Saturday 26 September 2020

दि सोशल डायलमा

 वर्ष-दीड वर्षा खालील गोष्ट असेल, मी व माझा जवळचा मित्र सोशल मीडिया या विषयी बोलत होतो. मी त्याला सोशल मीडिया वरती व्यक्त होण्याबद्दल विचारले असता तो म्हणाला "मला कोणाचे फीड(खाद्य) व्हायला आवडत नाही, म्हणून मी सोशल मीडिया वरती व्यक्त होण्याचे टाळतो." हा कोणत्याही एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीचा विचार नक्की असू शकतो.

११ वर्षा खाली मी फेसबुक नावाच्या जाळ्यात अडकलो, त्यावेळे पासूनच सोशल मीडिया एक अभ्यास म्हणून पाहायचे ठरवले, आणि जमेल तस त्याच्या वेगवेगळ्या रचनांचा अभ्यास करत गेलो. व्हाट्स अप, ट्विटर, इंस्टाग्राम, युट्युब, लिंक्ड इन, जि प्लस या सर्व समाज माध्यमं मध्ये मुशाफिरी सुरु आहे. व्यक्ती स्वातंत्र्य व विचार स्वातंत्र्य अबाधित ठेवत आपण सर्वच कोणत्या न कोणत्या सोशल मीडियातून व्यक्त होतच असतेत. व्यक्त होण्याकरिता सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम आहे. 


मागील आठवड्यात नेटफ्लिक्स वरील " दि सोशल डायलमा"(The Social Dilemma) ही डॉकमेंटरी कम फिल्म पहिली आणि सोशल मीडिया कडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन मिळाला. ही फिल्म जानेवारी २०२० मध्ये sundance film festival मध्ये रिलीज करण्यात आली होती पण COVID19 उद्रेका नंतर यात काही बदल करून या महिन्यात पुन्हा रिलीज केली गेली. या फिल्म मध्ये थोडक्यात सांगायचे म्हणजे सोशल मीडिया कंपनी मध्ये काम करणारे आजी-माजी कर्मचाऱ्यांचे (Engineer, data scientist, data analyzer, HoD, प्राध्यापक, IT तज्ञ, मानसशास्त्रज्ञ यांचा समावेश असतो) इंटरव्हिव घेण्यात आले आहे व सोबत एक छोटीशी काल्पनिक गोष्ट चालते ज्याद्वारे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे या गोष्टीतून समजावून सांगण्याचा प्रयत्न होत असतो. सोशल मीडिया वेगवेगळ्या युक्त्या वापरून युजर ची वेगवेगळी व वैयक्तिक माहिती संकलित करत असते. त्या करिता त्यांनी काही माहिती दिली आहे, जगभरात ५.१० लाख कंमेन्ट दर मिनिट तर २.९३ लाख स्टेट्स दर मिनिटात अपडेट होत असतात. ३० करोड फोटो दर दिवशी फेसबुक वर अपलोड होत असतात. ही एक ढोबळ आकडेवारी आहे पण आपल्याला या मधून लक्षत येईल किती मोठ्या प्रमाणावर/ प्रचंड डेटा या माध्यमातून सोशल मीडिया कंपनी कडे जमा होत असेल. या डेटा वरती वेगवेगळे algorithm वापरून युजर चे behaviour pattern लक्षत घेणे व त्यामधून त्यांची निर्णय निश्चिती (decision making) करणे हे सोशल मीडियातून होत आहे.

अर्थात या पूर्वी असे काही होतच नव्हते का? तर तसे काही नाही, या पूर्वी सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून यूजर म्हणजे सामान्य उपभोक्ता(consumer) ची माहिती गोळा केलीच जायची मार्केट सर्वे किंवा या प्रकारच्या इतर माध्यमातून ही माहिती गोळा व्हायची पण सोशलमीडियातून गोळा होणाऱ्या माहिती इतकी त्याची गुणवत्ता व विश्वासहार्यता नसायची, समाज माध्यमात  इथं पर्यंत जे होत आहे ते फक्त व्यापार, मार्केट, consumer, seller, buyer यांच्या पर्यंत मर्यादित आहे. पण ज्यावेळेस या सर्वा गोळा केलेल्या प्रचंड माहिती चा वापर AI (artificial intelligence) करीत केला जातो त्यावेळेस धोक्याच्या घंटा वाजायला सुरवात होते. AI मनुष्याच्या उपयोगाचे आहे तेवढेच येणाऱ्या काळात मानवाच्या विध्वंसा करिताचे कारण AI बनणार आहे. गूगल मॅप वरून एखाद्या ठिकाणी जाण्याचे वेगवेगळे मार्ग दाखवते ते म्हणजे AI. डेटा मायनींग, मशीन लेअरनिंग, AI ही अशी जाणारी चढती क्रमावली कुठेतरी मानवास धोका पोहंचवत असते. त्यावेळेस या सोशल मीडियाच्या माध्यमातून यूजर च्या भाव-भावना, राग-लोभ, मोह-मत्सर, काम आशा मानवाच्या भावनाचा AI तयार होत असेल तर त्यातून वेगळीच मानसिक विकृती जन्मास येऊ शकते. या सोबत अजून एक महत्वाची गोष्ट लक्षत घेण्यासारखी आहे ती म्हणजे "natural language processing" या माध्यमातून लोकांची/यूजर ची बोली भाषा मशीन लेअरनिंग करता केला जातो व त्याचा उपयोग AI विकसित करण्यासाठी होतो. याच मानवी भावनांच्या AI चा उपयोग करून रोबोट विकसित केला जाऊ शकतो. सोशल मीडियातून या प्रकारच्या कामाला बळ मिळताना दिसत आहे. याच AI चा वापर करून socio-political system ला धोका पोहांचू शकतो, लोकशाही प्रणित शासन व्यवस्था उलटून टाकणायचा प्रयत्न अनेक देशात होऊ शकतो. एकाधिकार शाही, द्वेष निर्माण केले जाऊ शकतात


सोशल मीडियाच्या माध्यमातून AI  निर्मित संकट आपल्या समोर उभे आहे. त्यामुळे सोशल मीडिया वरती किती व कसे व्यक्त व्हायचे हे आपल्याला ठरवावे लागेल. सोशल मीडियाचे ऍडिक्शन ही एक वेगळी समस्य आहे पण त्याच बरोबर सोशल मीडिया वरती व्यक्त होताना एखाद्याला भान नसणे हे या समस्येचे विदारक स्वरूप असेल. या करिता सोशल मीडिया सोडणे हा उपाय असू शकत नाही. सर्वानी जरूर अभ्यासावा असा विषय आहे हा.

 



धन्यवाद                                                                                  विराज

 

(लेख कसा वाटलं जरून लिहा आणि आवडल्यास शेअर करा/RT करा)

 

 

 

No comments:

Post a Comment