद्दिष्टाने संस्थेची निर्मीती झाली होती ते पाहता आज संस्था कृषी युवकला स्वबळावर उभे करण्यात निश्चयी यशस्वी झाली आहे असे मला वाटते. संस्था मागील तीन वर्षा पासून न थकता, अखंड पणे जे युवक निर्मितीचे कार्ये करत आहे ते निश्चयी अभिनंदनीय आहे. तसेच संस्थेने कार्यकरत्याचे जाळे वीनात, “एक-मेक सहाय्य करू” या पद प्रमाणे सर्व कृषी युवकांचा आत्मविश्वास वाढवण्याचे कार्य केले आहे.

आर्थत या सर्व गोष्टी शक्य झाल्या त्या संस्थेकरता अपरिमित कष्ट घेणारे नेतृत्व व पदाधिकारी यांच्या मुळेच, संस्थेचे नेतृत्व श्री तुषार वाबळे हे स्वतः संस्थे करता ऊजेचे स्रोत आहेत. व त्याच्या मुळे आज संस्था एकसंग आणि एक दिल राहिली आहे व कार्य करत आहे. संस्थेच्या यशात मा. नेतृत्वाचे खूप मोठे योगदान आहे. एक दूरदृष्टी व शिस्तबध नेतृत्व संस्थे करता लाभले आहे. व त्याच मुळे मागील तीन वर्षात संस्थेय अनेक व्यक्ती जोडल्या गेल्या आहेत. संस्था शिस्तबध होण्यास संस्थेचे नेतृत्व जवाबदार आहे. संस्थेत विचार व व्यक्ती स्वातंत्र हे संस्थेच्या नेतृत्वामुळे टिकून आहे. संस्थेचे नेतृत्व सर्वसामान्य कार्यकरत्यास जोडले गेलेले असल्यामुळे संस्था खरया अर्थाने उभी राहिली आहे. तसेक एक शिस्तबध व कार्यक्षम पदाधिकारयाची फळी उभी करण्यात नेतृत्व यशस्वी झाले आहे, मा. मिथुन शेटे, मा. प्रवीण पारधी व इतर पदाधिकारी जे फक्त आणि फक्त संस्थेच्या विचाराशी बंधले आहेत, व संस्थेला पुढे नेण्यात सक्रीय आहेत याचा मला आनंद वाटतो. 



सर्व पदाधिकारी स्वताःच्या व्यक्तिगत उद्दिष्टा पेक्षा संस्थेचे उद्दिष्टा मोठे मानून कार्य करत आहेत हे विषेश. संस्थेला मोठी करण्यात संस्थेचे पदाधिकारी अपरिमित कष्ट घेत आहेत. सर्व पदाधिकारी संस्थेच्या ध्येय व विचाराशी बांधील आहेत आणि ते त्याच्या आचरणातू दिसत आहे.
सक्षम नेतृत्व, एकनिष्ठ कार्यकर्ते आणि योग्य ध्येय व विचार यामुळेच संस्था आज यशस्वी झाली आहे आसे मला वाटते. संस्थेने जे ज्ञान प्रसाराचे कार्य हाती घेतले होते त्यामुळे आज कृषी युवकाचा आत्मविश्वास वाढला आहे, उद्योजकता विकास या कार्यक्रमा मुळे कृषी युवकांचा उद्योजक होण्याकडे काल वाढला आहे. व हे सर्व, संस्थेचे नेतृत्व आणि पदाधिकारी यांच्या कष्टाचे फळ आहे.
संस्थेचे एकूण कार्य पाहता, संस्था “उद्योग व्यवस्थापनाच्या” पाठ्यक्रामानत सामील करावी आसे मला वाटते.
शेवटी पुन्हा एकदा संस्थेच्या नेतृत्व आणि पदाधिकारी यांना तृतीय वर्धपणा दिनाच्या हार्दिक शुभेच्या
विशेष आभार
मा. श्री तुषार वाबळे, श्री प्रवीण पारधी, श्री मिथुन शेटे
वंदे मारातम                                                  विराज
(कृपाया हा लेख उपरोधात्मक घेउ नये.)
 

Thursday, 8 August 2013

कॉलेज मधली निवडणूक सुरु झाली रे.....




मागील महीन्यात महाराष्ट्र सरकारने एक विचित्र व विस्मयकारक निर्णय घेतला. युवक त्यातल्या-त्यात महाविद्यालयीन युवकाला केंद्रभूत असलेला आसा निर्णय, महाविद्यालयीन व विद्यापीठ निवडणुका पुन्हा सुरु करण्याचा. फार महत्वपूर्ण व स्वागतपूर्ण निर्णय, ज्यातून युवकांच्या नेतृत्व निर्मीतीला चालना मिळणारच आहे पण युवकांच्या राजकारणा बद्दलच्या मतामध्येही बदल होणार आहे. या प्रकारच्या निवडणुका युवकांचे नेतृत्व घडवण्यात व बनवण्यात फार महत्वाच्या आहेत. युवक शक्ती विकासाकरता आशा निवडणुका फार महत्वाची जवाबदरी पार पाडणार आहेत. महाविद्यालय व विद्यापीठ हि विधानसभा व लोकसभा यांची पहिली पायरी ठरावी आसा हा निर्णय आहे.

१९९४ साली त्यावेळच्या शरद पवार सरकारने, गुंडागर्दी, दहशत, हिंसाचार, पैसाचा वापर आणि जातधर्म या कारणामुळे महाविद्यालयीन निवडणुका बरखास्त केल्या होत्या, व त्यावेळची सामाजिक व राजकीय परिस्थितीचा आभ्यास केल्यास आसे जाणवते की कदाचित तो निर्णय योग्य होता. देशात असलेली राजकीय अस्थिरता, सामाजिक व आर्थीक विषमता, राज्यात दंगल सदृश परिस्थिती किंबहून दोन मोठ्या दंगली, मंडळ आयोग इत्यादी कारणामुळे या निवडणुका हिंसाचाराचे मध्यम बनत होत्या हे खरे. अपहरण, मारहाण, धमक्या आसे प्रकार महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात झाले, हे खरे मात्र मोठा हिंसाचार, टोळी युद्ध, गावठी बॉबचा वापर, बंदुकांचा वापर आसे बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशातील दृश्य महाराष्ट्रात दिसले नाही. कृषी विद्यापीठ सोडली तर अकृषी विद्यापीठात या प्रकारच्या हिंसाचार फारच कमी होता. मात्र आसा हा निर्णय विद्यार्थी नेतृत्व घडवण्यास बाधक ठरला, एक पिढी नेतृत्वाची बरबाद करणारी ठरली.
ज्योती बसू, मधु लिमये, शरद पवार, नितीश कुमार, विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंढे, सीताराम येचुरी, प्रकाश करात, सुषमा स्वराज हे सर्व कसलही राजकीय पाठबळ नसताना देशाच नेतृत्व करू शकले ते फक्त आणि फक्त या महाविद्यालयीन जडणघडणीतूनच. मात्र मागील वीस वर्षात या प्रकारचे नेतृत्व घडवण्याचे झरे आठले होते. घराणेशाहीतून पुढे आलेले व सर्वसामान्य जनतेची कसलाही संबंध नसनारे नेतृत्व व नेते या वीस वर्षाच्या काळात महाराष्ट्रात तयार झाले.
मात्र पुन्हा एकदा या झरा पाझर पुटल्याने एक व्हर्जिन पिढीच्या राजकारणाला चालना मिळणार आहे. कदाचीत या आशादायी वातावरणामुळे युवकांच्या मनातील राजकारणा बदलचा मळभ दूर होऊन नवीन व युवा नेतृत्व निर्मीतीला चालना मिळेल व कदाचित हिच या देशा करता क्रांतीची वाटचाल ठरेल.
मी या निर्णयाचे स्वागत करतो....
वंदे मातरम्                                                   विराज