Sunday 12 May 2013

मातृदिन



मला आठवत, एक दिवस उन्हाळयातला मला माझ्या आईने खूप मारलं, मी खूप रडत होतो, कारण होत; वाचन. आईन मला वाचायला सांगितल होत, आणि तेहि पुस्तक. खूप वर्ष झाले या गोष्टीला, मी लातूरला असेल चैाथी किवा पाचवीत. गोष्ट आहे माझा जडण-घडणीची. मला सारख वाटत राहत मी घडलो कोणा मुळे?, “आई मुळे”, आणि  मी घडलो कोणासाठी? “मातेसाठी”.
दोन वेगवेगळ्या गोष्टी पण एकाच व्यक्तीमुळे, माझा जडण-घडणीत मला माझी आई ठळकपणे दिसते. या घडण्याची सुरवात झाली ती लातूर आणि उस्मानाबादला मी खूप लहान होतो. संघ शाखा आणि घरातील वातावरण हे तर होतेच पण एक नेतृत्व म्हणून घडवण्यात खूप मोठा हात होता आणि आहे तो माझा आईचा. घरातील वातावरण, समाजात वावरताना-फिरताना घडणाऱ्या गोष्टी या सर्वातून मी शिकण्याचा प्रयत्न करत होतो पण ते पोहोचवल माझापर्यंत माझा आईने आणि त्याची सुरावात झाली त्या पुस्तक वाचाण्या सारख्या साध्या गोष्टीतून, गोष्ट साधी होती वाचनाची पण हट्ट होता सवयीचा आणि तोही वाचनाच्या सवयीचा. वाचनाची सवय लागावी चांगल वाचन व्हाव व चांगल व्यक्तिमत्व घडव याकरता. हट्ट होता, आग्रह होता, ध्यास होता एक सक्षम, निर्भीड व स्वतंत्र व्यक्ती घडणीचा, आणि आशी व्यक्ती कशा करता तर, राष्ट्राकरता. आस एक खूप मोठ काम आई या नावाने माझा करता केलं आणि करत आहे. 
मडक्याला ज्याप्रमाणे एक कुंभार आकार देतो त्या प्रमाणे माझा आईने घडण्याच्या वयात मला व माझ्या व्यक्तिमत्वा घडवले. वाचन असेल, लिखन असेल, वतृत्व असेल, व्यक्ती असेल, नेतृत्व असेल, सारे काही माझा आई मुळे मी घडलो. वाल्या वाल्मिकी झाला तो त्या दोन शब्दामुळे आणि शब्दासाठी. माझा सारख्या सामान्य माणसला परीस स्पर्श झाला. आशा परिसाचा स्पर्श ज्यामुळे मी “राष्ट्रीय”, राष्ट्राकरता अर्पण झालो, आणि ते फक्त आईच करू शकते. मला खुपदा वाटते शिवाजी का घडले असतील कारण ते घडावेत आस जिजामातेला वाटत होते म्हणून ते घडले. राष्ट्र आणि धर्म घडवण्यसाठी व राखण्यसाठी आई आसने गरजेचे आहे. राष्ट्र आणि धर्म घडण्यासाठीच मुळात पमेश्वराणे आईची बनवली असावी.
आजचा मातृदिनी, जीच्या अस्तित्वाने मला सतत भारत मातेचे स्मरण होते व माझ्या जीविताचे कार्य निश्चित होते, आशी माझी आई सौ. शैलाजा देवडीकर यांना विनाम्र प्रणाम.

वंदे मातरम्                                                   विराज

No comments:

Post a Comment