Thursday 8 August 2013

कॉलेज मधली निवडणूक सुरु झाली रे.....




मागील महीन्यात महाराष्ट्र सरकारने एक विचित्र व विस्मयकारक निर्णय घेतला. युवक त्यातल्या-त्यात महाविद्यालयीन युवकाला केंद्रभूत असलेला आसा निर्णय, महाविद्यालयीन व विद्यापीठ निवडणुका पुन्हा सुरु करण्याचा. फार महत्वपूर्ण व स्वागतपूर्ण निर्णय, ज्यातून युवकांच्या नेतृत्व निर्मीतीला चालना मिळणारच आहे पण युवकांच्या राजकारणा बद्दलच्या मतामध्येही बदल होणार आहे. या प्रकारच्या निवडणुका युवकांचे नेतृत्व घडवण्यात व बनवण्यात फार महत्वाच्या आहेत. युवक शक्ती विकासाकरता आशा निवडणुका फार महत्वाची जवाबदरी पार पाडणार आहेत. महाविद्यालय व विद्यापीठ हि विधानसभा व लोकसभा यांची पहिली पायरी ठरावी आसा हा निर्णय आहे.

१९९४ साली त्यावेळच्या शरद पवार सरकारने, गुंडागर्दी, दहशत, हिंसाचार, पैसाचा वापर आणि जातधर्म या कारणामुळे महाविद्यालयीन निवडणुका बरखास्त केल्या होत्या, व त्यावेळची सामाजिक व राजकीय परिस्थितीचा आभ्यास केल्यास आसे जाणवते की कदाचित तो निर्णय योग्य होता. देशात असलेली राजकीय अस्थिरता, सामाजिक व आर्थीक विषमता, राज्यात दंगल सदृश परिस्थिती किंबहून दोन मोठ्या दंगली, मंडळ आयोग इत्यादी कारणामुळे या निवडणुका हिंसाचाराचे मध्यम बनत होत्या हे खरे. अपहरण, मारहाण, धमक्या आसे प्रकार महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात झाले, हे खरे मात्र मोठा हिंसाचार, टोळी युद्ध, गावठी बॉबचा वापर, बंदुकांचा वापर आसे बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशातील दृश्य महाराष्ट्रात दिसले नाही. कृषी विद्यापीठ सोडली तर अकृषी विद्यापीठात या प्रकारच्या हिंसाचार फारच कमी होता. मात्र आसा हा निर्णय विद्यार्थी नेतृत्व घडवण्यास बाधक ठरला, एक पिढी नेतृत्वाची बरबाद करणारी ठरली.
ज्योती बसू, मधु लिमये, शरद पवार, नितीश कुमार, विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंढे, सीताराम येचुरी, प्रकाश करात, सुषमा स्वराज हे सर्व कसलही राजकीय पाठबळ नसताना देशाच नेतृत्व करू शकले ते फक्त आणि फक्त या महाविद्यालयीन जडणघडणीतूनच. मात्र मागील वीस वर्षात या प्रकारचे नेतृत्व घडवण्याचे झरे आठले होते. घराणेशाहीतून पुढे आलेले व सर्वसामान्य जनतेची कसलाही संबंध नसनारे नेतृत्व व नेते या वीस वर्षाच्या काळात महाराष्ट्रात तयार झाले.
मात्र पुन्हा एकदा या झरा पाझर पुटल्याने एक व्हर्जिन पिढीच्या राजकारणाला चालना मिळणार आहे. कदाचीत या आशादायी वातावरणामुळे युवकांच्या मनातील राजकारणा बदलचा मळभ दूर होऊन नवीन व युवा नेतृत्व निर्मीतीला चालना मिळेल व कदाचित हिच या देशा करता क्रांतीची वाटचाल ठरेल.
मी या निर्णयाचे स्वागत करतो....
वंदे मातरम्                                                   विराज   
  

No comments:

Post a Comment