"आत्मनिर्भर" हा शब्द सध्या भारतात प्रचंड
प्रमाणात चाललात आहे, तीन दिवसा खाली ज्यावेळी मा.
पंतप्रधानांनी देशाला संबोधित करताना "आत्मनिर्भर भारत योजना" जाहीर
केली त्या दिवसा पासून हा शब्द प्रचंड प्रमाणात वापरला गेला. गुगल ट्रेंड्स चा
अभ्यास केला तर त्या दिवसा पासून हा शब्द मोठया प्रमाणावर सर्च केला गेला आहे.
इंग्रजीत किंवा इतर भाषेत त्याचे भाषांतर किंवा त्याचा अर्थ शोधला गेला. समाज
माध्यमांना तर चावायला विषयच पाहिजे असतो त्यामुळे या शब्दा बद्दल वेगळे काही नाही
अर्थ काढण्या पेक्षा विपरीत अर्थ जास्त शोधला गेला. समाज माध्यमं विषयी जास्त
बोलणे चुकीचेच आहे.
आत्मनिर्भर बना याचा पूर्ण चुकीचा अर्थ सध्या
काढला जात आहे, एखादी कमोडिटी इंपोर्टेड आहे का
एक्सपोर्टेड आहे यावर आत्मनिर्भर असणे पूर्ण पणे चुकीचे आहे. मुळात कोलगेट ला बबूल
किंवा पेप्सोडेन्ट ला डाबर हा काही आत्मनिर्भर असण्याकरिता पर्याय नाही. नक्कीच
कोलगेट आणि पेप्सोडेन्ट भारता बाहेरील कंपन्या आहेत तर बबूल आणि डाबर भारतीय
कंपन्या आहेत. फक्त भारतीय उत्पादने वापरणे म्हणजे आत्मनिर्भर बनणे हे सत्य होईल
असे नाही, आपल्याला हे लक्षात घ्यायला हवे की
सर्व उत्पादने व सेवा यांचे उत्पादन जगात सर्वत्र होतेच असे नाही भौगोलिक व
सामाजिक गरज सुद्धा उत्पादने व सेवा यांच्या करिता जवाबदार असतात, त्यामुळे प्रथम स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन
देणे गरजेचेच आहे पण जे स्थानिक ठिकाणी उत्पादित होत नाहीत त्यांच्या आयात-निर्यात
मध्ये समतोल कसा राहील हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे. त्याच बरोबर टेकनॉलॉजि
एक्सचेंज या सुद्धा महत्वाचा विषय आत्मनिर्भर बनण्यावर अवलंबून असणार आहे. बाहेरील
तंत्रज्ञान शिकणे हा स्वाभाविक गुणविशेष झाला आहे पण ते शिकलेले तंत्रज्ञान आपल्या
देशात आणणे व त्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून देशी बनावटीची स्थानिक स्थरावर
उत्पादने/सेवा निर्माण करणे हे सुद्धा आत्मनिर्भर बनण्यासाठी जरुरीचे आहे.
उत्पादनाची गुणवत्ता (Quality)
हा फार महत्वाचं विषय व्यापाराच्या
दृष्टिकोनातून असतो. चायनीज उत्पादने आणि खराब गुणवत्ता हे जसे समीकरण आहे
त्यामुळेच गुणवत्तेवरच व्यापाराचा स्थर ठरवला जातो. जागतिक व्यापारात गुणवत्ता फार
महत्वाचा फॅक्टर आहे. आपल्याला सुद्धा गुणवत्ता पूर्ण उत्पादनां करिता प्रयत्न
करावा लागेल. त्याकरिता शिक्षण प्रणालीत बदल करावा लागेल, गुणवत्ता आणि स्वतःचे तंत्रज्ञान हे आत्मनिर्भर
होण्या करीत जरुरीचे असते. त्याच बरोबर अजून एक फॅक्टर लक्षात घेण्यासारखा आहे तो
म्हणजे innovation, नवीन नवीन उत्पादने व सेवा त्यांचे
प्रकार जोपर्यंत आपण मार्केट मध्ये आणत नाही तोपर्यंत त्याची गरज निर्माण होणार
नाही. एखादे उत्पादन किंवा सेवा याची गरज निर्माण होण्यासाठी त्याचे नावीन्य
लोकांपर्यंत पोहचावे लागते.
आयात-निर्यात समतोल हा जागतिक व्यापाराचा फार
महत्वाचा भाग आहे, Covid१९ च्या काळातील एक उदाहरण पाहिल्यास
आपल्याला लक्षत येईल,
Hydroxychloroquine या
भारतीय बनावटींच्या औषधांची मागणी अमेरिकेने Covid१९
च्या विस्फोटा नंतर भारता कडे केली, मानवतेच्या
दृष्टिकोनातून भारताने त्या औषधांचा पुरवठा अमेरिकेला व जगातील इतर देशांना शुद्ध
केला पण त्या बदल्यात भारताने अनेक दिवसा पासून प्रलंबित असणारी defense equipment डील केली (anti-ship missiles and air-launched
torpedoes). सेवा
क्षेत्रात याच काळात फेसबुक आणि जिओ यांच्यात एक डील झाली दोन्ही कंपन्या डेटा वर
अवलंबून आहेत. डेटा(विदा) ची देवाण-घेवाण यामधून होणार आहे. जेवढ्या जास्त प्रमाणात भारतीय
माल/उत्पादने/सेवा यांची जागतिक स्थरावर
देवाण-घेवाण होणेच आत्मनिर्भर असणार आहे. एका रात्रीत भारत हा आत्मनिर्भर
नक्कीच होणार नाही पण त्याकरिताचे सातत्य आणि सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत. या
नेतृत्वाने प्रयत्न सुरु केले आहेत.
टीप:- लेख पाहिजे तेथे शेअर करावा
विराज देवडीकर
#AtmanirbharBharatAabhiyan #AtmanirbharYojana
#MakeinIndia #Business
तुझा हा पैलू माहित नव्हता! खूप शुभेच्छा !
ReplyDeleteAtishay chhan blog ahe ....vistrut mahiti dili ahe ... Lockdown nantar Bharat nakkich .. atmnirbhar hoil ...
ReplyDeleteVery nice Information
ReplyDelete